Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधानसभा निवडणुकीपूर्वीच ‘या’ बड्या पक्षाने दिला स्वबळावर लढण्याचा इशारा

अखिलेश यादव यांना इंडिया आघाडीअंतर्गत महाराष्ट्रात सपासाठी काही जागा हव्या आहेत. मात्र, अद्यापपर्यंत महाविकास आघाडीकडून याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 28, 2024 | 02:33 PM
अचलपूर, तिवसामध्ये दिग्गजांचा झाला पराभव

अचलपूर, तिवसामध्ये दिग्गजांचा झाला पराभव

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यात समाजवादी पक्षाने 12 जागा मागितल्या आहेत. कमी करून 5 जागांपर्यंत वाटा खाली आणला तरीही महाविकास आघाडीकडून अजूनही या जागा दिल्या जात नसल्याने समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव चांगलेच संतापले आहेत. ‘लवकरात लवकर आम्हाला जागा द्या, अन्यथा आम्ही स्वतंत्रपणे मैदानात उतरू’, असा इशाराच महाविकास आघाडीला दिला आहे.

हेदेखील वाचा : माहीम विधानसभा मतदारसंघात येणार रंगत; अमित ठाकरेंविरोधात भाजप देणार नाही उमेदवार? पण…

समाजवादी पक्षाने दावा केलेल्या पाच जागांपैकी महाआघाडीने 3 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. सपाने धुळे शहर, भिवंडी पूर्व, मानखुर्द, भिवंडी पश्चिम आणि मालेगाव मध्य या जागा मागितल्या होत्या. शिवसेना ठाकरे गटाने शनिवारी धुळे शहरातून अनिल कोते यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेसने मालेगाव मध्यमधून एजाज बेग आणि भिवंडी पश्चिममधून दयानंद मोतीराम यांना उमेदवारी दिली आहे.

अखिलेश यादव यांना इंडिया आघाडीअंतर्गत महाराष्ट्रात सपासाठी काही जागा हव्या आहेत. मात्र, अद्यापपर्यंत महाविकास आघाडीकडून याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. राजकारणात बलिदानाला कुठेही स्थान नसते. तथापि, आधी आमचा प्रयत्न आघाडीत राहण्याचाच असेल, परंतु त्यांच्याकडूनच आम्हाला ठेवले जाणार नसेल तर जेथे आमच्या पक्षाची ताकद आहे.

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे आहे मोठं अस्तित्त्व

समाजवादी पक्ष हा प्रामुख्याने उत्तर प्रदेशात असल्याचे पाहिला मिळत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी समाजवादी पक्ष नावाचा पक्ष हा भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांपैकी एक होता. समाजवादी पक्षाची स्थापना 4 ऑक्टोबर 1992 रोजी मुलायम सिंह यादव यांनी केली आणि ती उत्तर प्रदेशमध्ये आहे. समाजवादी पक्ष समतेच्या तत्त्वावर काम करणारा समाजवादी समाज निर्माण करण्यावर विश्वास ठेवतो.

महाविकास आघाडीत 85-85-85 जागांवर एकमत

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं 85-85-85  जागांवर एकमत झालं. 18 जागा मित्रपक्षांसाठी सोडण्यात येणार आहेत. तरीही 15 जांगाचा घोळ होता. मित्रपक्षांसोबत बैठकही पार पडली. तरी अद्याप काही जागांवर शिक्कामोर्तब झालेले नाही. मित्रपक्षासाठी सोडण्यात आलेल्या 18 आणि शिल्लक 15 जागा अशा एकून 33 जागांबाबत महाविकास आघाडीत अद्यापही संभ्रम होता.

माहीममध्ये महायुतीत मतभेद?

सदा सरवणकर यांनी मैदानातून माघार घेण्यास नकार देत अमित ठाकरे यांच्या राजकीय क्षमता आणि मतदारसंघातील योगदानावर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, ‘कुणी मित्र म्हणून कर्तव्य बजावत असल्याने अमित ठाकरेंनी जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांच्या मैत्रीची किंमत मी का चुकवावी?’ असेही त्यांनी म्हटले आहे.

हेदेखील वाचा : Baramati Assembly Election 2024: बारामतीचा आखाडा रंगणार; अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार मैदानात

Web Title: Samajwadi party may contest election independently nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2024 | 01:22 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Maharashtra Election
  • political news
  • Samajwadi Party

संबंधित बातम्या

प्रशांत किशोर यांची नाव बुडाली पाण्यात; एकही जागा मिळवली नाही बिहारच्या रिंगणात
1

प्रशांत किशोर यांची नाव बुडाली पाण्यात; एकही जागा मिळवली नाही बिहारच्या रिंगणात

Maharashtra Local Body Election : एक नगराध्यक्ष, २३ नगरसेवकांसाठी ३५ केंद्रांवर मतदान! धरणगावात प्रशासनाची तयारी पूर्ण
2

Maharashtra Local Body Election : एक नगराध्यक्ष, २३ नगरसेवकांसाठी ३५ केंद्रांवर मतदान! धरणगावात प्रशासनाची तयारी पूर्ण

भाजप मित्रपक्षांना देणार धक्का? ‘ही’ महत्त्वपूर्ण तयारी केली सुरु, पुणे-मुंबईतील जागा…
3

भाजप मित्रपक्षांना देणार धक्का? ‘ही’ महत्त्वपूर्ण तयारी केली सुरु, पुणे-मुंबईतील जागा…

ऐन नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीत फूट; एकाच कुटुंबातील नातेवाईक आमनेसामने
4

ऐन नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीत फूट; एकाच कुटुंबातील नातेवाईक आमनेसामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.