
crime (फोटो सौजन्य: social media)
पत्नी भांडण करून माहेरी गेली आणि तिच्या जागी दुसऱ्या महिलेला उभ केल आणि बँकेतून पैसे काढले. हा प्रकार जेव्हा समोर आला तेव्हा बायकोने थेट पोलीसात धाव घेतली. त्यामुळे लाडक्या बहीण योजनेचे पैसे खरच महिलांना मिळतात की त्यात गोंधळ आहे? हा सवाल आता उपस्थित झाला आहे.
Wardha Crime: मानसिक रुग्णाचा नग्नावस्थेत तांडव; दंडुक्याच्या हल्ल्यात दोन ठार, पोलिसासह चौघे जखमी
बायकोला कस गंडवल ते वाचा…
विशाल चव्हाण अस या पुरूषाच नाव आहे. त्याची बायको नेहा विशाल चव्हाण या दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. नेहा ही माहेरी गेली होती. त्याने लाडक्या बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी धक्कादायक प्लान आखला आणि तो यशस्वी पण केला. त्याने एक दुसरीच महिला बँकेत बायको आहे हे दाखवलं आणि पैसे काढले.
विशाल चव्हाण याने बनावट सही केली आणि बायको असल्याचं सांगत बँकेला पण गंडवल. ११ ऑगस्ट 2025 ला त्याने डोणगाव शाखेत महाराष्ट्र ग्रामीण बँकेत दुसरी महिला उभी केली आणि तिच्या बनावट सही केल्या आणि बँक खात्यातून 2800 काढून घेतल आणि त्याने एक वेळा नव्हे तर दोन वेळा असाच गंडा घातला. विशाल चव्हाण याने दुसऱ्यांदा असंच केल. त्याच बाईला बायको म्हणून उभ केल आणि ३ नोव्हेंबर 2025 ला तीन हजार रुपये बनावट सही करून पैसे काढण्यात आले. जेव्हा हा सगळा प्रकार बायकोच्या लक्षात आला तिने थेट पोलीसात तक्रार दाखल केली आहे आणि कारवाई करण्याची मागणी केली आहे. गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
बँक म्हणते आम्ही चौकशी करू
बनावट सही करून पैसे काढले हे धक्कादायक आहे. कॅमेरा चौकशी करून आम्ही या प्रकरणात नक्की काय घडलं? हे सांगू अस बँक अधिकाऱ्यांच म्हणणं आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँक डोनगाव शाखेत हा सगळा प्रकार घडला आहे. पैसे काढण्याच्या स्लीपवर सही कोणाची आहे? हे तपासल जाईल आणि या प्रकरणात कारवाई केली जाईल अस अधिकाऱ्यांच म्हणणं आहे. मात्र पैसे काढण्यासाठी विशाल चव्हाण याने दुसरीच बायको उभी करत फसवणूक केली आहे.
Ans: बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत.
Ans: दोन वेळा बनावट सही करून पैसे काढले गेले.
Ans: पत्नीने पोलीस तक्रार केली असून बँक सीसीटीव्ही व कागदपत्रांची चौकशी करत आहे.