Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मालवणमध्ये शिवसेना ठाकरे गटात इनकमिंग जोरात ! असंख्य मच्छिमारांनी हाती घेतली मशाल

मालवण तालुक्यामध्ये शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. आमदार वैभव नाईक आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीमध्ये अनेक मच्छीमारांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

  • By नारायण परब
Updated On: Oct 31, 2024 | 09:59 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

माजी आमदार परशुराम उपरकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्याबद्दल नुकताच मालवण तालुक्यातील आचरा, तळाशील, कोळंब या गावात शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अनेक पारंपरिक मच्छीमारांनी जीजी उपरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत मशाल हाती घेतली.

पर्ससीननेट आणि एलईडीद्वारे केल्या जाणाऱ्या अनधिकृत मच्छीमारीविरोधात सुरु असलेल्या पारंपरिक मच्छीमारांच्या लढयात आमदार वैभव नाईक हे पारंपरिक मच्छीमारांच्या खंबीरपणे पाठीशी राहिले आहेत. आमदार झाल्यापासून सातत्याने प्रत्येक अधिवेशनात पारंपरिक मच्छीमारांचे प्रश्न ते मांडत आहेत. अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या बोटींवर कारवाईसाठी स्वतः समुद्रात उतरून पारंपरिक मच्छिमारांच्या लढ्याला त्यांनी बळ देण्याचे काम केले त्यामुळे मच्छिमार समाजाने देखील आमदार वैभव नाईक यांच्या पाठीशी रहावे. याउलट विरोधी उमेदवाराच्या पक्षातील लोकांचेच पर्ससीन आणि एलईडी ट्रॉलर्स आहेत. त्यामुळे अनधिकृत मासेमारी राजेरोसपणे केली जाते त्याला आळा घालण्यासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार येणे गरजेचे आहे. असे माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी संगितले.

हे देखील वाचा- ‘या’ जिल्ह्यात भाजपला विधानसभेची एकही जागा नाही ! कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी

६५ कोटींचे पॅकेज तौकते वादळातील नुकसानग्रस्तांना मिळवून दिले

यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, पारंपरिक मच्छीमारांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याचे काम मी केले आहे. मच्छीमारांच्या वेगवेगळ्या आंदोलनात सहभाग घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मच्छिमारांच्या नौकांना आऊट बोट इंजिन दिले. चांदा ते बांदा योजनेतून अनुदानातून इन्सुलेटेड व्हॅन दिल्या. मच्छिमार वस्तीत दिवाबत्तीची सोय केली. समुद्र किनारपट्टी भागात कोट्यावधी रुपयांचे समुद्र धूप प्रतिबंधक बंधारे मंजूर करून प्रत्यक्षात कामे सुरु केली तर काही ठिकाणी बंधारे पूर्ण झाले आहेत. मस्त्य जेटीची उभारणी केली,गावातील ग्रामस्थांची मागणी असलेली रस्ते, वीज, पाणी हे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. तौकते चक्रीवादळात स्वतः मदतकार्य केले त्याचबरोबर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना नुकसानीची पाहणी करण्यास मालवणात आणून त्यांच्याकडून तब्बल ६५ कोटींचे पॅकेज तौकते वादळातील नुकसानग्रस्तांना मिळवून दिले होते.

हे देखील वाचा- Maharashtra Election 2024 : ऐन निवडणुकीत कॉंग्रेसला मोठा धक्का, कोल्हापुरातील विद्यमान आमदाराचा शिंदे गटात प्रवेश

मतदारसंघात होणार अटीतटीची लढत 

कुडाळ मालवण मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विद्यमान आमदार वैभव नाईक विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार निलेश राणे अशी अटीतटीची लढत होणार आहे. 2014 साली नारायण राणे यांना पराभूत करत जायंट किलर ठरलेल्या वैभव नाईक यांनी 2019 मध्येही या मतदारसंघातून  निवडणूक जिंकली.  यावेळी मात्र त्यांच्यासमोर निलेश राणे यांच्याकडून कडव आव्हान दिले जात आहे. त्यामुळे आमदार वैभव नाईक हे यावेळी निलेश राणेंना टक्कर देऊन हॅट्ट्रीक साधतात का हे पाहणे औत्सुकाचे ठरणार आहे.

 

 

Web Title: A large number of fishermen joined shiv sena thackeray group in malvan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2024 | 09:59 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Malvan
  • vaibhav naik

संबंधित बातम्या

Sindhudurg : वेंगुर्ले-दाभोलीतील स्थानिक जमीन मालकांचे ठिय्या आंदोलन मागे
1

Sindhudurg : वेंगुर्ले-दाभोलीतील स्थानिक जमीन मालकांचे ठिय्या आंदोलन मागे

Vaibhav Naik News: ..तर अजित पवार उपमुख्यमंत्रीही होऊ शकले नसते”: वैभव नाईकांनी जखमेवर मीठ चोळलं
2

Vaibhav Naik News: ..तर अजित पवार उपमुख्यमंत्रीही होऊ शकले नसते”: वैभव नाईकांनी जखमेवर मीठ चोळलं

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?
3

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?

VAIBHAV NAIK : दोषींवर कारवाई झालीच पाहिजे
4

VAIBHAV NAIK : दोषींवर कारवाई झालीच पाहिजे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.