Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Elections 2024 : “यावेळी उटी, गुवाहाटीला जाणार नाही तर…; शिंदे गटाच्या नेत्याने निकालाआधी सांगितला ‘प्लॅन’

विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी अवघे काही तास बाकी राहिले आहेत. त्यामुळे आता राजकारण रंगले असून शिंदे गटाच्या प्रवक्त्यांच्या वकत्व्यामुळे जोरदार चर्चा रंगली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 22, 2024 | 06:27 PM
मुख्यमंत्री ठरत नसतानाच आता उपमुख्यमंत्रिपदासाठी समोर आली 'ही' नावं;

मुख्यमंत्री ठरत नसतानाच आता उपमुख्यमंत्रिपदासाठी समोर आली 'ही' नावं;

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे मतदान झालेले आहे. उद्या (दि.23) रोजी महाराष्ट्राचा महानिकाल हाती येणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून निकाल लागणार आहे. मतमोजणीसाठी सर्व प्रशासन तयार झाले आहे. निकालामुळे नेत्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे. बुधवारी (दि.20) सर्व नेत्यांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे. यंदाची विधानसभा निवडणूक ही जोरदार गाजली. राज्यामध्ये झालेल्या बंडखोरीच्या राजकारणानंतर आणि राजकीय उलथा पालथीनंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरशीची लढत झाली असून पहिल्यांदाच हे पक्ष एकत्रित निवडणुकीला सामोरे गेले आहेत. शिंदे गटाचे नेते व प्रवक्ते संजय शिरसाट यांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

काय म्हणाले संजय शिरसाट?

राज्यामध्ये अडीच वर्षापूर्वी झालेल्या बंडखोरीमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार हे सूरत, गुवाहटीला गेले होते. यामुळे जोरदार टीका देखील करण्यात आली होती. एका वाहिनीच्या मुलाखतीमध्ये शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी उत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले की, आम्हाला उटी किंवा गुवाहाटी कुठेही जाण्याची गरज भासणार नाही. आम्ही सगळे मुंबईतच जाऊन जीवाची मुंबई करू. आमदारांचा गटनेता निवडण्यासाठी सर्व आमदारांना एकत्र ठेवावे लागते. त्यासाठी आम्ही सगळे मुंबईत जाऊ आणि तिथेच सत्तास्थापनेचा दावा केला जाईल, असे विधान संजय शिरसाट यांनी केले आहे.

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संजय शिरसाट यांच्यावर टीका करताना, अदानी यांनी मणिपूरमध्ये रिसॉर्ट बांधले आहे. आम्ही संजय शिरसाट यांना तिथे पाठविणार आहोत. यावर उत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले की, आम्हाला मणिपूरला घेऊन जाण्यापेक्षा संजय राऊत यांनी आम्हाला लंडनला घेऊन जावे. आम्हालाही लंडन फिरता येईल आणि आयुष्याचे सार्थक होईल. आम्हाला गुवाहाटी भाग 2करण्याची आवश्यकता नाही. आम्ही दुसरा एखादा प्रदेश पाहू, याची चिंता विरोधकांनी करू नये. भारत भ्रमण करण्याची आम्हाला हौस आहे. महायुतीची सत्ता आणण्याकडे आमचे लक्ष आहे.” असे विधान संजय शिरसाट यांनी केले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संजय शिरसाट यांनी संजय राऊतांच्या प्रकाश आंबेडकर यांच्यावर केलेल्या टीकेवर देखील निशाणा साधला. शिरसाट हा दलित समाजाचा अपमान असल्याचे म्हटले आहे. संजय शिरसाट म्हणाले की, “प्रकाश आंबेडकर यांची भूमिका चांगली आहे. सत्तेमध्ये राहून पक्षाचा विस्तार करता येतो. “संजय राऊत यांचे हे टोमणे हा त्यांचा (प्रकाश आंबेडकर) अपमान आहे. एखाद्या नेत्याचा अशाप्रकारे अपमान करणे गैर आहे. एकेकाळी त्यांचे पाय चेपायला हेच लोकं गेले होते. बाबासाहेबांच्या नातूचा अपमान हा संपूर्ण दलित समाजाचा अपमान आहे असे मी मानतो,” असा घणाघात संजय शिरसाट यांनी केला आहे.

 

Web Title: Maharashtra vidhan sabha election result live news eknath shinde guwahati surat via mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2024 | 06:26 PM

Topics:  

  • Assembly Election Result
  • Maharashtra Assembly election 2024
  • Maharashtra Elections 2024

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?
1

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.