Eknath Shinde is upset with the Mahayuti
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. तरी जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीला एकतर्फी बहुमत मिळाले आहे. मात्र तरी देखील सत्तास्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. खातेवाटप व पदांवरुन महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु आहे. शिंदे गट व भाजपमध्ये बोलणी सुरु असून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला आहे. मात्र त्या बदल्यात गृहखाते व नागर विकास खात्याची मागणी केली आहे. मात्र ही भाजपला मान्य नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे अस्वस्त आहेत.
दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे गट व अजित पवार यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. मात्र या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा निर्णय झाला असल्याचे बोलले जात आहे. इतर खाती व पालकमंत्री याबाबत राज्यामध्ये बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार होता. सागर बंगल्यावर महायुतीची ही महत्त्वपूर्ण बैठक होणार होती. मात्र एकनाथ शिंदे हे गावाला जाणार असल्यामुळे ही बैठक तातडीने रद्द करण्यात आली. त्यामुळे सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला आणखी विलंब होत आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
यामध्ये आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत 2019मध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेला प्रकार पुन्हा होणार का याची चर्चा सध्या सुरु आहे. एकनाथ शिंदे यांची आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भेट घेतली आहे. त्याचबरोबर प्रहार नेते बच्चू कडू यांनी देखील भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांनी शरद पवार गटाच्या नेत्याशी भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आव्हाड म्हणाले की, राजकीय टिप्पणी आणि वैयक्तिक टिप्पणी ही वेगळी असते. शिंदेंसोबत आमची वैयक्तिक भांडण नाही. आमच्या विचारधारा वेगळ्या आहेत. या विचारधारेसाठी आम्ही नेहमी लढत राहू. महायुतीचे सरकार अद्याप बनले नाही याचे मला काहीही नाही. मी त्यांना मला सरकारमध्ये घ्या असं सांगायला गेलो नाही. आमच्यामध्ये काय चर्चा झाली हे आमच्यामध्ये राहू द्या, असे सूचक वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
एकनाथ शिंदे नाराज नाहीत – उदय सामंत
एकनाथ शिंदे यांनी तातडीने बैठक रद्द करुन गावी जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे शिंदे महायुतीमध्ये नाराज असल्याच्या चर्चा आहेत. यावर शिंदे गटाचे नेते उदय सामंत म्हणाले की, सरकार स्थापन करण्यासाठी वेळ लागत आहे. पण सरकार स्थापन करण्यामध्ये कोणतीही अडचण नाही. भाजप नेत्याची लवकर निवड होईल. एकनाथ शिंदे नाराज नाहीत. एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी नाही. प्रत्येकाला धावपळीमुळे अडचणी निर्माण होतात. वातावरण बदलासाठी एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी दरे येथे गेले आहेत, असे मत उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे.