Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Bicycle Travel : १५ सायकलस्वारांचा कल्याण ते उटी सायकल प्रवास, एका आठवड्यात कापणार १२०० किमीचे अंतर

सायकलिस्टबद्दल आदर आणि त्यांच्या सुरक्षिततेचा संदेश घेत 18 सायकलस्वारांचा कल्याण ते उटी सायकलप्रवास सुरु केला आहे. गेल्या 7 वर्षांपासून हे कल्याणातील सायकलस्वार सामाजिक संदेश घेऊन देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 03, 2026 | 12:53 PM
१५ सायकलस्वारांचा कल्याण ते उटी सायकल प्रवास, एका आठवड्यात कापणार १२०० किमीचे अंतर

१५ सायकलस्वारांचा कल्याण ते उटी सायकल प्रवास, एका आठवड्यात कापणार १२०० किमीचे अंतर

Follow Us
Close
Follow Us:
  • कल्याण ते उटी सायकल प्रवास
  • एका आठवड्यात कापणार 1200 किमीचे अंतर
  • फ्लॅगऑफ करून सायकलस्वार रवाना
Kalyan Bicycle Travel News Marathi : सुरुवातीला सायकलचा वापर वाहतूक, व्यायाम, मनोरंजन आणि खेळ यासाठी होतो, ज्यामुळे आरोग्य सुधारते, प्रदूषण कमी होते आणि पैसे वाचतात; ती दैनंदिन कामांसाठी, लांबच्या प्रवासासाठी, तसेच धावणे, माउंटन बाइकिंग यांसारख्या क्रीडा प्रकारांसाठी वापरली जाते आणि यामुळे मानसिक ताण कमी होऊन मूड सुधारतो, असे विविध फायदे सायकलच्या वापरामुळे मिळतात. असाच एक संदेश कल्याणमध्ये सायकलिस्टबद्दलचा आदर आणि रस्त्यावरील त्यांच्या सुरक्षिततेचा संदेश घेऊन कल्याणातील 15 सायकलिस्ट कल्याण ते उटी असा 1 हजार 200 किलोमीटरचा प्रवास सुरू केला आहे. कल्याण डोंबिवलीमहानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल, ब्रँड ॲम्बेसेडर डॉ. प्रशांत पाटील, उपआयुक्त संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत फ्लॅगऑफ करून हे सायकलस्वार रवाना झाले. ज्यामध्ये डॉक्टर, वकील यांच्यासह विविध क्षेत्रातील व्यावसायिक मंडळी आहेत.

गोल्ड मेडलिस्ट, उद्योगपती ते पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार

कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकातून हे 15 सायकलस्वार उटीच्या दिशेने रवाना झाले. कल्याणातील बाईकपोर्ट या सायकलिस्ट संस्थेच्या माध्यमातून गेल्या 7 वर्षांपासून हे कल्याणातील सायकलस्वार सामाजिक संदेश घेऊन देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत. ज्यामध्ये गोवा, दिल्ली, हैद्राबादसह गेल्यावर्षी महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या प्रदेशाचा समावेश आहे. यंदाची ही सायकलस्वारी कल्याण, पुणे, पंढरपूर, विजयपूरा, चित्रदुर्ग, म्हैसूर, मदुमलई जंगलामार्गे गुडलूर आणि मग उटी अशी 1 हजार 200 किलोमीटरची असणार आहे. ज्यामध्ये चंद्रभान साबळे, आनंद जाधव, हितेन राणे, मनोज चौगुले, राकेश कुमार, पवन, दर्शन वाकचौरे, मिलिंद देशमुख, अलतमाश शेख, अमित मोरे, साहिर शेख, डॉ. रेहनुमा, सारंग दळवी, गिरीश राव, संदीप अत्रे, रमेश पालटी, अनुप रॉय, पुरुषोत्तम करंबेळकर हे सायकलिस्ट सहभागी झाले आहेत.

तर यापूर्वी झालेल्या सायकल रॅलीमध्ये दिल्लीनतरचा हा दुसरा सर्वात लांबचा टप्पा असून चढाईच्या दृष्टीने सर्वात आव्हानात्मक प्रवास असणार आहे. कारण जवळपास समुद्रसपाटीपासून दहा हजार फूट म्हणजेच एव्हरेस्टपेक्षा अधिक उंचीवरील ही सायकल रॅली असल्याची माहिती या बाईकपोर्ट सायकलिंग क्लबचे प्रमुख डॉ. रेहनुमा यांनी दिली.

सायकलिस्टबद्दलचा आदर आणि त्यांची रस्त्यावरील सुरक्षितता हा संदेश घेऊन आम्ही यंदाची सायकल रॅली आयोजित केली आहे. सायकलिंगचे आरोग्यासोबतच पर्यावरणाचे महत्त्वही सर्वांना माहिती असून त्याला हातभार लावणाऱ्या सायकलिस्टबद्दल लोकांनी आदर बाळगणे आवश्यक आहे. तसेच सायकलिस्टनेदेखील आपल्या सुरक्षेचा विचार करूनच शहरात सायकल चालवावी हा सामाजिक संदेश घेऊन आम्ही जाणार असल्याचे या उपक्रमातील सदस्य प्रतिक गरवारे यांनी सांगितले.

हुडहुडी कमी होणार! पण तापमानातील ‘हा’ खेळ कसा असणार? ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती

Web Title: Bicycle travel fifteen cyclists from kalyan will travel from kalyan to ooty by bicycle covering a distance of 1200 km in one week

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2026 | 12:53 PM

Topics:  

  • kalyan
  • KDMC

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.