File Photo : Raj Thackeray
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीची अद्याप यादी जाहीर झालेली नाही. राज ठाकरे यांच्या पक्षाच्या देखील उमेदवारांची यादी समोर आली आहे. मनसे पक्षाने यापूर्वी दोन यादी जाहीर केल्या आहेत. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी नवं सरकार स्थापन होणार आहे.
मनसे पक्षाकडून तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, नागपूर आणि सोलापूर अशा सर्व प्रमुख मतदारसंघातील मनसेचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
कोण आहेत तिसऱ्या यादीतील उमेदवार?
मनसे पक्ष यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जोरदार तयारीने उतरले आहेत. राज ठाकरे यांनी निकालानंतर मनसे पक्ष सत्तेमध्ये असेल असा ठाम विश्वास व्यक्त केला होता. त्याचबरोबर इतर सर्व पक्षांपेक्षा जास्त जागा मनसे मतदारसंघामध्ये उमेदवार देणार असे देखील राज ठाकरे म्हणाले होते. त्याचप्रमाणे आत्तापर्यंत मनसेने 58 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. यामध्ये सर्वांत जास्त चर्चा ही राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांची आहे. अमित ठाकरे हे पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवत असून सक्रीय राजकारणामध्ये सहभाग घेणार आहेत. माहिममधून अमित ठाकरे यांना मनसे पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे मनसैनिकांमध्ये एकच उत्साह दिसून येत आहे.