भाजप-मनसे युती होणार? (फोटो- ट्विटर)
नागपूर: राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाने देखील राज्यात १०० पेक्षा अधिक जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. दरम्यान राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभेला त्यांनी भूमिका वेगळी घेतली आहे. यावरून मनसे महायुतीमध्ये आहे का असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यायबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली आहे.
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना अमित ठाकरे यांनी निवडणुकीनंतर मनसे आणि महायुती यांची युती असेल असे विधान केले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील याचप्रकारचे भाष्य केले होते. या निवडणुकीनंतर मनसे आणि भाजप एकत्र असेल व भाजपचा मुख्यमंत्री असेल असे राज ठाकरे म्हणाले होते. यावर बोलताना फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ”राज ठाकरे हे आमचे मित्र आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांची भूमिका वेगळी आहे. त्यांनी महायुतीच्या विरोधात आपले उमेदवार उभे केले आहेत. यामुळे सध्या तरी भाजप मनसे युतीची शक्यता नाहीये. ते उमेदवार मागे घेणार नसल्याने आम्ही एकमेकांसमोर लढत आहोत.”
काय म्हणाले होते राज ठाकरे?
महायुती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवत असल्याचे संगत असली तर निवडणुकीनंतर काय होणार हे स्पष्ट करत नाहीये. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठे भाष्य केले आहे. २०२४ च्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल असे राज ठाकरे म्हणत आहेत. दरम्यान त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडियावर राज ठाकरे यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे अजूनही स्पष्ट नाहीये. दरम्यान एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलटण मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल असे राज ठाकरे म्हणाले आहेत. तर २०२९ मध्ये मनसेचा मुख्यमंत्री होईल असे राज ठाकरे म्हणाले आहेत. दरम्यान राज ठाकरेंच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडियावर राज ठाकरे आणि त्यांचा असा एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे राज ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा: Maharashtra Election: “यंदा भाजपचाच मुख्यमंत्री”; राज ठाकरेंचे सूचक विधान येताच देवेंद्र फडणवीसांनी…
अमित ठाकरे यांच्याविरुद्ध महायुतीने उमेदवार दिला आहे. महाविकास आघाडीने देखील उमेदवार दिला आहे. अमित विरुद्ध उमेदवार देणे हा प्रत्येकाच्या स्वभावाचा भाग आहे. प्रत्येकजण आपापल्या स्वभावानुसार वागत असतो. मला सत्तेत येण्यासाठी कितीही वेळ लागला तरी चालेल पण फोडाफोडी करून मला सत्ता नको आहे, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.