Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“तर माझी माघार पण…,” सदा सरवणकर उमेदवारीचा अर्ज मागे घेणार का?

माहिम मतदारसंघावरुन जोरादार चर्चा सुरु आहे. अशातच मनसेन जर महायुती विरोधातील उमेदवार मागे घेतले तर मीही उमेदवारी मागे घेईल, असे सदा सरवणकर यांनी सांगितले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 04, 2024 | 12:46 PM
Sada Sarvankar

Sada Sarvankar

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्रातील माहीम विधानसभा जागेवरून सध्या राजकीय गोंधळ सुरू आहे. या जागेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढवत आहेत. दुसरीकडे महायुतीकडून एकनाथ शिंदे यांचा पक्ष शिवसेनेचे सदा सरवणकर रिंगणात आहेत. आता उमेदवारी मागे घेतल्यास विधान परिषद आणि मंत्रीपदाचा मान राखू, असा प्रस्ताव महायुतीच्या वतीने सदा सरवणकर यांना देण्यात आला आहे. आता सरवणकर आपल्या कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेतील. सरवणकर हे गेली १५ वर्षे माहीम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

माहीम विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) उमेदवार सदा सरवणकर यांनी निवडणूक लढविताना सांगितले की, मी महायुतीचा उमेदवार आहे. मला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा, आठवले यांचे आशीर्वाद आहेत. मी लोकांसाठी ३६५ दिवस काम करतो. माहीम विधानसभा मतदारसंघात धनुष्यबाणाचा विजय होणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार होणार आहे. शिंदेजींचा मी ऋणी आहे. तसेच यापूर्वीही माझ्यावर कोणताही दबाव नव्हता. मला माझे कार्यकर्ते आणि मतदारांचे आभार मानायचे आहेत. मतदारांचा थोडा दबाव होता आणि शिंदे जी, फडणवीस जी, अजितदादा यांनी आमच्या मतदारांना आदर दिला आहे.

हे सुद्धा वाचा: मोठी बातमी! राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची बदली, निवडणूक आयोगाने हटवले

काय म्हणाले सदा सरवणकर?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 10 मिनिटांपू्र्वी फोन आला होता. दादरमधून धनुष्यबाण आणि बाळासाहेबांचे विचार विधानसभेत जाणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी माझी इच्छा आहे. ही निवडणूक माझ्यासाठी वैयक्तिक नाही. ही निवडणूक माझ्यासाठी वैयक्तिक नाही. शिवसैनिक अहोरात्र मेहनत घेत आहेत, त्यांना विचारलं. एकनाथ शिंदेंची इच्छा आहे, मनसेने आमच्याविरुद्ध असलेले इतर सर्व उमेदवार मागे घ्यावेत, ही मी टाकलेली अट मान्य होत असेल, तर कार्यकर्त्यांशी बोलून अंतिम निर्णय कळवेन, असं सरवणकर म्हणाले.

पदाधिकाऱ्यांचे 50 ग्रुप केले आहेत. त्या सगळ्यांना बोलावलं आहे. चर्चा करून निर्णय घेऊ. एका सीटमुळे वातावरण खराब होऊ नये असं वाटतं. शिंदेंनी मला एकदाही मागे घ्यायला सांगितलेलं नाही. राज साहेबांविषयी आमच्या मनात प्रेम आहे. महायुतीचे आमदार वाढावेत, हीच इच्छा आहे. हा त्याग एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदापर्यंत न्यायला कामी येईल. मोठे निर्णय घेताना एखादा बळी जातो, असं सदा सरवणकर म्हणाले.

तसेच माहिमच्या जागेवरून भाजपने अप्रत्यक्षपणे भाजपने शिंदे गटाला इशारा देत राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांचा प्रचार करण्याची भूमिका घेतली आहे. दुसरीकडे राज ठाकरेंनी महायुतीविरोधातील उमेदवार मागे घेतले तर मी माझा अर्ज मागे घेण्यास तयार आहे, अशी अट शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी घातली आहे.

हे सुद्धा वाचा:  महाराष्ट्रात भाजपला मोठा दिलासा; उमेदवारीबाबत गोपाळ शेट्टींनी उचललं मोठं पाऊल

Web Title: Sarvankar firm on contesting after sena offers him mlc nomination to withdraw from mahim fight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2024 | 11:54 AM

Topics:  

  • amit thackeray
  • Eknath Shinde
  • Sada Sarvankar

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “महायुतीचाच विजय होणार, शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध”, शिवसेना प्रवक्त्या शायना एन.सी यांचे प्रतिपादन
1

Maharashtra Politics: “महायुतीचाच विजय होणार, शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध”, शिवसेना प्रवक्त्या शायना एन.सी यांचे प्रतिपादन

BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
2

BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

BMC Election 2026: डुप्लिकेट एबी फॉर्मचा अर्ज वैध; भाजपची कोंडी; बंडखोर दत्ता केळुसकर निवडणूक लढवण्यावर ठाम
3

BMC Election 2026: डुप्लिकेट एबी फॉर्मचा अर्ज वैध; भाजपची कोंडी; बंडखोर दत्ता केळुसकर निवडणूक लढवण्यावर ठाम

Maharashtra Municipal Election 2026: निवडणुकीपूर्वीच भाजपचे ४ उमेदवार विजयी; तर शिंदे सेनेला मुंबईत धक्का
4

Maharashtra Municipal Election 2026: निवडणुकीपूर्वीच भाजपचे ४ उमेदवार विजयी; तर शिंदे सेनेला मुंबईत धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.