Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! दिल्लीतील ‘जुन्या’ वाहनांवरील बंदी उठवली, मंत्री सिरसा यांनी घेतला होता आक्षेप

दिल्लीसह एनसीआरमध्ये १ जुलैपासून लागू करण्यात आलेल्या 'एंड ऑफ लाइफ व्हेईकल' (ELV) नियमांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी या नव्या धोरणातील त्रुटी दाखवत आक्षेप घेतला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 03, 2025 | 06:18 PM
मोठी बातमी! दिल्लीतील 'जुन्या' वाहनांवरील बंदी उठवली, मंत्री सिरसा यांनी घेतला होता आक्षेप

मोठी बातमी! दिल्लीतील 'जुन्या' वाहनांवरील बंदी उठवली, मंत्री सिरसा यांनी घेतला होता आक्षेप

Follow Us
Close
Follow Us:

दिल्लीसह एनसीआरमध्ये १ जुलैपासून लागू करण्यात आलेल्या ‘एंड ऑफ लाइफ व्हेईकल’ (ELV) नियमांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. दिल्ली सरकारचे पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी या नव्या धोरणातील त्रुटी दाखवत Commission for Air Quality Management (CAQM) कडे पत्राद्वारे आक्षेप नोंदवले असून, या धोरणाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे.

Bageshwar Dham : बागेश्वर धाम परिसरात कोसळला मंडप , एका भाविकाचा मृत्यू तर अनेक जण जखमी, अपघात कसा झाला?

सिरसा यांनी स्पष्ट केलं की, जुनी वाहने बंद करण्याचा निर्णय केवळ त्यांच्या वयाच्या आधारे न घेता त्या वाहनांचा प्रदूषण स्तर काय आहे, यावर आधारित असावा. यासंदर्भात सरकार एक नवीन प्रणाली विकसित करत आहे, ज्यामुळे ना नागरिकांची वाहनं जबरदस्तीने जप्त केली जातील, ना वायू प्रदूषण वाढेल. “हे धोरण संपूर्ण एनसीआरमध्ये एकसंध पद्धतीने लागू केल्याशिवाय प्रभावी होऊ शकत नाही,” असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता सरकारमधील मंत्री प्रवेश वर्मा यांनी देखील यावर टीका करत, ELV नियम लागू करताना योग्य नियोजन आणि तयारी नसल्याचा आरोप केला. “दिल्लीचे नागरिक आधीच वाहतुकीच्या आणि प्रदूषणाच्या समस्यांनी त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत अचानक आणि पूर्ण तयारीशिवाय असे नियम लागू करणे म्हणजे जनतेवर अतिरिक्त ताण आणण्यातला प्रकार आहे,”  त्यामुळे वाहनांची स्थिती आणि प्रदूषणाची पातळी पाहूनच निर्णय व्हायला हवा. केवळ वाहनाच्या वयावर आधारित निर्णय चुकीचा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दिल्ली सरकार आणि CAQM यांच्यात लवकरच यासंदर्भात बैठक होणार असून, यामध्ये नियमांची अंमलबजावणी कशी करावी, यावर व्यापक चर्चा होणार आहे. प्रवेश वर्मा यांनी यामध्ये सर्व संबंधित भागांचा समावेश असावा आणि एकसंध धोरण तयार व्हावे, अशी मागणी केली आहे.

याचवेळी, या नव्या नियमाविरुद्ध Delhi Petrol Dealers Association ने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांच्या वकिलांनी न्यायालयात स्पष्ट केलं की, पेट्रोल पंप चालक कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा नाहीत, आणि तरीही त्यांच्यावर नियम लागू करण्याची जबाबदारी टाकली जात आहे. “जर एखाद्या वाहनाला चुकून इंधन दिलं गेलं, तर पंप चालकांना शिक्षा केली जात आहे, ही गोष्ट अन्यायकारक आहे,” असा युक्तिवाद करण्यात आला.

Karnataka CM : कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांदरम्यान सिद्धारमय्यांची चतुर खेळी; दोन शहरांची नावंच बदलली

न्यायालयाने दिल्ली सरकार आणि CAQM यांना सप्टेंबर २०२५ पर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले असून, या कालावधीत पेट्रोल पंप चालकांविरुद्ध कोणतीही कारवाई झाल्यास, त्याबाबत न्यायालयाला तत्काळ माहिती देण्याचे आदेशही दिले आहेत.

ELV धोरणानुसार, १ जुलै २०२५ पासून दिल्लीमध्ये १० वर्षांहून जुनी डिझेल वाहने आणि १५ वर्षांहून जुनी पेट्रोल वाहने यांना इंधनपुरवठा न करण्याचा आदेश लागू झाला होता. सीएनजी वाहनांना मात्र यामधून सूट देण्यात आली आहे. दिल्ली वाहतूक विभाग आणि पोलीस मिळून या अंमलबजावणीसाठी एकत्रित काम करत होते. मात्र आता या निर्णयावर तात्पुरती स्थगिती आणण्यात आली आहे.

Web Title: Delhi old vehicles band lifted minister pravesh verma said pollution status looked not age

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 06:08 PM

Topics:  

  • Delhi news
  • Delhi Pollution
  • Electric Vehicles

संबंधित बातम्या

Big Breaking: ८ आठवड्यांत त्यांना पकडा आणि…; सुप्रीम कोर्टाचा भटक्या कुत्र्यांबाबत दिल्ली सरकारला महत्वाचा आदेश
1

Big Breaking: ८ आठवड्यांत त्यांना पकडा आणि…; सुप्रीम कोर्टाचा भटक्या कुत्र्यांबाबत दिल्ली सरकारला महत्वाचा आदेश

New Delhi Hit and Run: दिल्लीतील चाणक्यपुरीत हिट अँड रन: 26 वर्षीय तरूणाने मद्यधुंद अवस्थेत दोघांना चिरडले
2

New Delhi Hit and Run: दिल्लीतील चाणक्यपुरीत हिट अँड रन: 26 वर्षीय तरूणाने मद्यधुंद अवस्थेत दोघांना चिरडले

चेन हिसकावली, कपडे फाडले; दिल्लीत काँग्रेसच्या महिला खासदाराला लुटलं
3

चेन हिसकावली, कपडे फाडले; दिल्लीत काँग्रेसच्या महिला खासदाराला लुटलं

‘JNU’ मध्ये फडणवीसांच्या कार्यक्रमाला SFI चा विरोध; उपाध्येंचे प्रत्युत्तर; म्हणाले, “डाव्यांच्या विद्यार्थी…”
4

‘JNU’ मध्ये फडणवीसांच्या कार्यक्रमाला SFI चा विरोध; उपाध्येंचे प्रत्युत्तर; म्हणाले, “डाव्यांच्या विद्यार्थी…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.