Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जमलंच तर एखादं मुख्यमंत्रीपद किंवा गृहमंत्रीपद उतरून टाका..! काळजीवाहू मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देखील सत्तास्थापन न केल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहे. एकनाथ शिंदे यांची प्रकृती खराब झाल्यामुळे सुषमा अंधारेंनी टोला लगावला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 01, 2024 | 12:47 PM
एकनाथ शिंदे सरकारात्मक नसतील तर

एकनाथ शिंदे सरकारात्मक नसतील तर

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणूक झाली असली तरी अद्याप सरकार स्थापन झालेले नाही. निकाल जाहीर होऊन एक आठवडा झाला असला तरी देखील सरकार स्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. यामध्ये एकनाथ शिंदे यांची प्रकृती खराब झाली आहे. त्यामुळे ते दरे या त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी अचानक सर्व बैठका रद्द करुन गावी गेल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते देखील जोरदार टीका करत आहेत.

एकनाथ शिंदे यांनी दिल्लीवारी करुन अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर ते नाराज असल्याची चर्चा रंगली होती. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला असला तरी देखील त्यांनी गृहमंत्री व नगर विकास या खात्यांची मागणी केली आहे. मात्र ही खाती देण्यासाठी भाजप तयार नसल्याचे बोलले जात आहे. यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज होऊन गावी गेल्याचे चर्चा होती. मात्र त्यांची प्रकृती खराब असल्याची माहिती समोर आली होती. शिंदेंवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक देखील रवाना झाले होते. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी देखील फोन करुन विचारपूस केली होती. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे यांनी लिहिले आहे की, ताप हाय का..ताप हाय का असं म्हणून नुसताच गाव गोळा काय करताय?  बाहिरवसा झाला असंल. तीन वाटाची माती, (सुरतगुवाहाटीगोवा), लिंबू मिरची, काळी बाहुली, उलट्या पखाचं कोंबडं आणि जमलंच तर एखादं मुख्यमंत्रीपद/गृहमंत्रीपद उतरून टाका..! नाही फरक पडला तर EDचा X-ray काढून बघा..!! असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

ताप हाय का..ताप हाय का असं म्हणून नुसताच गाव गोळा काय करताय? बाहिरवसा झाला असंल. तीन वाटाची माती, (सुरतगुवाहाटीगोवा), लिंबू मिरची, काळी बाहुली, उलट्या पखाचं कोंबडं आणि जमलंच तर एखादं मुख्यमंत्रीपद/गृहमंत्रीपद उतरून टाका..!
नाही फरक पडला तर EDचा X-ray 🩻 काढून बघा..!! @PTI_News pic.twitter.com/RTgRoBgDRr

— SushmaTai Andhare (@andharesushama) November 30, 2024

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संजय राऊत यांनी देखील माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. खासदार संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे हे होणाऱ्या 5 तारखेच्या शपथविधीला तरी येणार आहेत का? त्यांना खरंच डॉक्टरांची गरज आहे की मांत्रिकाची गरज आहे. हे मांत्रिक अमित शाह किंवा नरेंद्र मोदी पाठवतील. यांच्या अंगामध्ये जी भुतं संचारली आहेत ती उतरवायला लागतील. हे काम आता देवेंद्र फडणवीस करत असतील तर ही चांगली गोष्ट आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता.

Web Title: Eknath shinde health update shiv sena targeted by sushma andhare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2024 | 12:47 PM

Topics:  

  • cm of maharashtra
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?
1

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?

Ladki Soon Abhiyan : महायुती सरकारचा निवडणूकीसाठी नवा डाव? बहिणीनंतर आता “लाडकी सून अभियान’ सुरु
2

Ladki Soon Abhiyan : महायुती सरकारचा निवडणूकीसाठी नवा डाव? बहिणीनंतर आता “लाडकी सून अभियान’ सुरु

Ganesh Naik on Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी पण..; गणेश नाईकांनी आरसा दाखवला
3

Ganesh Naik on Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी पण..; गणेश नाईकांनी आरसा दाखवला

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “पसायदानाद्वारे अखिल…”;
4

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “पसायदानाद्वारे अखिल…”;

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.