Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yavatmal Rod Attack: यवतमाळमध्ये खासगी वाहनचालकाची मुजोरी! साईड देण्यावरून बसचालकाला लोखंडी रॉडने केली मारहाण

Yavatmal Rod Attack: यवतमाळमधील महागाव बसस्थानकाबाहेर एक अतिशय संतापजनक प्रकार समोर आला आहे. साईड देण्यावरून झालेल्या वादातून एका खासगी प्रवासी वाहनचालकाने मानव विकास बसच्या चालकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या घटनेमुळे २० विद्यार्थिनी तासाभर रखडल्या असून व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 27, 2026 | 04:36 PM
Yavatmal Rod Attack: यवतमाळमध्ये खासगी वाहनचालकाची मुजोरी! साईड देण्यावरून बसचालकाला लोखंडी रॉडने केली मारहाण

Yavatmal Rod Attack: यवतमाळमध्ये खासगी वाहनचालकाची मुजोरी! साईड देण्यावरून बसचालकाला लोखंडी रॉडने केली मारहाण

Follow Us
Follow Us:
  • महागावमध्ये साईड देण्यावरून खासगी चालकाकडून बसचालकाला मारहाण
  • या वादामुळे विद्यार्थिनींना घरी जाण्यासाठी तासाभर प्रतीक्षा करावी लागली
  • जखमी चालकाच्या तक्रारीवरून महागाव पोलिसांत गुन्हा दाखल
Yavatmal Rod Attack: यवतमाळ जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. महागाव बसस्थानकाबाहेर साईड देण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून एका खासगी प्रवासी वाहनचालकाने थेट मानव विकास बसच्या चालकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीच्या थरारामुळे बसमधील शाळकरी विद्यार्थिनींना घरी जाण्यासाठी नाहक तासाभर प्रतीक्षा करावी लागली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत असून परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

हेही वाचा: Gold Jewellery Theft: रास्ता पेठेत घरफोडी, तर लोणी काळभोरमध्ये पावणेतीन लाखांच्या दागिन्यांवर डल्ला; पुण्यात भीतीचे वातावरण

कशी घडली घटना? साईड देण्यावरून झाला वाद

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, महागाव ते सेनद मार्गावर विद्यार्थिनींची वाहतूक करणारी मानव विकास बस (क्र. एमएच ४० वाय ५४१० / एमएच ४० वाय ५४०६) महागाव बसस्थानकाबाहेर आली होती. यादरम्यान एमएच २८ एएन ३०२९ क्रमांकाच्या एका खासगी प्रवासी वाहनाच्या चालकासोबत साईड देण्यावरून वाद झाला. बसचालक ज्ञानेश्वर वानखेडे यांनी आपले वाहन बाजूला घेण्यास सांगितल्यानंतर खासगी वाहनचालकाचा राग अनावर झाला आणि वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात त्या खासगी वाहनचालकाने लोखंडी रॉड काढून बसचालक ज्ञानेश्वर वानखेडे यांना बेदम मारहाण केली आणि घटनास्थळावरून पोबारा केला.

हेही वाचा: ATM Theft Attempt: मध्यरात्री संधी साधून एटीएममध्ये शिरले चोरटे; पुण्यात पैशांसाठी मशीनचीच केली प्रचंड नासधूस

विद्यार्थिनींची गैरसोय अन् पोलिसांनी दाखविले तत्परता

या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे बसमधील विद्यार्थिनी प्रचंड घाबरल्या होत्या. बसचालक जखमी झाल्यामुळे महागाव ते सेनद मार्गावरील सुमारे २० विद्यार्थिनींना घरी जाण्यासाठी तब्बल तासभर प्रतीक्षा करावी लागली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महागावचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी बसचालक ज्ञानेश्वर वानखेडे यांची समजूत काढली व त्यांना धीर दिला. त्यानंतर धाडसी चालक वानखेडे यांनी स्वतःची प्रकृती बरी नसतानाही पुन्हा बसचा ताबा घेत सर्व विद्यार्थिनींना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचविले. जखमी चालकाची प्रकृती सध्या चांगली असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी बसचालकाच्या तक्रारीवरून महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही मारहाणीची घटना कुठे घडली?

    Ans: यवतमाळ जिल्ह्यातील महागाव बसस्थानकाबाहेर ही घटना घडली.

  • Que: वादाचे नेमके कारण काय होते?

    Ans: महागाव ते सेनद मार्गावर वाहन नेताना 'साईड देण्यावरून' खासगी प्रवासी वाहनचालक आणि बसचालकात वाद झाला.

  • Que: घटनेनंतर विद्यार्थिनींचे काय झाले?

    Ans: बसचालक जखमी झाल्यामुळे २० विद्यार्थिनींना घरी जाण्यासाठी तासभर प्रतीक्षा करावी लागली, मात्र नंतर चालकाने सुरक्षित घरी सोडले.

Web Title: Yavatmal mahagaon bus stand driver assault iron rod private vehicle dispute news sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 04:36 PM

Topics:  

  • bus
  • Bus Driver
  • Yavatmal Crime
  • yavatmal news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.