Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jaykumar Gore News: जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला १ कोटींची खंडणी घेताना रंगेहात अटक

दहा दिवसांची जेलवारी भोगलेल्या जयकुमार गोरे यांनी या प्रकरणात सातारा जिल्हा न्यायालयात माफीनामा सादर केल्याची माहिती आहे. मात्र, आता पुन्हा आपल्याला त्रास दिला जात असल्याची तक्रार संबंधित महिलेने केली आहे. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 21, 2025 | 10:49 AM
Jaykumar Gore News: जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला १ कोटींची खंडणी घेताना रंगेहात अटक
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात सातारा पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत तिला 1 कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना रंगेहात पकडले. चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली असून, या महिलेकडून तब्बल 3 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे उघड झाले आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जयकुमार गोरेंवर केलेल्या आरोपांचे प्रकरण संपवण्यासाठी संबंधित महिलेने तब्बल ३ कोटींची खंडणी मागितले होते. त्यानंतर या महिलेला १ कोटींची खंडणी स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली.  अटकेनंतर पोलिसांनी या महिलेची चौकशी सुरू केली आहे. संबंधित महिलेने जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर विरोधकांनीही या प्रकरणी गोरेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती.  पण आता आरोप करणाऱ्या महिलेनेच हे प्रकरण मिटवण्यासाठी खंडणी मागितल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण मिळण्याची शक्यता आहे.

Nagpur Violence Update: नागपूर हिंसाचारानंतर मौलवींचे पत्र; अमित शहांकडे केली मोठी मागणी

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील वारस असल्यानेच भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी 2016 पासून आपल्याला त्रास होते. आपल्याला त्रास देण्यासाठी त्यांनी त्यांचे नग्न फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवले, असा आरोप संबंधित महिलेने केला होता. या त्रासाला कंटाळून महिलेने सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यावेळी अटक टाळण्यासाठी गोरेंनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. पण त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांना अटक कऱण्यात आली होती. त्यावेळी जयकुमार गोरे यांना दहा दिवसांची जेलमध्येही जावं लागल्याचे महिलेने सांगितले होते.

दहा दिवसांची जेलवारी भोगलेल्या जयकुमार गोरे यांनी या प्रकरणात सातारा जिल्हा न्यायालयात माफीनामा सादर केल्याची माहिती आहे. मात्र, आता पुन्हा आपल्याला त्रास दिला जात असल्याची तक्रार संबंधित महिलेने केली आहे.  2016 मध्ये दाखल केलेली तक्रार 2025 पासून व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल केली जात आहे, ज्यामुळे तिचे नाव उघड झाले आहे. तसेच, आपल्यावर दबाव आणण्यासाठी गोरे यांनी आपल्या पीए अभिजित काळे मार्फत खोटी तक्रार दाखल करत 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोपही या महिलेने केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, दोन्ही बाजूंचे दावे तपासले जात आहेत.

रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेवर अत्याचार; जीवे मारण्याची धमकी देऊन निर्जनस्थळी नेलं

Web Title: Woman who accused jayakumar gore arrested red handed while taking rs 1 crore ransom nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 10:49 AM

Topics:  

  • BJP MLA Jaykumar Gore

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामास मंजुरी; पुणे जिल्ह्यातील ‘या’ 25 गावांचा समावेश
1

ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामास मंजुरी; पुणे जिल्ह्यातील ‘या’ 25 गावांचा समावेश

ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, राजकीय पोळी भाजणाऱ्यांचा…; मंत्री जयकुमार गोरे नेमकं काय म्हणाले?
2

ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, राजकीय पोळी भाजणाऱ्यांचा…; मंत्री जयकुमार गोरे नेमकं काय म्हणाले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.