डोळे, चेहरा आणि गुप्तांगावर जखमा...,लैगिंक अत्याचारानंतर हत्या! कोलकात्याच्या 'निर्भया' हत्येचे गुढ असे उकलले (फोटो सौजन्य-ट्विटर)
पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजच्या आपत्कालीन इमारतीच्या चौथ्या मजल्यावर शुक्रवारी (9 ऑगस्ट) सकाळी एका महिला डॉक्टरचा मृतदेह दिसून आला. तिच्या प्राथमिक पोस्टमार्टम अहवालात लैंगिक अत्याचारानंतर तिची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटकही केली आहे.
यासंदर्भात पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, आरोपी व्यक्ती रुग्णालयाशी संबंधित नाही, परंतु तो वारंवार वैद्यकीय संस्थेच्या विविध विभागांना भेट देत असे. “आम्ही एका व्यक्तीला अटक केली आहे, जो बाहेरचा आहे. त्याच्या संशयास्पद हालचालींवरून असे दिसते की तो गुन्ह्यात सहभागीहोता,” असे पोलीस अधिकारी म्हणाले. तसेच पीजीटी डॉक्टरच्या मृत्यूच्या तपासासंदर्भात पोलिसांनी शुक्रवारी रात्री दोन इंटर्न डॉक्टरांचीही चौकशी केली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “हे निश्चितपणे आत्महत्येचे प्रकरण नाही. लैंगिक अत्याचारानंतर महिलेची हत्या करण्यात आली आहे.”
चार पानांच्या अहवालानुसार, महिलेच्या प्रायव्हेट पार्टवर जखमा झाला असून रक्तस्त्राव होत होता आणि तिच्या शरीराच्या इतर भागांवर जखमांच्या खुणा होत्या, असे पीटीआयने प्राथमिक पोस्टमॉर्टम अहवालाचा हवाला देत म्हटले आहे. तसचे “तिच्या डोळ्यातून आणि तोंडातून रक्तस्त्राव होत होता, तिच्या चेहऱ्यावर आणि नखांवर जखमांच्या खुणा होत्या. तिचे पोट, डावा पाय, मान, उजवा हात, अनामिका आणि तिथे ओठांवरही जखमेच्या खुणा होत्या.. हा गुन्हा पहाटे 3 ते 6 च्या दरम्यान घडला. या हत्येचा तपास करण्यासाठी कोलकाता पोलिसांनी एसआयटीही स्थापन केली आहे.
मृत सापडलेला प्रशिक्षणार्थी डॉक्टर चेस्ट मेडिसिन विभागाचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होती आणि गुरुवारी रात्रीच्या ड्युटीवर तैनात होता. प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळून आल्या.
आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातील ज्युनियर डॉक्टर सोबत गुरुवारी रात्री भयंकर प्रकार घडला आहे. मृत झालेली तरुणी मेडिकल कॉलेजात छाती विकार विभागात मेडीकलच्या द्वितीय वर्षाला होती. ही घटना कोलकाता शहरातील वर्दळीच्या लालबाजार येथे घडली आहे. गुरुवारी रात्री 12 वाजल्यानंतर ही महिला डॉक्टर ड्यूटीवर होती. तिने मित्रांसोबत डीनर देखील केला. त्यानंतर ती बेपत्ता झाली. शुक्रवारी सकाळी चौथ्या मजल्यावर सेमिनार हॉलमध्ये या अर्धनग्न अवस्थेत या महिला डॉक्टरचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली. घटनास्थळावरुन तिचा मोबाईल आणि लॅपटॉप देखील मिळाला आहे.
पोलिसांना एका ठिकाणी ब्ल्यू टुथ हेडफोनची तुटलेली वायर सापडली. सीसीटीव्ही पुन्हा चेक केले तर संजय रुग्णालयात आला तेव्हा त्याच्या गळ्यात ब्ल्यू टुथ हेडफोन होता.चौथ्या मजल्यावर पोलिसांना हा ब्ल्यू टुथ सापडला. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना मात्र संजय रॉय याच्या गळ्यात ब्ल्युटुथ नसल्याचे उघड झाल्याने हा ब्ल्युटुथ त्याचाच असल्याचे पोलिसांना कळाले.
आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या पीजीटी डॉक्टरांनी इमर्जन्सी वॉर्ड वगळता सर्व विभागांमध्ये काम बंद केले आहे, दोषींना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे. महिला डॉक्टरच्या मृत्यूची त्वरीत चौकशी करण्याची मागणी करत अनेक विद्यार्थी संघटनांनी मोर्चा काढला.