वैद्यकीय प्रवेशाच्या नावावर 3 लाखांनी फसवणूक
पिंपरी : ऑनलाईन पार्सलच्या नावाखाली एका महिलेची ४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना ५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ऑनलाईन घडली होती. मात्र, याप्रकरणी १७ जुलै २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
महिंद्रा बँक खाते धारक, बँक ऑफ महाराष्ट्र खाते धारक आणि मोबाईल क्रमांक धारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. तुम्हाला इराणला जाणारे पार्सल आहे, असे सांगून त्यात १५ किलो जनरिक मेडिकल आणि १५ ग्रॅम एमडी असल्याचे सांगितले. आरोपींनी फिर्यादी यांचा आधार कार्ड क्रमांक मागून स्काय ॲप डाउनलोड करण्यास सांगितले.
त्यावर गणवेशातील दोन पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणे झाल्याने फिर्यादीचा विश्वास बसला. फिर्यादीचे आयसीआयसीआय बँक खाते इतर दोन व्यक्तींशी लिंक असून त्याद्वारे मनी लाँड्रिंग केली जात असल्याचे सांगण्यात आले.
आयबीआय क्लिअरन्स आणि पोलीस व्हेरिफिकेशनसाठी आयसीआयसीआय बँकेच्या ॲपवर प्रक्रिया करण्यास सांगून त्यांच्या खात्यावर ४ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज काढून महिंद्रा बँक खाते क्रमांक ०२४५३४७३८० आणि बँक ऑफ महाराष्ट्र खाते क्रमांक ६०५१३७२९८०७ या खात्यांवर प्रत्येकी दोन लाख रुपये असे एकूण चार लाख रुपये ऑनलाईन स्वीकारून फसवणूक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
राज्यात वाढताहेत फसवणुकीच्या घटना
राज्यात फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली. ‘आमच्याकडे सरकारी टेंडर घेण्याचा परवाना आहे. त्यामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो’, असे सांगत एका व्यक्तीची दोघांनी ३ कोटी ९ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच…
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याबाबत पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार मार्केटयार्ड पोलिसांत करण आणि सोम्या बोथरा या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक दत्तात्रय वाघमारे करीत आहेत.