
Rahul Narvekar reacts to the incident of candidates being threatened in the Colaba constituency.
Rahul Narvekar : मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरु आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून अर्ज मागे घेण्याची मुदत देखील संपली आहे. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये टीका-टिप्पणी जोरदार सुरु आहे. कुलाबा मतदारसंघामध्ये विधानसभा अध्यक्ष आणि भाजप नेते राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबियांनाा उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे राहुल नार्वेकरांनी इतर इच्छुकांना धमकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाने पाऊले उचलण्यात सुरुवात केली आहे. या संदर्भात राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात उभे राहणाऱ्या उमेदवारांना धमकी दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणावरुन जोरदार वाद निर्माण झाल्यानंतर राहुल नार्वेकरांवर टीका करण्यात येत आहे. राहुल नार्वेकर म्हणाले की, “मी कुलाब्याचे प्रतिनिधित्व करतो. माझ्या उमेदवारांबरोबर जाऊन अर्ज देणं हे स्वाभाविक होतं. उमेदवारांना हे अपेक्षित असतं की आपला आमदार आपल्यासोबत असावं. आपण जर पाहिलं तर निवडणूक आयोगाचा नियम आहे की एका उमेदवारांबरोबर दोन प्रतिनिधी जाऊ शकतात. नियमात राहूनच आम्ही तिथे गेलो होतो. आरओंच्या कार्यालयातून बाहेर येत असताना विधान परिषद सदस्य आणि त्यांच्यासोबत आलेली टोळी यांनी मला घेरावं घालणं हे सुरक्षेचा गैर वापर करुन कमोशन क्रिएट करणं गैर आहे,” अशी टीका राहुल नार्वेकर यांनी केली आहे.
हे देखील वाचा : राहुल नार्वेकरांचं टेन्शन वाढलं, काँग्रेसचं निवडणूक आयुक्तांना पत्र; गुन्हा दाखल होणार?
पुढे राहुल नार्वेकर म्हणाले की, “आपल्याला दिलेल्या सुरक्षेचा कोणी गैरवापर करत असेल तर संबंधित अधिकाऱ्याला त्याची माहिती देऊन कारवाई करायला लावणं हे माझं कर्तत्व आहे. पोलिंग स्टेशनवर मी जाणं अनुचित होतं तर हरिभाऊ राठोड काय पूजा करायला गेले होते का? आम्ही ते कार्य करतो ते कार्य संविधानाच्या मर्यादेमध्ये राहूनच करतो,” अशी भूमिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली आहे.
हे देखील वाचा : महायुतीमध्ये आली नामुष्की? अजित पवारांची पोलखोल अन् रवींद्र चव्हाणांचा पलटवार
नेमकं प्रकरण काय?
कुलाबा मतदारसंघातील प्रभाग 225, 226 आणि 227 या तीन प्रभागामध्ये विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकटवर्तीयांना उमेदवारी देण्यात आली आहे. नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर, बहीण गौरवी शिवलकर आणि वहिनी हर्षदा नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यांना निवडणूकीत विरोध कमी होण्यासाठी राहुल नार्वेकर खास प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. राहुल नार्वेकर यांनी तीन प्रभागातील इतर उमेदवारांना फोन करुन उमेदवारी अर्ज दाखल न करण्यासाठी धमकावले असल्याचा आरोप इतर पक्षांनी केला आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाला तक्रार करण्यात आली असून याची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. तसेच या संदर्भात पालिका आयुक्तांना अहवाल पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.