Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Blast : राजधानी दिल्लीतील स्फोट पूर्वनियोजितच; फॉरेन्सिक तपासातून धक्कादायक माहिती समोर…

दिल्लीत झालेला स्फोट इतका शक्तिशाली होता की, यातील बाधिकांच्या शरीराचे अवयव अक्षरश: वेगळे झाल्याचे दिसून आले. जवळच्या वाहनांच्या खिडक्याही फुटल्या. स्फोटाचा आवाज चार किलोमीटर अंतरावर असलेल्या आयटीओ चौकापर्यंत ऐकू आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 11, 2025 | 07:22 AM
हल्ला तांत्रिकदृष्ट्या आणि पद्धतशीरपणे नियोजित होता;

हल्ला तांत्रिकदृष्ट्या आणि पद्धतशीरपणे नियोजित होता;

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत सोमवारी सायंकाळी एक मोठा स्फोट झाला. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळील गर्दीच्या परिसरात झालेल्या शक्तिशाली कार स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे. तर 24 जण जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे अनेक वाहनांना आग लागली. प्राथमिक तपासात दहशतवादी हल्ला असल्याचा संशय आहे.

दिल्लीत झालेला स्फोट इतका शक्तिशाली होता की, यातील बाधिकांच्या शरीराचे अवयव अक्षरश: वेगळे झाल्याचे दिसून आले. जवळच्या वाहनांच्या खिडक्याही फुटल्या. स्फोटाचा आवाज चार किलोमीटर अंतरावर असलेल्या आयटीओ चौकापर्यंत ऐकू आला. लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामुळे राजधानी दिल्लीत भीतीचे वातावरण आहे. फॉरेन्सिक तपासणीत, हा स्फोट यापूर्वी पाहिलेल्या कोणत्याही हल्ल्यापेक्षा तांत्रिकदृष्ट्या आणि पद्धतशीरपणे नियोजित होता. एनएसजी, एनआयए आणि एफएसएल पथके घटनास्थळी तैनात आहेत आणि प्रत्येक पुराव्याची वैज्ञानिकदृष्ट्या तपासणी केली जात आहे.

हेदेखील वाचा : ‘पार्किंग नाही, स्लो मूव्हिंग कारमध्ये झाला ब्लास्ट, आत लोक…’, दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलचांचा खुलासा

स्फोट होण्यापूर्वीच्या प्रत्येक मिनिटाचे स्पष्ट चित्र तयार करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल नेटवर्क डेटा गोळा केला जात आहे. जवळच्या मोबाईल टॉवर्समधील रेकॉर्ड आणि ड्रोन हालचालींच्या संभाव्य खुणा देखील तपासल्या जात आहेत. लाल किल्ला केवळ एक ऐतिहासिक स्मारक नाही तर भारताच्या सार्वभौमत्वाचे प्रतीक देखील आहे. अशा ठिकाणी झालेल्या स्फोटावरून भीतीचे वातावरण पसरले आहे.

सुरक्षा यंत्रणांकडून अनेक बाजूंनी तपास

एनआयए आणि एफएसएल पथके वैज्ञानिक पद्धतीने प्रत्येक पुराव्याचे सखोल विश्लेषण करत आहे. जवळच्या मोबाईल टॉवर्स, रेडिओ सिग्नल आणि संभाव्य ड्रोन फ्रिक्वेन्सीवर तपास सुरू आहे. फॉरेन्सिक प्रयोगशाळा धातू आणि स्फोटकांच्या नमुन्यांचे सूक्ष्म-विश्लेषण आणि रासायनिक चाचणी करत आहेत.

लेस्टेट टेक्नॉलॉजीचा वापर

या स्फोटाला अत्याधुनिक म्हटले जात आहे. कारण या स्फोटात एकाच वेळी अनेक लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर केल्याचे दिसून आले. वापरलेले स्फोटक अत्यंत शक्तिशाली होते, जे कमी प्रमाणात देखील मोठे नुकसान करू शकले. विशिष्ट वेळी आणि ठिकाणी अचूकपणे स्फोट होण्यासाठी रिमोट किंवा सेन्सर-आधारित ट्रिगरने हा स्फोट घडवल्याचेही संकेत आहेत.

पंतप्रधान मोदींकडून घटनेची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेवर शोक व्यक्त केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून त्यांनी यासंदर्भात माहिती घेतल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गृहमंत्री शहा यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. त्यांनी स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल शोक व्यक्त केला. यातील जखमी लवकर बरे व्हावे, अशी मी प्रार्थना करतो.

Web Title: Blast in capital delhi was pre planned forensic investigation reveals shocking information

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 07:12 AM

Topics:  

  • Blast in Delhi
  • Delhi blast
  • Delhi news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.