Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: वाघाच्या पिंजऱ्यात शिरला, अन् पुढच्याच क्षणी वाघाचा हल्ला; घटनास्थळी व्यक्तीचा मृत्यू

वाघाच्या पिंजऱ्यात शिरल्यानंतर पुढच्या काही क्षणांतच थरारक घटना घडली. यॉर्कशायर वाइल्डलाइफ पार्कमध्ये वाघाने एका व्यक्तीवर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला वैद्यकीय पथकाने घटनास्थळीच मृत घोषित केले. दरम्यान, हल्ल्यानंतर वाघ सुरक्षित असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 11, 2026 | 02:59 PM
Accident News: वाघाच्या पिंजऱ्यात शिरला, अन् पुढच्याच क्षणी वाघाचा हल्ला; घटनास्थळी व्यक्तीचा मृत्यू

Accident News: वाघाच्या पिंजऱ्यात शिरला, अन् पुढच्याच क्षणी वाघाचा हल्ला; घटनास्थळी व्यक्तीचा मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • यॉर्कशायर वाइल्डलाइफ पार्कमध्ये वाघाच्या पिंजऱ्यात व्यक्तीने केला प्रवेश
  • वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू
  • वाघ सुरक्षित; घटनेचे व्हिडिओ शेअर न करण्याचे प्रशासनाचे आवाहन
 

यॉर्कशायर : इंग्लंडमधील यॉर्कशायर वाइल्डलाइफ पार्कमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. वाघाच्या पिंजऱ्यात प्रवेश केलेल्या एका व्यक्तीवर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शनिवारी दुपारी सुमारे 1.30 वाजता डोनकास्टरजवळील यॉर्कशायर वाइल्डलाइफ पार्कमध्ये ही घटना घडली. साउथ यॉर्कशायर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने वाघाच्या एन्क्लोजरमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर वाघाने त्याच्यावर हल्ला केला. आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. मात्र, वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करूनही त्या व्यक्तीला घटनास्थळीच मृत घोषित करण्यात आले. मृताच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.

वाघाने केला हल्ला

घटनेनंतर सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये वाघ संबंधित व्यक्तीवर पंजाने हल्ला करताना आणि त्याच्याशी झटापट करताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, प्रशासनाने हे अस्वस्थ करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर न करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, वाघाच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर विविध अफवा पसरत होत्या. पोलिसांनी या अफवांना पूर्णविराम देत वाघ सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले. हल्ल्यानंतरही वाघ आपल्या एन्क्लोजरमध्येच असून त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. त्यामुळे पार्कमधील इतर नागरिकांना कोणताही धोका नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा: रुग्णवाहिका हॉस्पिटलमध्ये पोहोचली, पण पुढच्याच क्षणी घडलं धक्कादायक; नागरिकांनी चालकाला धरलं धारेवर

नेमके काय घडले? प्रशासनाचा तपास सुरू

यॉर्कशायर वाइल्डलाइफ पार्कनेही या घटनेला ‘गंभीर घटना’ असल्याचे म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच पार्कची आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा तातडीने सक्रिय करण्यात आली. आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या असून, नेमके काय घडले याचा तपास प्रशासनासोबत मिळून केला जात असल्याचे पार्ककडून सांगण्यात आले. अभ्यागत, कर्मचारी आणि प्राण्यांची सुरक्षा व कल्याण ही पार्कची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू असून, व्यक्तीने वाघाच्या एन्क्लोजरमध्ये प्रवेश कसा केला, याबाबतही चौकशी केली जात आहे.

Web Title: Yorkshire wildlife park tiger attack man dies after entering enclosure sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • kills
  • tiger

संबंधित बातम्या

कोल्हापुरात खळबळ! गोड बोलून कड्यावर नेलं, काही तासांत रचला बेपत्ता होण्याचा बनाव; चौकशीत प्रियकराचं भयंकर सत्य उघड
1

कोल्हापुरात खळबळ! गोड बोलून कड्यावर नेलं, काही तासांत रचला बेपत्ता होण्याचा बनाव; चौकशीत प्रियकराचं भयंकर सत्य उघड

Crime News: ‘दृश्यम’ पाहून वडिलांच्या हत्येचा कट; एक फोन कॉल ठरला घातक, मुलगा पोलिसांच्या जाळ्यात
2

Crime News: ‘दृश्यम’ पाहून वडिलांच्या हत्येचा कट; एक फोन कॉल ठरला घातक, मुलगा पोलिसांच्या जाळ्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.