अपहरण झालेल्या बालकाची दोन तासात सुटका
अमरावती : दुचाकीवर आलेल्या सात जणांनी कारमधील एका तरुणाचे अपहरण केल्याची घटना गुरुवारी (दि. 15) मध्यरात्री घडली. मिर्झा शाहिद बेग मिर्झा अमीर बेग (40, छाया नगर) यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिर्झा शकील (वय 42) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिर्झा शाहिद बेग (रा. छाया नगर) हे मोबाईलचे दुकान चालवितात.
हेदेखील वाचा : डोळे, चेहरा आणि गुप्तांगावर जखमा…,लैगिंक अत्याचारानंतर हत्या! कोलकात्याच्या ‘निर्भया’ हत्येचे गुढ असे उकलले
15 मार्च रोजी त्याचा मोठा भाऊ मिर्झा शकील दुकानात आला आणि त्याने कामावर जाण्याबाबत विचारणा केली. मात्र, तो घरी न परतला नाही. त्यामुळे तो बेपत्ता झाल्याची तक्रार नागपुरीगेट पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. 14 ऑगस्ट रोजी बैतुल येथील रहिवासी मिर्झा शाहिद बेग यांचा जावई नावेद हाश्मी याचा फोन आला की, शकील बैतूलच्या उमरी दर्याजवळ आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे, 15 ऑगस्ट रोजी मिर्झा शाहिद बेग, त्याची पत्नी आणि ड्रायव्हरसह कारने बैतूलला गेले. त्यानंतर ते त्याला घेऊन 16 ऑगस्ट रोजी रात्री 12.10 वाजता भावासोबत नवसारी चौकात पोहोचले. येथे तीन दुचाकींवर असलेले सात जण कारचा मागोवा घेत होते.
तसेच त्यांनी त्यांच्या बेकरीजवळ कारसमोर उभी केली असता, सात अनोळखी तरुणांनी कारजवळ येऊन चालकाजवळ बसलेल्या मिर्झा शकीलला शिवीगाळ केली आणि चाकूचा धाक दाखवत कारमधून बाहेर काढले.
हेदेखील वाचा : लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर लैंगिक अत्याचार; शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी न्यायचा अन्…