मराठी माणसाच्या एकतेसमोर सरकारची सक्ती हरली; हिंदी भाषेचा 'जीआर' रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
मुंबई: विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर राज्यात विरोधी महाविकास आघाडीत एकदम शांतता पसरली होती.त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडून आलेल्या 20 आमदारांची मातोश्रीवर बैठक घेत त्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. ते फडण’वीस असले तरी आपणही वीस आहोत, आपण त्यांना पुरून उरू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, यावेळी आमदार भास्कर जाधव यांची गटनेतेपदी तर सुनील प्रभु यांची प्रतोदपदी निवड करण्यात आली. तर आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी बोलताना भास्कर जाधव म्हणाले,मागील सात टर्मपासून आमदारकीचा अनुभव आहे. आदित्य ठाकरे यांना गटनेतेपदी नियुक्त करण्यात यावे अशी माझी मागणी होती. पण उद्धव ठाकरेनी आदेश दिला आणि मी तो मानय केला. त्यामुळे आता मी गटनेतेपदी काम करणार आहे. याशिवाय, सरकार सक्षमपणे चालण्यासाठी विरोधीपक्षनेताही असावा लागतो.
AIMIM नेत्याचा मोठा दावा, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणार? ओवेसीचा असणार पाठिंबा
सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांकडे आम्ही महाविकास आघाडीचा एकत्र मिळून विरोधीपक्षनेते करण्यात यावा, अशी विनंती आम्ही करणार आहोत. महाविकास आघाडीत आमचं संख्याबळ जास्त असल्याने आमचा म्हणजे शिवसेनेचा विरोधीपक्षनेते होईल, मला विरोधीपक्षनेतेपदाची जबाबदारी मिळाल्यास मला विरोधीपक्षनेता व्हाया नक्कीच आवडेल, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. राज्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येत सत्ताधारी नेते आहेत. त्या तुलनेत विरोधीपक्ष संख्येने छोटा आहे. तरीही हा विरोधीपक्ष सत्ताधाऱ्य़ांना पुरून उरेल, असा विश्वास भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.
अंबादास दानवे म्हणाले की इतर पक्षांप्रमाणेच आमच्याही पक्षातील विधिमंडळ पक्षनेत्याची निवडण कऱण्या तआली आहे. आमचा कोणताही आमदार फुटणार नाही, शिंदेंकडून चुकीचे आरोप करण्यात येत आहेत. आदित्य ठाकरे यांचीही नियमाप्रमाणे निवड कऱण्यात आली आहे. या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी वरळीची जागा 8 हजार मतांनी जिंकली आहे. आदित्य यांना 60606 मते मिळाली, तर त्यांच्यासमोर उभे असलेले उमेदवार, शिवसेनेचे (शिंदे गट) ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांना केवळ 52198 मते मिळाली. तर मनसेचे संदीप देशपांडे यांना 18 हजार 858 मते मिळाली.
विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसल्यानंतर शिवसेना उद्धव यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता मुंबईच्या बीएमसी निवडणुकीत उद्धव गटाचे खरे आव्हान असेल. देशातील सर्वात श्रीमंत पालिका असलेली BMC सध्या शिंदे ताब्यात आहे. गेल्या 30 वर्षांपासून BMC एकट्या शिवसेना (संयुक्त) च्या ताब्यात आहे. आता नव्या सरकारमध्ये बीएमसीच्या निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत आपला बीएमसीचा बालेकिल्ला वाचवण्याचे आव्हान आता ठाकरे गटासमोर राहणार आहे. बीएमसी निवडणुकीत शिवसेनेला युबीटीचा पराभव झाला, तर बाळासाहेब ठाकरेंच्या राजकारणातील एकनाथ शिंदे यांचा वारसावरचा दावा अधिक भक्कम होईल आणि त्याचा फटका ठाकरे गटाला बसेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.