Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणुकीत मते मिळविण्यासाठी राहुल गांधी शेतकऱ्यांना भाववाढीचे स्वप्न दाखवतात, खासदार डॉ. अनिल बोंडे यांचा आरोप

Maharashtra Politics: केवळ निवडणुकीत मते मिळविण्यासाठी राहुल गांधी शेतकऱ्यांना भाववाढीचे स्वप्न दाखवित आहेत. असा आरोप भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी राहुल गांधींवर केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 18, 2024 | 02:52 PM
निवडणुकीत मते मिळविण्यासाठी राहुल गांधी शेतकऱ्यांना भाववाढीचे स्वप्न दाखवतात, खासदार डॉ. अनिल बोंडे यांचा आरोप (फोटो सौजन्य-X)

निवडणुकीत मते मिळविण्यासाठी राहुल गांधी शेतकऱ्यांना भाववाढीचे स्वप्न दाखवतात, खासदार डॉ. अनिल बोंडे यांचा आरोप (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Anil Bonde allegations on Rahul Gandhi : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून मतदारांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी विविध प्रकारची आश्वासने दिली जात आहेत.याचदरम्यान सोयाबीनच्या एका क्विंटलची किंमत 2021 मध्ये 10 हजार रुपये होती. आता शेतकरी एमएसपीपेक्षा कमी दरानं सोयाबीन विकत आहेत. सोयाबीनचा हमीभाव 4892 रुपये असू शेतकऱ्यांना त्याची विक्री 4200 रुपये क्विंटलनं करावी लागत असल्याचं आश्वासन विदर्भातील प्रचारसभांमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले होते. याचपार्श्वभूमीवर आता कर्नाटकात सोयाबीनला दिल्या जाणाऱ्या दरावरून भाजप नेत्यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

सोयाबीनला हमीभावपेक्षा कमी दर – डॉ.अनिल बोंडे

जगात वर्षाला 35 कोटी टन सोयाबीनचे उत्पादन होते. यामध्ये भारताचा वाटा साधारणपणे एक कोटी टन इतका आहे. मध्य प्रदेशात सर्वाधिक ५५ लाख हेक्टर आणि महाराष्ट्रात ४५ लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली जाते. मध्य प्रदेशात 50.60 लाख टन आणि महाराष्ट्रात 40-45 लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. गेल्या काही वर्षांत मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील सर्वाधिक क्षेत्र व्यापले असल्याचे एका अभ्यासात दिसून आले. हे व्यापक क्षेत्र लक्षात घेऊन काँग्रेसने महायुतीवर टीका करण्यासाठी सोयाबीनचा मुद्दा प्रचारात उपस्थित केला. आघाडीवर ठेवला आहे. महायुती सरकारवर टीका करताना राहुल गांधी यांनीही सोयाबीनची कास धरली.

Ratnagiri: “तुम्हाला गरिबांची काय जाण असणार”, मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

महायुतीने जाहीर केलेल्या सहा हजार रुपये प्रति क्विंटलची घोषणा पुढे नेत सात हजार रुपये केली. हे करताना त्यांना आपल्या पक्षाची सत्ता असलेल्या कर्नाटकचा विसर पडला. कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील बसवा कल्याण, गुलबर्गा बाजारात सोयाबीनचा भाव सुमारे 3 हजार 751 रुपये प्रतिक्विंटल आहे. कलबुर्गीत हे दर आणखी खाली आल्याचीही माहिती आहे. कर्नाटकातील निम्म्या शेतकऱ्यांना सोयाबीनला सात हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आणि मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हमीभाव द्या, असे आवाहन विदर्भातील शेतकऱ्यांनी केले आहे. शेतकऱ्यांना हमीभाव देताना काँग्रेसचे शेतकरी विरोधी धोरण पुन्हा एकदा समोर येत असल्याची चर्चा आहे.

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कमी भावाची चिंता करीत नाहीत, डॉ. अनिल बोंडेंची टीका

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे अमरावती जिल्ह्यातील तिवसाला आले. सोयाबीनला सात हजार रुपये प्रतिक्विंटल दर देण्याचे सांगितले. एक शेतकरी या नात्याने देशातील सोयाबीनचे भाव पाहिले. संपूर्ण कर्नाटकात सोयाबीनचा भाव 3,800 रुपयांपेक्षा जास्त नाही. मात्र खर्गेच्या गुलबर्गा मार्केटमध्ये हे भाव दिले आहेत. तरीही कर्नाटक सरकार हस्तक्षेप करत नाही आणि सोयाबीन बियाणे खरेदी करत नाही. ‘भावांतर’ योजना राबविली जात नाही. खरगे केवळ निवडणूक प्रचारासाठी येतात आणि खोटे बोलतात. लोकांची फसवणूक करतात. आपल्या गावातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कमी भावाची चिंता करीत नाहीत, अशी टीका भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी ५ हजार रुपयांची मदत दिली . आता भावांतर योजना लागू करून, कपातीच्या दरातील फरक थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. असे काही तरी कर्नाटकच्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना खर्गे यांनी सांगावे असा टोलाही डॉ. बोंडे यांनी लगावला आहे. काँग्रेसमधील ८३ वर्षांचा माणूसही शेतकऱ्यांशी खोटे बोलू शकतो हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी सावध व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

“नितेश राणे महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी कडवा नेता” ;उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

Web Title: Bjp mp anil bonde allegations on rahul gandhi dreams of increasing prices of farmers to get votes in elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2024 | 02:52 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.