• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Elections »
  • Insurgency In 8 Constituencies In Ahilyanagar District

नगरमध्ये ‘या’ मतदारसंघांत बंडखोरी; निलेश लंकेंचीही डोकेदुखी वाढली

आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नगरमधील लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून जिल्ह्यात बारापैकी ८ मतदारसंघात बंडखोरी झालेली असून यामध्ये चारच मतदारसंघात सरळ लढती होणार आहे.

  • By नारायण परब
Updated On: Nov 04, 2024 | 05:42 PM
नगरमध्ये ‘या’ मतदारसंघांत बंडखोरी; निलेश लंकेंचीही डोकेदुखी वाढली
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गिरीश रासकर/ अहिल्यानगर  : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली असून आज अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी एकंदरीत राज्यातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे यामध्ये दोन्हीही आघाड्यांना बंडखोरांचा फटका बसल्याचे दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्या दिवसापासून तर आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत युती व आघाडी कडून बंडखोरांची मन धरणी करण्याचा प्रयत्न सुरू होता यामध्ये काही मतदारसंघांमध्ये त्यांना यश आले असून काही मतदारसंघांमध्ये बंडखोरांनी आपली भूमिका ठाम ठेवल्याने युती व आघाडीला निवडणुकांमध्ये मोठे डोकेदुखी ठरणार आहे.

नगर जिल्ह्यात बारापैकी ८ मतदारसंघात बंडखोरी झालेली असून यामध्ये चारच मतदारसंघात सरळ लढती होणार आहे. स्थानिक पातळीवरील राजकारणाला तसेच अंतर्गत हेवेदावे असलेल्या ठिकाणी बंडखोरी थोपवण्यात अपयश आल्याचे चित्र दिसून येत आहे. यामध्ये राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विरोधामध्ये भाजपाचे राजेंद्र पिपाडा यांनी अर्ज कायम ठेवला आहे तर दुसरीकडे सात विधानसभा मतदारसंघांमध्ये बंडखोरांनी आपले अर्ज माघारी न घेतल्यामुळे जिल्ह्यामध्ये विधानसभेमध्ये बंडखोरी ही दोन्ही पक्षांकडून झाली आहे असे चित्र दिसून येत आहे तर दोन मतदारसंघांमध्ये फक्त सरळ लढत होणार आहे.

नगर शहर, शिर्डी

नगर शहर मतदारसंघांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बंडखोरी केली आहे. त्या पाठोपाठ शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याबरोबर भाजपाचे बंडखोर राजेंद्र पिपाडा यांनी आपला उमेदवारी अर्ज तसाच ठेवला आहे पण ममता पिपाडा अपक्ष अर्ज हा मागे घेण्यात आलेला आहे. त्यामुळे शिर्डी विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून विखे विरुद्ध महाविकास आघाडीतर्फे प्रभावती घोगरे यांची प्रमुख लढत पहायला मिळणार आहे.

श्रीगोंदा

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बंडखोरी दोन्ही पक्षांमध्ये झालेली आहे या ठिकाणी भाजपाच्या सुवर्णा पाचपुते या सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्या दुसरीकडे महाविकास आघाडीचे माजी आमदार राहुल जगताप हे बंडखोर म्हणून निवडणूक लढवत आहे त्यामुळे या ठिकाणी चौरंगी लढत होणार आहे.

पारनेर

पारनेर विधानसभा मतदारसंघांमध्ये पंचरंगी लढत पाहायला मिळणार आहे या ठिकाणी माजी आमदार विजय औटी व माजी नगराध्यक्ष विजय औटी या दोघांनीही आपला उमेदवारी अर्ज हा कायम ठेवला आहे तर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्या सुद्धा उमेदवारी अर्ज हा ठेवला आहे. तर या ठिकाणी अजित पवार गटाचे काशिनाथ दाते व खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढवत आहे त्यामुळे पारनेरमध्ये पंचरंगी लढत पाहायला मिळत आहे.

नेवासा

नेवासा मतदारसंघांमध्ये भाजपाने बंडखोरी केली आहे यामध्ये माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी अपक्ष म्हणून या ठिकाणी उमेदवारी अर्ज ठेवला आहे या मतदार संघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार शंकरराव गडाख व एकनाथ शिंदे गटाचे विठ्ठलराव लंघे यांनी उमेदवारी अर्ज ठेवल्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत दिसून येणार आहे.

अकोले, पाथर्डी शेवगाव

अकोले मतदारसंघांमध्ये माजी मंत्री पिचड यांचे पुत्र वैभव पिचड यांनी माघार न घेतल्यामुळे या ठिकाणी सुद्धा बंडखोरी झाले आहे या ठिकाणी अकोल्यामध्ये शरद पवार पक्षाकडून अमित भांगरे तर त्यांच्या विरोधामध्ये महायुतीने डॉ. किरण लहामटे यांना उमेदवारी दिलेली आहे मात्र या ठिकाणी भाजपाचे वैभव पिचड यांनी बंडखोरी केली आहे. तर पाथर्डी शेवगाव मतदारसंघामध्ये भाजपाच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राष्ट्रवादीचे उमेदवार प्रताप ढाकणे व अपक्ष म्हणून चंद्रशेखर घुले यांच्यामध्ये आता तिरंगी लढत होणार आहे.

कर्जत जामखेड, संगमनेर, राहुरी

कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये आमदार रोहित पवार विरुद्ध माजी मंत्री व भाजपाचे विद्यमान आमदार राम शिंदे यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे तर संगमनेर मतदारसंघांमध्ये महसूल मंत्री राहिलेले विद्यमान आमदार काँग्रेसचे बाळासाहेब थोरात विरुद्ध महायुतीचे अमोल खताळ अशी लढत होणार आहे. राहुरी मतदारसंघांमध्ये माजी मंत्री प्राजक्त तनपुरे विरुद्ध भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यामध्ये लढत होणार आहे.

श्रीरामपूर, कोपरगाव 

श्रीरामपूर मतदारसंघांमध्ये हा राखीव मतदारसंघ असल्यामुळे या ठिकाणी सुद्धा बंडखोरी झाली आहे या ठिकाणी माजी आमदार लहू कानडे यांनी बंडखोरी केली आहे. या ठिकाणी आघाडीकडून हेमंत ओगले तर महायुतीकडून भाऊसाहेब कांबळे हे मैदानात आहे तर कोपरगाव मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्याविरुद्ध महाविकास आघाडी कडून संदीप वर्पे यांची सरळ लढत होणार आहे. तर निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतलेले कोल्हे कुटुंबीयांची भूमिका कोपरगावमध्ये निर्णायक ठरणार आहे.

 

 

Web Title: Insurgency in 8 constituencies in ahilyanagar district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2024 | 05:37 PM

Topics:  

  • ahmednagar
  • Maharashtra Assembly election 2024

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Satara News: ६५ व्या वर्षी निवृत्ती नाही…! रिक्षा चालवणाऱ्या मंगला आजींची साताऱ्यात चर्चा

Satara News: ६५ व्या वर्षी निवृत्ती नाही…! रिक्षा चालवणाऱ्या मंगला आजींची साताऱ्यात चर्चा

Feb 17, 2026 | 06:45 PM
Bigg Boss Marathi 6: ‘टोळी तुटणार?’ हे काय म्हणून गेला विशाल “उद्यापासून तुम्ही तुमचं खेळा…?” आजच्या भागात कोटियनची हवा

Bigg Boss Marathi 6: ‘टोळी तुटणार?’ हे काय म्हणून गेला विशाल “उद्यापासून तुम्ही तुमचं खेळा…?” आजच्या भागात कोटियनची हवा

Feb 17, 2026 | 06:40 PM
Emmanuel Macron India Visit: भारत आणि फ्रान्स मिळून बनवणार शक्तिशाली हेलिकॉप्टर; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Emmanuel Macron India Visit: भारत आणि फ्रान्स मिळून बनवणार शक्तिशाली हेलिकॉप्टर; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Feb 17, 2026 | 06:38 PM
NEP vs SCO,T20 World Cup 2026 : नेपालचा TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; स्कॉटलंड फलंदाजीसाठी उतरणार मैदानात 

NEP vs SCO,T20 World Cup 2026 : नेपालचा TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; स्कॉटलंड फलंदाजीसाठी उतरणार मैदानात 

Feb 17, 2026 | 06:38 PM
Ajit Pawar Memorial: कलावंतांचे प्रेम आणि बारामतीकरांची श्रद्धा; तिरंगा चौकात उभा राहणार अजितदादांचा ऐतिहासिक पुतळा

Ajit Pawar Memorial: कलावंतांचे प्रेम आणि बारामतीकरांची श्रद्धा; तिरंगा चौकात उभा राहणार अजितदादांचा ऐतिहासिक पुतळा

Feb 17, 2026 | 06:30 PM
आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय; नीलम गोऱ्हेंनी मानले एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे आभार

आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय; नीलम गोऱ्हेंनी मानले एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे आभार

Feb 17, 2026 | 06:28 PM
Central Railway प्रवाशांना मिळणार लवकरच वैद्यकीय उपचार, 18 स्थानकांत आपत्कालीन वैद्यकीय कक्षासाठी ई-लिलाव प्रक्रिया

Central Railway प्रवाशांना मिळणार लवकरच वैद्यकीय उपचार, 18 स्थानकांत आपत्कालीन वैद्यकीय कक्षासाठी ई-लिलाव प्रक्रिया

Feb 17, 2026 | 06:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.