Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati News: बारामती विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची तयारी पूर्ण; पोलीस यंत्रणा देखील सज्ज

बारामती विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार संख्या ३ लाख ७५ हजार  ७१२ आहे.  त्यापैकी १ लाख ९० हजार ८४१ पुरुष मतदार, १ लाख ८४ हजार २९० महिला मतदार, २१ इतर मतदार आहेत. 

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 19, 2024 | 09:44 PM
Baramati News: बारामती विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची तयारी पूर्ण; पोलीस यंत्रणा देखील सज्ज

Baramati News: बारामती विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची तयारी पूर्ण; पोलीस यंत्रणा देखील सज्ज

Follow Us
Close
Follow Us:
बारामती:  बारामती विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी आज पोलीस बंदोबस्तात मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले असून सर्व साहित्य सुस्थितीत मतदान केंद्रावर पोहचले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली. बारामती विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार संख्या ३ लाख ७५ हजार  ७१२ आहे.  त्यापैकी १ लाख ९० हजार ८४१ पुरुष मतदार, १ लाख ८४ हजार २९० महिला मतदार, २१ इतर मतदार आहेत.
बारामती मतदारसंघांमध्ये एकूण ३८६ मतदान केंद्र आहेत. त्यासाठी ३९ टेबल ची व्यवस्था करून ३२६ बॅलेट युनिट, ४६३ कंट्रोल युनिट, ५०१ व्हीव्हीपॅट यंत्राचे वितरण  वखार  महामंडळ, औद्योगिक वसाहत (MIDC) बारामती येथून केंद्रनिहाय मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले. ३८६ मतदान केंद्रावर एकूण १ हजार ९४३ मतदान कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  मतदान केंद्रावर अधिकारी आणि कर्मचारी यांना नेण्यासाठी एकूण ४७ एस.टी. बसेस ,१५ खाजगी मिनी बसेस, ९ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे.  बारामती करिता ४० क्षेत्रीय अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी ३९ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे.
बारामती मतदारसंघांमध्ये १९३ मतदान केंद्रावर वेब कास्टिंग करण्यात येणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून यामध्ये ३० पेक्षा जास्त पोलीस अधिकारी, ३८६ पोलीस कर्मचारी, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स १ प्लाटून, आरपीएफ  हरियाणाचे २ प्लाटून मिळून ७० जवान नियुक्त करण्यात आले आहेत.

 मतदारांच्या स्वागतासाठी विशेष मतदान केंद्र  तयार करण्यात आले आहेत.  यामध्ये मॉडेल मतदान केंद्र  जिल्हा परिषद शाळा दत्तवाडी, गुणवडी, पिंक मतदान केंद्र सामाजिक न्याय विभाग मुलींचे शासकीय वसतिगृह इमारत जळोची, दिव्यांग मतदान केंद्र जिल्हा परिषद शाळा माळेगाव बुद्रुक, युवक मतदान केंद्र महाराष्ट्र एज्युकेशन हायस्कूल बा.न.प. बारामती, विशेष मतदान केंद्र जिल्हा परिषद शाळा डोर्लेवाडी येथे स्थापन केले आहे.

हेही वाचा:  वडगाव मावळमध्ये मतदान प्रक्रियेची पूर्ण तयारी; निर्भयपणे मतदान करण्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आवाहन

मतदान केंद्रावरील सुविधा
पिण्याचे पाणी
मदत कक्ष
स्वच्छतागृह
वीज
वैद्यकीय कीट, ओआरएस पावडर आणि केंद्रावर वैद्यकीय प्रतिनिधी
मतदारांच्या मदतीसाठी स्वयंसेवकांच्या नेमणुका
सर्व मतदान केंद्रावर दिव्यांग तसेच वयोवृद्ध मतदारांसाठी व्हिलचेअर व रॅम्पची सुविधा
दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि महिला मतदारांसाठी वेगळ्या रांगेची व्यवस्था
अंध मतदारासाठी मतदान केंद्रावरील सूचनाफलक आणि मतदान यादी ब्रेल लिपीमध्ये तयार करण्यात आली आहे.

मतदार यंत्रावर ब्रेल लिपी मुद्रित केली असल्याने अंध मतदारांना कोणाच्याही मदती खेरीज मतदान करता येणे शक्य आहे.

वडगाव मावळमध्ये मतदान प्रक्रियेची पूर्ण तयारी

मावळ विधानसभा मतदारसंघात बुधवार (दि. 20) सकाळी 7 ते सायंकाळी 6 यावेळी मतदान होणार आहे. मतदारांना आवाहन आहे की मतदान कार्डसह आणखी एक ओळखपत्र घेऊन मतदानासाठी केंद्रावर जावे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदानासाठी घराबाहेर पडावे. मतदारसंघात दहशतीचे वातावरण राहणार नाही. यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. मतदारांनी निर्भयपणे बाहेर पडा आणि मतदान करा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी केले आहे.

Web Title: Election comission preparation complete on baramati assembly 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2024 | 09:44 PM

Topics:  

  • baramati
  • Election Comission
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Ajit Pawar: बारामती शहरात मुख्य ठिकाणी ‘सिग्नल यंत्रणा’ बसवा; अजित पवारांचे निर्देश
1

Ajit Pawar: बारामती शहरात मुख्य ठिकाणी ‘सिग्नल यंत्रणा’ बसवा; अजित पवारांचे निर्देश

Election Commision: ‘बीएलओ’ आणि पर्यवेक्षकांसाठी आनंदाची बातमी! निवडणूक आयोगाने घेतला ‘हा’ निर्णय
2

Election Commision: ‘बीएलओ’ आणि पर्यवेक्षकांसाठी आनंदाची बातमी! निवडणूक आयोगाने घेतला ‘हा’ निर्णय

Baramati Crime: भीषण अपघातानंतर पोलिसांना जाग; ओव्हरलोड वाहनांवर मोठी कारवाई, १४ वाहने जप्त
3

Baramati Crime: भीषण अपघातानंतर पोलिसांना जाग; ओव्हरलोड वाहनांवर मोठी कारवाई, १४ वाहने जप्त

बारामतीत बँक मॅनेजरची गळफास लावून आत्महत्या; सुसाईड नोटही आली समोर
4

बारामतीत बँक मॅनेजरची गळफास लावून आत्महत्या; सुसाईड नोटही आली समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.