Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

१५ दिवसांत मोदींचा तिसरा महाराष्ट्र दौरा! चिमूर-सोलापूर आणि पुण्यात आज सभा, वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त आज पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 12, 2024 | 10:32 AM
१५ दिवसांत मोदींचा तिसरा महाराष्ट्र दौरा! चिमूर-सोलापूर आणि पुण्यात आज सभा, वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल
Follow Us
Close
Follow Us:

भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (१२ नोव्हेंबर) महाराष्ट्रात प्रचार करणार आहेत. पक्षाचे इतर प्रमुख नेते आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा हे देखील महाराष्ट्रातच आज सभा घेणार आहेत. पण ते आधी झारखंडमध्ये प्रचार करणार आहेत. यानंतर शाह देशाच्या आर्थिक राजधानीत पोहोचतील. स्टार प्रचारक जोडी मोदी आणि शहा जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. भाजपने आपल्या X हँडलवर पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शाह यांचा कार्यक्रम शेअर करण्यात आलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तीन सभा घेणार असून दुपारी 1 वाजता महाराष्ट्रातील चिमूर येथे मोठ्या जाहीर सभेला संबोधित करतील. त्यांची दुसरी जाहीर सभा सोलापुरात होणार आहे. दुपारी 4:15 वाजता पंतप्रधान सोलापुरात मतदारांची भेट घेणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 6.30 वाजता पंतप्रधान पुण्यात महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा मागणार आहेत.

हे सुद्धा वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात सभा; वाहतुकीत मोठे बदल, वाचा सविस्तर

सायंकाळी 6.30 वाजता येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. केंद्रीय मंत्री शाह आधी झारखंडला पोहोचणार आहेत. पाच दिवसांतील मोदींचा हा तिसरा दौरा आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी अकोला आणि नांदेडमध्ये जाहीर सभांना संबोधित केले. त्याआधी ८ नोव्हेंबरला धुळे आणि नाशिकमध्ये पंतप्रधानांनी सभा घेतल्या होत्या. महाराष्ट्रात या चारही सभांमध्ये मोदींनी ‘एक सुरक्षित तर एक सुरक्षित’चा नारा दिला आहे. गेल्या 4 सभांमध्ये मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर निशाणा साधला नाही. त्यांनी काँग्रेसवर जातींमध्ये फूट पाडल्याचा आरोप केला.

वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत आज मोठे बदल करण्यात येणार आहेत. टिळक रोडवर पंतप्रधान मोदींची जाहीर सभा असणार आहे. पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा टिळक रोडवरील स. प. महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. त्यामुळे या भागातील रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाशिव पेठेतील विजयानगर कॉलनी परिसरातील ना. सी. फडके चौक ते नाथ पै चौक दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी ना. सी. फडके चौकातून डावीकडे वळून निलायम चित्रपटगृहमार्गे पर्वती उड्डाणपुलाखालील रस्त्याने सिंहगड रस्त्याकडे जावे. नाथ पै चौकातून वाहनचालकांनी सरळ सिंहगड रस्त्याकडे जावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

तसेच बाबुराव घुले पथ, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, आंबील ओढा परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात आले आहेत. त्यासोबतच साने गुरुजी पथ परिसरात (टिळक रस्ता चौक ते निलायम चित्रपटगृह) सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त पुण्यात जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्री बारापर्यंत जड वाहनांना शहरात बंदी असणार आहे. टिळक चौक ते भिडे पूल चौक दरम्यान एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा: ‘माझं मन साफ, माझ्या मनात तेच ओठावर, वळसे-पाटील मोठ्या मताधिक्क्याने निवडून येणार’; शिवाजीराव आढळराव पाटील यांचा विश्वास

Web Title: Pm modi in maharashtra narendra modi to address public rallies in vidarbha solapur and pune today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2024 | 10:29 AM

Topics:  

  • Amit Shah
  • Maharashtra Assembly election 2024
  • narendra modi

संबंधित बातम्या

अमित शाहांच्या ‘रोड शो’ने फिरणार वारे? ममता दीदींच्या घराजवळ रॅलीला हिंसक वळण, चपला फेकल्या अन्..
1

अमित शाहांच्या ‘रोड शो’ने फिरणार वारे? ममता दीदींच्या घराजवळ रॅलीला हिंसक वळण, चपला फेकल्या अन्..

Amit Shah: “हे नरेंद्र मोदींचे सरकार आहे, शस्त्र उचलणाऱ्यांचा हिशोब चुकता होईल”; अमित शाह यांचा नक्षलवादावर लोकसभेत कडक प्रहार
2

Amit Shah: “हे नरेंद्र मोदींचे सरकार आहे, शस्त्र उचलणाऱ्यांचा हिशोब चुकता होईल”; अमित शाह यांचा नक्षलवादावर लोकसभेत कडक प्रहार

Karjat News : “चीन घुसखोरी करताना मोदींची 56 इंच छाती जाते कुठे?” राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांची सणसणीत टीका
3

Karjat News : “चीन घुसखोरी करताना मोदींची 56 इंच छाती जाते कुठे?” राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांची सणसणीत टीका

Amit Shah : ममता सरकारविरोधात भाजपचे आरोपपत्र दाखल, अमित शाह म्हणाले, “बंगालच्या सीमेवरून येणारे घुसखोर, ही चिंतेची बाब…”
4

Amit Shah : ममता सरकारविरोधात भाजपचे आरोपपत्र दाखल, अमित शाह म्हणाले, “बंगालच्या सीमेवरून येणारे घुसखोर, ही चिंतेची बाब…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.