Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Election 2025 : निकालाआधी ‘१५ कोटी’वरून दिल्लीत हाय व्होल्टेज ड्रामा; पक्ष फोडण्यावरून आपचे संजय सिंह माध्यमांसमोर कडाडले

उमेदवारांना १५ कोटींची ऑफर का दिली जात आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला होता. त्यानंतर दिल्लीच्या राजकारणात निकालाआधी मोठ्या राजकीय घडामोडी घडत असून संजय सिंह यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 07, 2025 | 05:30 PM
निकालाआधी '१५ कोटी'वरून दिल्लीत हाय व्होल्टेज ड्रामा; पक्ष फोडण्यावरून आपचे संजय सिंह माध्यमांसमोर कडाडले

निकालाआधी '१५ कोटी'वरून दिल्लीत हाय व्होल्टेज ड्रामा; पक्ष फोडण्यावरून आपचे संजय सिंह माध्यमांसमोर कडाडले

Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर एक्झिट पोलचे धक्कादायक आकडे समोर आले. भाजपला बहुमत मिळत असल्याचा अंदाज या एक्झिट पोलमधून मांडण्यात आला. गेली १० वर्ष सत्तेत राहिलेल्या आणि केंद्रातील सत्ताधारी पक्षाला जेरीस आणलेल्या आपला धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आज आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी जर भाजपला बहुमत मिळत असेल तर आपल्या उमेदवारांना १५ कोटींची ऑफर का दिली जात आहे, असा आरोप केला होता. त्यानंतर दिल्लीच्या राजकारणात निकालाआधी मोठ्या राजकीय घडामोडी घडत असून संजय सिंह यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.

Delhi Election : ‘आधी महाराष्ट्र, आता दिल्लीनंतर युपी, बिहार’; पत्रकार परिषदेत संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

भाजप जगातीत सर्वात भ्रष्ट पक्ष आहे. पक्ष फोडणे, सरकारं पाडणे, भ्रष्ट नेत्यांना स्वत:च्या पक्षात आश्रय देणे हे आता नित्याचंच बनलं आहे. महाराष्ट्र सरकार पाडलं, कर्नाटक, मध्यप्रदेश, बिहारचं सरकार पाडलं. आमदारांना खरेदी करणारा आणि तोडफोड करणारा हा पक्ष आहे. एलजी एसीबीला पत्र लिहितायेत आणि त्यानंतर एसीबी अरविंद केजरीवाल यांच्या घरी जात आहे. मी स्वत: आरोप करत आहे की ज्या व्यक्तीने फोन केला होता, तो कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी संजय सिंह यांनी केली आहे.

#WATCH | Delhi: AAP MP Sanjay Singh says, “BJP is the most corrupt party in the country. BJP always believes in breaking other parties…BJP toppled governments in Maharashtra, Karnataka, Madhya Pradesh, Uttarakhand, Arunachal Pradesh. Do we need a certificate from them that they… pic.twitter.com/CVrpfWPrBU

— ANI (@ANI) February 7, 2025

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपच्या आमदारांना भाजपकडून ऑफर दिली जात असल्याचा दावा केला होता.  आतापर्यंत त्यांच्या १६ उमेदवारांना भाजपकडून फोन आले असून, मंत्रीपद आणि 15-15 कोटी रुपयांचं प्रलोभन दिले जात आहे. उमेदवारांना “आप” सोडून भाजपमध्ये येण्याचा दबाव टाकला जात आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.

Rahul Gandhi on Maharashtra Election: पाच महिन्यात 39 लाख मते कुठून वाढली…? राहूल गांधींचा निवडणूक आयोगाला थेट सवाल

केजरीवाल यांच्या दाव्यानंतर भाजपनेही अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात थेट दिल्लीच्या उपराज्यपालांकडे तक्रार दाखल केली. तसेच केजरीवाल यांनी केलेल्या आरोपांची एसीबी चौकशीही करण्याची मागणीही करण्यात आली आहे. भाजपच्या तक्रारीनंतर उपराज्यपाल एक्टिव्ह मोडवर आले असून त्यांनी लगेचच एसीबी चौकशीचे आदेश दिले आहे. राज्यपालांच्या आदेशानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) पथक अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचल्याची माहिती समोर  आली आहे. एसीबीची पाच जणांची टीम केजरीवालांच्या घरी दाखल झाली आहे. त्यामुळे संजय सिहं यांनी माध्यमांसमोर भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

Web Title: High voltage political drama in delhi over 15 crore before delhi assembly election result

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2025 | 05:18 PM

Topics:  

  • Aam Adam Party
  • Delhi Assembly election 2025
  • Delhi Election
  • Delhi Election 2025
  • Sanjay Singh

संबंधित बातम्या

Bihar Election : बिहार निवडणुकीपूर्वी INDIA आघाडीला मोठा धक्का; देशातील मोठ्या पक्षाने सोडली साथ
1

Bihar Election : बिहार निवडणुकीपूर्वी INDIA आघाडीला मोठा धक्का; देशातील मोठ्या पक्षाने सोडली साथ

Sanjay Singh on Devendra Fadnavis: तुम्हाला महाराष्ट्राचे वातावरण बिघडवायचे आहे का? संजय सिंहांचा फडणवीसांना थेट सवाल
2

Sanjay Singh on Devendra Fadnavis: तुम्हाला महाराष्ट्राचे वातावरण बिघडवायचे आहे का? संजय सिंहांचा फडणवीसांना थेट सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.