काय घडलं नेमकं?
शिवानी पंकज जाधव असे मृतदेह आढळून आलेल्या चिमुरडीचा नाव आहे. शिवानी ही २० मार्च रोजी बेपत्ता झाली होती. पोलिसांनी तिच्या तपासाला सुरवात केली. या प्रकरणात यवतमाळ जिल्हा पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यस्तही २५ हजार रुपयांचे बक्षीस देखील जाहीर केले होते. कोणालाही कसलाही सुगावा न लागू देता गावातील सर्व घरांचा शोध घेण्यात आला होता.
सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली होती. याचदरम्यान, पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने आपला तपास देखील करण्यात आला. श्वान पथक एकाच ठिकाणी दोनदा थांबले, ज्यामुळे पोलिसांचा संशय अधिक वाढला. पोलिसांच्या सांगण्यावरून गावातील एकूण एक घराची झडती सुरु झाली.
गावाचे पाटील आणि काही नागरिकांच्या उपस्थितीत शोधमोहीम सुरु केली.
एका पोत्यात सापडला मृतदेह
सोनू विलास जाधव आणि कैलाश विलास जाधव यांच्या घरात शिवणीचा मृतदेह एका पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेनं गावात एकच खळबळ माजली. मृतदेह तात्काळ शवविच्छेदनासाठी दरवा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. या घटनेनं बोथ गावासह संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाची लाट उसळली आहे.
भररस्त्यात चाकू हल्ला; पाठीत अडकला चाकू, तरीही ‘साधा गुन्हा’ नोंद
यवतमाळ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भररस्त्यात एका तरुणावर चाकू हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. चाकू थेट पाठीत खुपसल्याने अडकला, तरुण अश्या स्थितीत थेट शासकीय रुग्णालयात पोहोचला.चाकू अडकल्याने त्याचा जीव वाचला. मात्र दुखापत गंभीर नसल्याने पोलिसांनी या प्रकरणाची तीव्रताच कमी करून टाकत साधा मारहाणीचा गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकारामुळे शहरात चर्चांना उधाण आलं आहे.
Akola Crime: अकोल्यात बेपत्ता 11 वर्षीय मुलाचा मृतदेह नाल्यात आढळला; शहरात खळबळ, तपास सुरू
Ans: यवतमाळ जिल्ह्यातील दरवा तालुक्यातील बोथ गावात.
Ans: 20 मार्चपासून ती बेपत्ता होती.
Ans: संशयितांना ताब्यात घेऊन सखोल तपास सुरू केला आहे.






