उमेदवार राकेश मुथा यांचे फाडले बॅनर (फोटो सौजन्य-X)
कल्याण: विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी आत्ता अंतिम टप्प्यात शिगेला पोहचली आहे. कल्याण पश्चीम मतदार संघातून जिजाऊ विकास पार्टीतर्फे निवडणूक लढविणारे उमेदवार राकेश मुथा यांचे बॅनर फाडल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर दुसरीकडे महापालिका अधिकारी अधिक जाणून बुजून त्यांच्याच बॅनर काढताय असा गंभीर आरोप करीत मुथा यांनी रस्त्यावर याच्या निषेधार्थ राकेश मुथा यांनी दोन तास ठिय्या दिला. या प्रकरणाचा जाब त्यांनी केडीएमसी अधिकाऱ्याला विचारण्याचा प्रयत्न केला असता अधिकारी काही एक जबाब न देता त्याने पळ काढला.
कल्याण पश्चिम मतदार संघातून जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार मुथा यांनी त्याच्या प्रचारार्थ मतदार संघात बॅनर लावले आहे. गेल्या चार पाच दिवसापासून त्यांचे बॅनर त्यांच्या विरोधकांकडून फाडले जात आहे. या प्रकरणी मुथा यांनी तक्रार केली आहे. दुसरीकडे त्यांच्याकडून लावण्यात आलेले बॅनर महापालिकेकडून काढला जात आहे. केडीएमसी प्रशासनाला जाब विचारला. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत.
आज पुन्हा मोहने परिसरात मुथा यांच्या प्रचाराचा बॅनर काढण्यात आले. ही घटना कळताच मुथा यांनी मोहने परिसरात धाव घेतली. त्यांनी त्याठिकाणी दोन तास ठिय्या आंदोलन केले. बॅनर फाडणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली. तसेच ज्या ठिकाणी त्यांचे बॅनर काढले जात आहे त्याच्या जाब राकेश मुथा यांनी अधिकाऱ्याला विचारला अधिकारी उत्तर न देता पळ काढला. या विषयी मुथा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुथा यांनी सांगितले की, बॅनर फाडून कोणालाही निवडणूका जिंकता येत नाहीत. बॅनर फाडण्याचे काम इर्षेपोटी केले जात आहे. विरोधकांना पराभव दिसून लागल्याने त्यांच्याकडून हे कृ्त्य केले जात आहे एकीकडे बॅनर फाडले जात आहे तर दुसरीकडे महापालिका अधिकारी दबावत काम करीत आहे जाणून-बुजून माझा बॅनर काढला जात आहे. २३ तारखेनंतर याठिकाणी मी पण आहे आणि महापालिका प्रशासनाचे अधिकारी आहे. तेव्हा बघू काय करायचे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुथा यांनी आवाहन केले आहे की, नागरीकांनी विचार करुनच मतदान करावे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राकेश मुथा यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. यावेळी कल्याण पश्चिम परिसरात रॅॅली काढण्यात आली होती. कल्याण पश्चिम विभागाचा विकास करणं हाच माझा ध्यास आहे असं अपक्ष उमेदवार राकेश मुथा यांची सांगितले आहे. कल्याणमध्ये एकतरी जागा काँग्रेसची पाहिजे होती अशा शब्दात त्यांनी नाकाजी व्यक्त केली आहे. कल्याणमधील शाळा आणि सरकारी रुग्णालय यांचा पुनर्विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू असं मुथा यांनी सांगितलं आहे.