
Delhi Blast : दिल्ली स्फोटप्रकरणातील मोठी अपडेट; 68 मोबाईल जप्त, स्फोटापूर्वी घटनास्थळी...
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ गेल्या सोमवारी (दि.10) एक मोठा बॉम्बस्फोट झाला. यामध्ये जीवितहानीसह वित्तहानीही झाली. या बॉम्बस्फोटाच्या तपासादरम्यान पोलिसांनी काही धक्कादायक पुरावे शोधून काढले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनहरी बाग पार्किंग लॉट आणि बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी एकूण 68 संशयास्पद मोबाईल नंबर सक्रिय होते. हे 68 मोबाईल नंबर आता तपासाचे केंद्रबिंदू बनले आहेत. या नंबरवर पाकिस्तान आणि तुर्कीमधून कॉल आले होते.
पाकिस्तान आणि तुर्कीमधून येणारे कॉल, इंटरनेट रूटिंग आणि परदेशी सर्व्हरशी जोडणाऱ्या फोनवर विशेष देखरेख सुरू करण्यात आली आहे. स्फोटानंतर, पोलिसांनी सुनहरी बाग आणि लाल किल्ल्याजवळील मोबाईल टॉवरमधून डंप डेटा गोळा केला. या डेटामधून अनेक तांत्रिक तपशील उघड झाले आहेत. या डेटाच्या आधारे आता तपास सुरू आहे. स्फोटापूर्वी संशयास्पद नंबरद्वारे भारतीय नेटवर्कवर असामान्य डेटा स्पाइक रेकॉर्ड करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. सर्वात महत्त्वाची माहिती तपशीलवार फोन मॅपिंगद्वारे मिळाली.
डॉ. उमर याची कार सुनहरी बाग पार्किंग लॉटमध्ये तीन तासांहून अधिक काळ पार्क करण्यात आली होती, त्या दरम्यान, ३० मीटरच्या परिघात १८७ फोन नंबर सक्रिय आढळले. याशिवाय, बॉम्बस्फोटाच्या पाच मिनिटे आधी आणि पाच मिनिटे नंतर बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी एकूण ९१२ फोन सक्रिय आढळले. दोन्ही ठिकाणांच्या डिजिटल लोकेशन हिट्रीची जुळणी केल्यास असे ६८ मोबाइल नंबर आढळले जे एकाच वेळी दोन्ही ठिकाणी सक्रिय होते. हे ६८ नंबर तपासाचा केंद्रबिंदू बनले आहेत.
अनेक मोबाईल परदेशी सर्व्हरशी कनेक्ट?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी बरेच नंबर एकाच परदेशी सर्व्हरशी जोडलेले आहेत, ज्यामुळे पाकिस्तान आणि तुर्की या दोन्ही देशांमध्ये आयपी क्लस्टर्समध्ये वारंवार स्विचिंग होत असल्याचे दिसून आले आहे. या कनेक्शनसाठी वेगवेगळे प्रॉक्सी सर्व्हर वापरले गेले असल्याचा संशय तपास संस्थांना आहे.
फोन कॉल्सची तपासणी होणार
तसेच, स्फोटाच्या काही मिनिटांपूर्वी कोणते फोन कोणत्या परदेशी IP अॅड्रेसशी जोडले गेले होते याचा तपास यंत्रणा तपास करत आहेत. सुरुवातीच्या तपासात घटनास्थळी दोन फोन आढळले आहेत ज्यात मिनिट-दर-मिनिट लोकेशन बदल दिसून आले.
हेदेखील वाचा : Delhi Bomb Blast प्रकरणात आरोग्य विभागाने केली मोठी कारवाई; 3 डॉक्टरांबाबत उचलले ‘हे’ मोठे पाऊल