Photo Credit- Social Media एकनाथ शिंदेंनी सोडला गृहमंत्रीपदाचा हट्ट
सातारा : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली असली तरी देखील राजकारण जोरदार सुरु आहे. निकाल लागून एक आठ दिवस होऊन देखील सत्तास्थापनचा दावा करण्यात आलेला नाही. दरम्यान, काळजीवाहू एकनाथ शिंदे यांनी सर्व बैठका रद्द करुन त्यांच्या दरे या मूळगावी गेले. ते अचानक गेल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा रंगल्या होत्या. आता एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याच पक्षातील नेत्याची भेट नाकारली आहे.
एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या बैठक देखील ऐनवेळी तातडीने रद्द केली. त्यानंतर शिंदे हे त्यांच्या मूळ गावी गेले. हवापालटसाठी एकनाथ शिंदे हे गावी गेली असल्याची माहिती त्यांच्याच पक्षातील नेत्यानी दिली. निवडणुकीच्या धावपळीमध्ये शिंदे यांची प्रकृती बिघडली अगदी त्यांना ताप आला होता. एकनाथ शिंदे यांच्या तपासण्यासाठी डॉक्टरांची टीम देखील रवाना झाली होती. आता एकनाथ शिंदे यांनी त्यांचाच पक्षाचे नेते व आमदार दीपक केसरकर यांची भेट नाकारली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्यामुळे अनेक नेते हे त्यांची विचारपूस करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर गेले होते. मात्र त्यांना भेट न घेताच परतावे लागले, तब्येत ठीक नसल्याचं कारण त्यासाठी देण्यात आलं. दरे गावात मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्यासाठी पोहोचले होते, मात्र काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना गेटवरूनच परतावे लागले. यामुळे एकनाथ शिंदे हे त्यांच्याच पक्षातील नेत्यांची भेट घेत नसल्याचे दिसून आले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या दरे गावातील निवासस्थानी काळजीवाहू मुख्यमंत्री विश्रांती घेत आहेत. एकनाथ शिंदे हे त्यांच्या पत्नीसह हवापालटसाठी गेले आहेत. यावेळी भेटीसाठी आलेल्या कार्यकर्त्यांनाही प्रवेश नाकारला जात आहे. जळगाव पाचोडचे आमदार कपिल पाटीलही भेटीसाठी पोहोचले होते, मात्र त्यांनाही नकार देण्यात आला. निकटवर्तीय संजय मोरे यांच्याकडून भेटीसाठी आलेल्या आमदार आणि कार्यकर्त्यांकडून संपर्क केला जात आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
एकनाथ शिंदे हे बरे व्हावेत यासाठी त्यांचे समर्थक व कार्यकर्ते देवाकडे प्रार्थना करत आहेत. दरे गावात शिंदे यांनी भेट नाकारल्यानंतर दीपक केसरकर वज्रेश्वरी देवीचे दर्शन घेतले. यानंतर आता काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज मुंबईमध्ये परतणार असल्याची माहिती समोर येत आहे. ते मुंबईमध्ये परतल्यानंतर महायुतीच्या नेत्यांसोबत पुन्हा एकदा चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईतील आझाद मैदानावर येत्या 5 डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. शपथविधी सोहळ्याची तारीख, ठिकाण जाहीर करण्यात आले असले तरी मुख्यमंत्री कोण होणार हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.