खर्चमर्यादा ओलांडल्यास आता पद येणार धोक्यात
वर्धा : विधानसभेच्या निवडणुकीचा बिगूल वाजले आहे. इतकेच नव्हे तर सध्या उमेदवारी अर्जाची उचल व सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विधानसभेची निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या वतीने 40 लाखांची खर्च मर्यादा ओलांडल्यास उमेदवार निवडून आला तरी त्याचे पद धोक्यात येणार आहे.
हेदेखील वाचा : ऐन सणासुदीत एसटी कर्मचाऱ्यांना बसतोय फटका; दिवाळी भेट तर नाहीच, अनेकांचे वेतनही अद्याप रखडले
जिल्ह्यात वर्धा, देवळी, आर्वी व हिंगणघाट असे चार विधानसभा क्षेत्र आहेत. चारही विधानसभा क्षेत्रात काही राजकीय पक्षांच्या वतीने आपले उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. तर काही राजकीय पक्षांकडून अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाही. नामनिर्देशन अर्ज सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी विविध राजकीय पक्ष तसेच अपक्ष उमेदवार कोण? हे चित्र जवळपास स्पष्ट होणार आहे.
प्राप्त अर्जाची छाननी व नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याची तारीख संपल्यावर उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून प्रचारावर भर दिला जाणार आहे. याच निवडणूक प्रचाराची खर्च मर्यादा 40 लाख निवडणूक विभागाने निश्चित केली आहे. निवडणूक प्रचारावर झालेला खर्चाचा हिशेबही उमेदवाराला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर करावा लागणार आहे. निवडणूक खर्च सादर न करणे तसेच खर्च मर्यादेपेक्षा जास्तीचा खर्च केल्यास संबंधित निवडून आलेल्या उमेदवारांचे पदच धोक्यात येणार आहे.
बैलगाडी-घोडागाडी 2 रुपये तास
निवडणुकीदरम्यान मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवाराला प्रचार करावा लागतो. त्यासाठी काहींकडून बैलगाडी, घोडागाडीचा वापर केला जातो. निवडणूक प्रचारासाठी बैलगाडी व घोडागाडीचे दर परवडणारे असल्याचे दिसत आहे. बैलगाडी-घोडागाडी 2 रुपये तास उपलब्ध असून, आता उमेदवार त्याचा वापर प्रचारासाठी खरंच करणार का, हे पाहणे गरजेचे असणार आहे.
हेदेखील वाचा : CA Foundation, Intermediate निकाल ‘या’ तारखेला जाहीर होणार ! ICAI कडून देण्यात आली निकाल्याच्या अपेक्षित तारखेची माहिती