Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP OBC Morcha : भाजपच्या OBC मोर्चात मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील कोणाकोणाला मिळाली संधी? पाहा यादी

BJP OBC Morcha : भाजपने OBC मोर्चाच्या नव्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकारिणी सदस्यांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी केलेल्या या नियुक्त्यांमध्ये महाराष्ट्रातील बबनराव चौधरी आणि राहुल गोविंद केंद्रे यांचाही समावेश आहे. पाहा कोणाला कोणती जबाबदारी मिळाली.

  • By विवेक
Updated On: Nov 21, 2026 | 10:12 PM
BJP Candidate list

BJP Candidate list

Follow Us
Follow Us:
  • भाजपच्या OBC मोर्चाची नवी पदाधिकारी यादी जाहीर
  • राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडून नियुक्त्या
  • सात राष्ट्रीय उपाध्यक्षांची नियुक्ती; महाराष्ट्राला मोठी जबाबदारी
 

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने (BJP) आपल्या ओबीसी मोर्चाच्या संघटनात्मक रचनेत महत्त्वाचे बदल केले आहेत. पक्षाकडून नव्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी या नियुक्त्यांना मंजुरी दिली असून, देशभरातील विविध राज्यांतील नेत्यांना संघटनेत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या यादीत महाराष्ट्रातील नेत्यांनाही स्थान मिळाले आहे. (BJP OBC Morcha)

भाजपने राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय महामंत्री, राष्ट्रीय मंत्री, कोषाध्यक्ष, कार्यालय मंत्री, मीडिया संयोजक, सोशल मीडिया संयोजक आणि धोरण व संशोधन विभागातील पदांसाठी नियुक्त्या केल्या आहेत.

राष्ट्रीय उपाध्यक्षपदी एकूण सात जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये आसामचे जोगेन मोहन, ओडिशाच्या ममता मोहंता, उत्तर प्रदेशचे संगम लाल गुप्ता, महाराष्ट्राचे बबनराव रावजी चौधरी, दिल्लीचे सत प्रकाश राणा, बिहारचे डॉ. अर्जुन साहनी आणि उत्तर प्रदेशच्या संगीता बलवंत बिंद यांचा समावेश आहे.

Prakash Ambedkar : राज्य सरकारकडे पुढच्या तीन महिन्यांएवढाही धान्यसाठा नाही? प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा, म्हणाले…

महाराष्ट्रातील बबनराव चौधरींना मोठी जबाबदारी

या नियुक्त्यांमध्ये महाराष्ट्रासाठी महत्त्वाची बाब म्हणजे बबनराव रावजी चौधरी यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. याशिवाय राहुल गोविंद केंद्रे यांची राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

देशभरातील ३७ जणांना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील या दोन्ही नियुक्त्यांकडे राज्यातील भाजपच्या संघटनात्मक घडामोडींच्या दृष्टीने लक्ष वेधले जात आहे.

राष्ट्रीय महामंत्री आणि मंत्रिपदावर कोणाची नियुक्ती?

राष्ट्रीय महामंत्रीपदी गजेंद्र यादव (दिल्ली), प्रमोद मध्वराज (कर्नाटक) आणि ललित चंद्राकार (छत्तीसगड) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रीय मंत्रीपदी गुजरातचे दशरथजी ठाकोर, तमिळनाडूचे टी. वरथराजन, झारखंडचे संजीव कुमार, हरियाणाच्या सरिता जांगिड़, तेलंगणाचे कडगंची रमेश, मध्य प्रदेशचे वैभव पंवार आणि बिहारचे भीम कुमार साहू यांना संधी देण्यात आली आहे.

याशिवाय मीडिया, सोशल मीडिया तसेच धोरण आणि संशोधन विभागातही विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणीत देशभरातील नेत्यांना संधी

भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी ३७ सदस्यांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्रातून राहुल गोविंद केंद्रे यांच्यासह मुंबईतील हर्षदा फरांदे आणि डॉ. स्मिता आर. काळे यांचीही नावे कार्यकारिणी सदस्यांच्या यादीत आहेत.

तसेच ओडिशाचे प्रो. अद्वैत चरण गणनायक, दिल्लीचे युजवेंद्र सिंह चहल आणि उत्तर प्रदेशच्या अधिवक्ता सीमा समृद्धी कुशवाह यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या नव्या नियुक्त्यांमुळे भाजपच्या OBC मोर्चाच्या राष्ट्रीय संघटनात्मक रचनेत विविध राज्यांतील नेत्यांना प्रतिनिधित्व मिळाले आहे.

महत्त्वाच्या नियुक्त्यांची यादी

राष्ट्रीय उपाध्यक्ष – बबनराव रावजी चौधरी (महाराष्ट्र)
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य – राहुल गोविंद केंद्रे (महाराष्ट्र)
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य – हर्षदा फरांदे (मुंबई)
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य –  डॉ. स्मिता आर. काळे (मुंबई)

Supriya Sule : अमोल कोल्हे आणि भुजबळांच्या भेटीची चर्चा; सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात स्पष्ट केली भूमिका

💡

Frequently Asked Questions

  • Que: भाजपच्या OBC मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी महाराष्ट्रातून कोणाची नियुक्ती झाली?

    Ans: महाराष्ट्रातील बबनराव रावजी चौधरी यांची भाजप OBC मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

  • Que: भाजप OBC मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातून कोणाला संधी मिळाली?

    Ans: राहुल गोविंद केंद्रे, हर्षदा फरांदे आणि डॉ. स्मिता आर. काळे यांचा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांच्या यादीत समावेश आहे.

  • Que: भाजप OBC मोर्चाच्या नव्या नियुक्त्या कोणी जाहीर केल्या?

    Ans: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी OBC मोर्चाच्या नव्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली आहे.

Web Title: Bjp obc morcha new national office bearers list maharashtra vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 10:12 PM

Topics:  

  • bhartiya janta party
  • BJP
  • Latest Political News
  • obc

संबंधित बातम्या

Kerala Politics: भाजपला दोन दिवसांत दुसरा धक्का; पद्मजानंतर पद्मिनी थॉमस यांचाही भाजपला रामराम
1

Kerala Politics: भाजपला दोन दिवसांत दुसरा धक्का; पद्मजानंतर पद्मिनी थॉमस यांचाही भाजपला रामराम

Wardha News : पुलगावात भाजप गटनेत्याची मुजोरी? नगरपरिषद कर्मचाऱ्याच्या अंगावर दुचाकी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न
2

Wardha News : पुलगावात भाजप गटनेत्याची मुजोरी? नगरपरिषद कर्मचाऱ्याच्या अंगावर दुचाकी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

Sanjay Raut : मोदींचा राजयोग संपला? संजय राऊतांचं मोठं भाकीत, एप्रिल-मे महिन्याचा दिला इशारा!
3

Sanjay Raut : मोदींचा राजयोग संपला? संजय राऊतांचं मोठं भाकीत, एप्रिल-मे महिन्याचा दिला इशारा!

Rajasthan Panchayat Election 2026: जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय; भाजपला मोठा धक्का
4

Rajasthan Panchayat Election 2026: जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय; भाजपला मोठा धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.