Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP ची साथ बाळासाहेबांचा वारसा, शिवसेना गड माहीमवर अमित ठाकरेंचे नशीब चमकणार? काय सांगते समीकरण

Amit Thackeray: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये माहीम जागेवर होणारी तिरंगी लढत पाहण्यासारखी असेल. राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे, कसे असेल समीकरण

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 02, 2024 | 10:54 PM
अमित ठाकरे आणि माहीम मतदारसंघ काय आहे समीकरण (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

अमित ठाकरे आणि माहीम मतदारसंघ काय आहे समीकरण (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

यावेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक जागांवर रंजक लढत आहे. अशीच एक जागा मुंबईची माहीम विधानसभा जागा आहे. यावेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चा निकाल वरचढ ठरणार आहे. माहीम मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे रिंगणात आहे. 

अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढवत असून या जागेवरील तिरंगी लढत भाजपने अधिक गुंतागुंतीची केली आहे. पक्षाने अमित ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अमित यांचा सामना शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे महेश सावंत यांच्याशी आहे. त्यामुळे हा सामना चुरशीचा रंगणार आहे असेच सध्या चित्र दिसून येत आहे

भाजपाचा खुलेआम पाठिंबा

सत्ताधारी महायुतीमध्ये शिवसेनेचा मित्रपक्ष असूनही भाजपने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमित ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदा सरवणकर यांना निवडणुकीच्या मैदानातून माघार घेण्यासाठी राजी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माहीम मतदारसंघ हा शहराच्या मध्यवर्ती भागात प्रभादेवीच्या सेंच्युरी बाजारापासून माहीम कोळीवाड्यापर्यंत पसरलेला आहे. हा तोच भाग आहे जिथून अविभाजित शिवसेना (1966) आणि त्यानंतर 2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली.

हेदेखील वाचा – मनसे महायुतीचा भाग आहे का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत…”

कोणता परिसर 

या परिसरात सिद्धिविनायक मंदिर, पोर्तुगीज चर्च, माहीम चर्च, सिटीलाईट सिनेमा, माहीम दर्गा आणि शिवसेनेचे मुख्यालय (UBT) सारखी ठिकाणे देखील आहेत. या मतदारसंघात परंपरेने काँग्रेसला विरोध करणाऱ्या उच्चवर्णीय मतदारांची संख्या जास्त आहे असे मानले जाते. त्यामुळे यावेळी नक्की निकाल कसा लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

बिघडलेले समीकरण 

या संदर्भात एका राजकीय निरीक्षकाने नाव न सांगण्याच्या बोलीवर सांगितले की, माहीममधील मतदार भूतकाळात अविभाजित शिवसेनेच्या बाजूने असले तरी, उद्धव ठाकरे गटाने महाविकास आघाडीचा (एमव्हीए) घटक म्हणून काँग्रेसशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे आणि यामुळे समीकरण अधिक बिघडल्याचे दिसून येत आहे

माहीमचे समीकरण 

2009 च्या विधानसभा निवडणुकीत माहीममधून मनसेचे नितीन सरदेसाई 48,734 मतांनी विजयी झाले होते. तर मनसे पक्षाचे संदीप देशपांडे यांना 2014 मध्ये 42,690 मते मिळाली आणि त्यांचा सरवणकर यांच्याकडून पराभव झाला. दरम्यान नितीन सरदेसाई हे सदा सरवणकर यांच्याकडून 2019 मध्ये पराभूत झाले, परंतु त्यांना 40,350 मते मिळाली. 

एका राजकीय विश्लेषकाने सांगितले की, ही संख्या अमित ठाकरेंसाठी किमान 30,000 मतदारांचा आधार असल्याचे दर्शविते, ज्यांना भाजपच्या स्पष्ट समर्थनामुळे फायदा होऊ शकतो. याशिवाय मराठी भाषिक लोकसंख्येचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात शिवसेनेविरोधात (UBT) नाराजी पसरली असल्याचेही राजकीय विश्लेषकांनी सांगितले आहे. 

अमित ठाकरेंचा फायदा

या पार्श्वभूमीवर, 32 वर्षीय अमित ठाकरे यांना मनसेची विजयगाथा लिहिण्याची संधी मिळू शकते कारण 2022 मध्ये बाळ ठाकरे यांच्या प्रस्थापित पक्षात कडवट फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील संघटनेला मजबूत आधार नाही. विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, माहीममध्ये आजची शिवसेना ही भारतीय जनता पक्षावर अवलंबून आहे.

हेदेखील वाचा – विधानसभेमध्ये दिसणार राज ठाकरेंची ताकद; मनसे पक्षाची तिसरी यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

सदा सरवणकर माघार घेणार का?

निवडणुकीच्या शर्यतीतून माघार घेण्यासाठी सरवणकर यांच्यावर प्रचंड दबाव आहे, मात्र अद्याप त्याचा प्रभाव पडलेला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर आहे. 

या संदर्भात आणखी एका राजकीय विश्लेषकांनी सांगितले की, भाजपने मनसेला दिलेल्या पाठिंब्याचा वरळी आणि शिवडी या शेजारच्या मतदारसंघातही मोठा परिणाम होऊ शकतो. वरळीत शिवसेनेचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे मिलिंद देवरा यांच्यात लढत आहे.

माहीममध्ये किती मतदार?

माहीममध्ये 2,25,373 मतदार आहेत ज्यात 1,12,638 पुरुष, 1,12,657 महिला आणि 78 तृतीयपंथी मतदार आहेत. राज ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघाचे रहिवासी आहेत. या जागेवर काँग्रेसची काही मते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मनसे प्रमुखांनी भाजपच्या विरोधात प्रचार केला होता पण नंतर त्यांनी आपली भूमिका बदलली. माहीममध्येही काँग्रेसला काही प्रमाणात पाठिंबा आहे. त्यांचे उमेदवार प्रवीण नाईक यांना 2019 मध्ये 15,246 मते मिळाली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार नितीन सरदेसाई म्हणाले की, केवळ प्रसारमाध्यमेच अमित ठाकरेंना भाजपच्या पाठिंब्याबद्दल बोलत असतात. मात्र यासंदर्भात आमच्याशी कोणताही अधिकृत संपर्क झालेला नाही असंही त्यांनी सांगितले आहे. यापुढे त्यांनी म्हटलं की, आम्ही मोठ्या प्रमाणावर प्रचार करत आहोत आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील 288 सदस्यीय विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आता माहीम मतरसंघातून कोणाचा विजय होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

Web Title: Maharashtra assembly election 2024 mahim assembly seat amit thackeray vs sada sarvankar equation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2024 | 10:54 PM

Topics:  

  • amit thackeray
  • Maharashtra Assembly election 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.