Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MNS Vidhansabha Election : “…ही मोठी चूक झाली”; निकालानंतर राज ठाकरेंसमोर पदाधिकरी अन् उमेदवारांची कबुली

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पक्षांकडून आढावा व कारणमिमांसा करण्यासाठी बैठक घेतली आहे. दारुण पराभव झाल्यानंतर राज ठाकरे यांनी देखील मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 25, 2024 | 06:45 PM
MNS Vidhansabha Election : “…ही मोठी चूक झाली”; निकालानंतर राज ठाकरेंसमोर पदाधिकरी अन् उमेदवारांची कबुली
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता संपली आहे. निकाल हाती आला असून यामध्ये महायुतीला एकतर्फी विजय मिळाला आहे. यंदाचा निकाल अत्यंत धक्कादायक असून महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेला मात्र एकही जागा मिळालेली नाही. राज ठाकरे यांच्या झंझावती प्रचार व सभांनंतर देखील मनसेला एकही आमदार मिळालेला नाही. यानंतर आता राज ठाकरे यांनी बैठक घेतली असून यावेळी पदाधिकारी व उमेदवारांशी त्यांनी संवाद साधला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निराशाजनक पराभवानंतर मनसे पक्षाने बैठक घेतली होती. राज ठाकरे यांनी ही बैठक बोलावली होती. यामध्ये बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. उमेदवार देखील उपस्थित होते. अगदी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा देखील माहिम मतदारसंघामध्ये पराभव झाला. यावरुन सर्व नेत्यांमध्ये व राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. यावेळी नेत्यांनी ईव्हीएम मशीनच्या घोटाळ्यावर प्रश्न उपस्थित केले.  तसेच राज ठाकरे यांच्यासमोर पदाधिकाऱ्यांनी थेट कारण सांगितले. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपसोबत जाणे महागात पडले. भाजपसोबत जाणं ही चूक ठरली असे मत पदाधिकाऱ्यांनी मांडले आहे.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

मनसे पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतला होता. इतर कोणत्याही पक्षांपेक्षा आपण जास्त जागा लढवणार आहोत आणि निवडणुकीनंतर आपण सत्तेमध्ये असणार आहोत असा दावा राज ठाकरे यांनी केला होता. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर मनसेला एकही जागा मिळालेली नाही. त्यामुळे मनसे पक्षाचा हिरमोड झालेला आहे. निकालानंतर राज ठाकरे यांनी अवघ्या काही शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. अविश्वसनीय…तूर्तास तरी एवढंच, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली होती.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मनसे पक्षावर निवडणूक आयोगाच्या कारवाईची देखील टांगती तलवार आहे. निवडणुकीमधील त्यांची कामगिरी अगदीच सुमार ठरली. पक्षाच्या मान्यतेसाठी आवश्यक असणारी पक्षाची मतांची टक्केवारी देखील मिळवता आली नाही. त्यामुळे मनसेची मान्यता रद्द होऊ शकते. याबाबतची माहिती विधीमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी दिली आहे. ‘एखाद्या पक्षाला मान्यता टिकवायची असेल तर एकूण आठ टक्के मतदान पाहिजे किंवा एक जागा निवडून यायला पाहिजे. दोन जागा आणि सहा टक्के मतदान किंवा तीन जागा आणि तीन मतदान मिळायला हवं, असा निवडणूक आयोगाचा निकष आहे,’ असं अनंत कळसे म्हणाले.

Web Title: Meeting between mns leaders and raj thackeray after assembly election results 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2024 | 06:44 PM

Topics:  

  • amit thackeray
  • Raj Thackeary

संबंधित बातम्या

“स्वातंत्र्यदिनीच कशावर तरी बंदी हाच मोठा विरोधाभास…; पालिकेच्या निर्णयावर राज ठाकरे भडकले
1

“स्वातंत्र्यदिनीच कशावर तरी बंदी हाच मोठा विरोधाभास…; पालिकेच्या निर्णयावर राज ठाकरे भडकले

Raj Thackeray Marathi News : राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना सूचक इशारा; महापालिकेच्या तयारीला लागा..युतीबाबत लवकरच..
2

Raj Thackeray Marathi News : राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना सूचक इशारा; महापालिकेच्या तयारीला लागा..युतीबाबत लवकरच..

राज-उद्धव देतायेत सूचक संकेत; बाळासाहेबांसमोर फोटो ते थेट शिवसेनाप्रमुख म्हणून उल्लेख
3

राज-उद्धव देतायेत सूचक संकेत; बाळासाहेबांसमोर फोटो ते थेट शिवसेनाप्रमुख म्हणून उल्लेख

Thackeray Brothers : जनतेचा भावनिक प्रतिसाद, एकच जल्लोष ‘जय ठाकरे!’
4

Thackeray Brothers : जनतेचा भावनिक प्रतिसाद, एकच जल्लोष ‘जय ठाकरे!’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.