Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कराडमधील दोन बड्या नेत्यांचा राजकीय तह; पृथ्वीराज चव्हाण-बाळासाहेब पाटील परस्परांना देणार हात?

भोसले यांचा चव्हाण यांच्याशी तिसऱ्यांदा, तर घोरपडे यांचा पाटील यांच्याशी दुसऱ्यांदा सामना होत आहे. भोसले साखर कारखानदारीतील बडे प्रस्थ आहे. कृष्णा उद्योग समूहातील विविध संस्था त्यांच्या ताब्यात आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 08, 2024 | 01:27 PM
पृथ्वीराज चव्हाण-बाळासाहेब पाटील परस्परांना हात देणार?

पृथ्वीराज चव्हाण-बाळासाहेब पाटील परस्परांना हात देणार?

Follow Us
Close
Follow Us:

पुणे / संदीप पाटील : पश्चिम महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी व महायुतीत चुरशीच्या लढती होत आहेत. यातील कराड दक्षिण व कराड उत्तरेतील लढतीकडे राज्याचे लक्ष वेधले आहे. दक्षिणेत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, तर उत्तरेत माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांना घेरण्याची रणनीती भाजपने आखली आहे. विरोधकांचे आव्हान रोखण्यासाठी ‘दक्षिण-उत्तरे’त अलिखित ‘तह’ होण्याची शक्यता आहे.

हेदेखील वाचा : प्रचारसभांमधील घोषणांवरुन रंगलं राजकारण! योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर अजित पवारांचे प्रत्युत्तर

पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी व महायुतीत वर्चस्वाची लढाई सुरु आहे. विधानसभेच्या एका एका जागेसाठी सत्ताधारी व विरोधकांनी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीतील डॅमेज कंट्रोल विधानसभा निवडणुकीत भरुन काढण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. विरोधकांच्या ताब्यातील जागा हिसकावून घेणे हा प्रयत्नांचा एक भाग राहणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे बडे मोहरे भाजपच्या निशाण्यावर आहेत. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील भाजपचे विशेष लक्ष्य आहेत. आमदार चव्हाण व आमदार पाटील महाविकास आघाडीचे महत्वाचे चेहरे आहेत. त्यांना मतदारसंघात जखडून ठेवण्याची भाजपची खेळी आहे.

दोन्ही मतदारसंघात पक्षाने ताकद पणाला लावली आहे. दक्षिणेत काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांचे पुत्र डॉ. अतुल भोसले यांना, तर उत्तरेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात मनोज घोरपडे यांना भाजपने रिंगणात उतरविले आहे.

भोसले ‘दक्षिणे’वर स्वारी करणार का?

भोसले यांचा चव्हाण यांच्याशी तिसऱ्यांदा, तर घोरपडे यांचा पाटील यांच्याशी दुसऱ्यांदा सामना होत आहे. भोसले साखर कारखानदारीतील बडे प्रस्थ आहे. कृष्णा उद्योग समूहातील विविध संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. दिमतीला कार्यकर्त्यांचा लवाजमा व ‘अर्थ’पूर्ण शक्ती आहे. या पाठबळावर चव्हाण यांना नामोहरम करण्याचा चंग भोसले यांनी बांधला आहे. भाजपची कवचकुंडले परिधान करून चव्हाण यांची वाट बिकट करण्याचा भोसले यांचा मनसुबा आहे. दोनदा जंग जंग पछाडूनही भोसले यांना ‘दक्षिणे’वर स्वारी करता आली नाही. येणाऱ्या निवडणुकीत भोसले यशस्वी होणार का? याची उत्सुकता आहे.

उत्तरेत भाजप विजयापर्यंत पाेहचणार का?

उत्तरेत बाळासाहेब पाटील यांना शह देण्यासाठी भाजपची टीम ‘शत-प्रतिशत’ कामाला लागली आहे. गतवेळी अपक्ष लढलेल्या मनोज घोरपडे यांच्या हातात कमळ देत भाजपने परिवर्तनाची हाक दिली आहे. उत्तरेतून लढण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ इच्छुक होते. मात्र भाजपच्या धुरिणांनी घोरपडे यांना पसंती दिली. खासदार उदयनराजे भोसले यांनी घोरपडे यांच्या पारड्यात वजन टाकल्याने कदम यांना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागली. भाजपची एकवटलेली ताकद घोरपडे यांना विजयापर्यंत घेऊन जाणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

उदयसिंहांची भूमिका ठरणार निर्णायक

कराड दक्षिणेत पृथ्वीराज चव्हाण, स्वर्गीय आमदार विलासराव पाटील (उंडाळकर), अतुल भोसले यांचा गट कार्यरत आहे. तर कराड उत्तरेत आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, स्वर्गीय आमदार विलासराव पाटील (उंडाळकर) यांच्या कार्यकर्त्यांची फळी आहे. उत्तरेत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची आमदार बाळासाहेब पाटील यांना, तर कराड शहरातून बाळासाहेब पाटील यांची पृथ्वीराज चव्हाण यांना मदत होऊ शकते. बदलत्या समीकरणात उंडाळकर गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. गतवेळी अ‍ॅड. उदयसिंह पाटील (उंडाळकर) यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना अप्रत्यक्ष हात दिला होता. आता चव्हाण व उंडाळकर हातात हात घालून काम करीत आहेत. ‘दक्षिणे’त ऍड. पाटील यांचा चव्हाण यांना हात मिळणार आहे, मात्र ‘उत्तरे’त त्यांची भूमिका गुलदस्त्यात आहे.

हे देखील वाचा : माहीम मतदारसंघातील वादावर अखेर पडदा; सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार, भाजप अमित ठाकरेंचा करणार नाही प्रचार

Web Title: Prithviraj chavan and balasaheb patil will fight together in assembly election nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2024 | 01:27 PM

Topics:  

  • balasaheb patil
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?
1

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.