chitra wagh vs sanjay rathod vidhansabha elections 2024
अकोला : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण रंगले आहे. महायुती व महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत होत आहे. पहिल्यांदाच या युती राज्यातील विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. राज्यामध्ये बंडखोरीचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे सर्वांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महायुती व महाविकास आघाडी अनेक पूर्वीचे विरोधक आता युती म्हणून एकत्रित काम व प्रचार करत आहेत. याच प्रचाराबाबत भाजप विधानपरिषद आमदार चित्रा वाघ यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
अकोल्यामध्ये चित्रा वाघ यांची प्रचारसभा पार पडली. मूर्तीजापूर येथे भाजप उमेदवार हरीश पिंपळे यांच्या प्रचारासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी चित्रा वाघ यांना शिंदे गटाचे नेते संजय राठोड यांचा प्रचार करणार याबाबत विचारणा करण्यात आली. चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर यापूर्वी गंभीर आरोप केले होते. यवतमाळमधील एका मुलीच्या आत्महत्येनंतर संजय राठोड यांच्यावर चित्रा वाघ यांनी सडकून टीका केली होती. यानंतर आता चित्रा वाघ या महायुतीमध्ये संजय राठोड यांचा प्रचार करणार का? असा सवाल त्यांना विचारण्यात आला.
अकोल्यामध्ये शिंदे गटाचे नेते संजय राठोड यांच्या प्रचाराबाबत विचारणा केल्यानंतर चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले. चित्रा वाघ म्हणाल्या की, आम्ही ही निवडणूक सिरीयस नोटवर घेतली आहे. मी राज्यभर प्रचारासाठी फिरत आहे. त्यामुळे पक्ष पाठवेल, जिथे गरज असेल तिथे प्रचाराला जाणार. पक्ष आदेश देईल तसा प्रचार करणार, असे विधान चित्रा वाघ यांनी केले. त्यामुळे भाजप पक्षाने आदेश दिला तर संजय राठोड यांचा देखील चित्रा वाघ प्रचार करतील असे संकेत चित्रा वाघ यांनी दिले आहे.
हे देखील वाचा : उद्धव ठाकरेंकडे असं दडलंय तरी काय? पुन्हा गोवा महाराष्ट्र सीमेवर गाडी अडवली
माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद – अब्दुल सत्तार
शिंदे गटाचे नेते व उमेदवार अब्दुल सत्तार यांनी प्रचारसभा घेतली. यावेळी अब्दुल सत्तार म्हणाले की, “मला कुत्रा निशाणी मिळाली तरी मी निवडून येऊ शकतो. सध्या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते खालच्या पातळीवर जाऊन जातीपातीवर मतं मागत आहेत. महाराष्ट्रात मोजून चार पाच नेते आहे, त्यात माझं नाव आहे. पण काही लोक त्यामुळे माझ्यावर जळतात. माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद आहे. हे किरकोळ लोक माझ्याशी काय सामना करणार आहेत. मी गेल्या 25 वर्षांमध्ये कोट्यावधी रुपयांची काम केली आहेत. जो विकास कामे करतोय, त्याला मतदान करा”, असे मत अब्दुल सत्तार यांनी केले