संभाजीनगरमध्ये ग्रामसेविकेवर अत्याचार; विविध ठिकाणी नेत अश्लील व्हिडिओ, फोटही काढले (फोटो सौजन्य: iStock)
अमरावती : धारणी येथील कारा गावात आयोजित यात्रेतून घरी परतणाऱ्या महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याची घटना मंगळवारी (दि. 18) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. याप्रकरणी 45 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी आरोपी शिवलाल छोटेलाल धांडे (वय 21, रा. रक्षा, धारणी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
धारणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रक्षा येथे राहणारी महिला आपल्या दोन मुलांसह दुचाकीवर ट्रिपलसीट कारागाव येथे आयोजित यात्रेला गेली होती. तेथून परतत असताना महिलेने भांडे विकत घेतले होते. दुचाकीवर जागा नव्हती. त्यामुळे महिलेने आपल्या दोन्ही मुलांना दुचाकीवर पाठवले आणि ती पायी येत होती. यावेळी आरोपी शिवलाल तिच्या मागून आला. मी तुझ्या पाठीशी आहे, तू घाबरू नकोस असे त्या महिलेला म्हणाला.
यानंतर काही अंतरावर पायी जात असताना अचानक आरोपीने महिलेला बळजबरीने रस्त्याच्या कडेला नेले व जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केला व घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर महिलेने धारणी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने पोलिसांनी आरोपी शिवलालविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पुण्यातील शिरूरमध्येही अत्याचाराची घटना
पुणे जिल्ह्यातील न्हावरा (ता.शिरुर) येथील अल्पवयीन महाविद्यालयीन युवतीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित युवती महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी चाललेली असताना गावातील कुणाल गारगोटे हा युवतीजवळ आला. त्याने युवतीशी बोलत ‘मी तुला कॉलेजला सोडतो’ असे म्हणून दुचाकीहून युवतीला बळजबरीने शिरुर येथील एका हॉटेलमध्ये घेऊन जात युवतीवर अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा युवतीला न्हावरा येथे आणून सोडून देऊन कुणाल निघून गेला.
गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये सातत्याने वाढ
राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. असे असताना आता अमरावतीत रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेवर अत्याचार करण्या आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.