Sushma Andhare questions Sunil Tingre on Porsche accident.
पुणे : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी वडगाव शेरी परिसरातील रहिवाशी म्हणून पोर्शे अपघात प्रकरणा सुनिल टिंगेरवर टिका करताना त्यांना अनेक प्रश्नांची सरबती केली. लोकप्रतिनिधी म्हणून अपघातस्थळी जाणे, बळी पडलेल्या मुलांच्या कुटुंबियांना भेटणं गरजेचे होते की पोलीस ठाणे, ससून आणि राज्य उत्पादन शुल्काच्या कार्यालयात जाणे महत्वाचे होते ? राजकीय दबाव आणून गुन्हेगारांना वाचविणारेच खरे गुन्हेगार नाहीत का ? असा प्रश्नांची सरबत्तीच अंधारे यांनी केली. तसेच, पोर्शत बांधकाम व्यावसायिकाच्या त्या बाळासोबत अन्य अल्पवयीन मुले कोण होती ? त्यात कोणा नेत्याचा मुलगा होता का हेही टिंगरे यांनी सांगावे, असे आव्हानही केले.
उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिवाजीनगर परिसरात पत्रकार परिषद घेतली. त्याठिकाणी त्यांनी पोर्शे हिट अँण्ड रन प्रकरणाला ६ महिने पूर्ण होत असल्याने अनेक अनुत्तरित प्रश्नांवर बोट ठेवले.
ठाकरे गटाच्या नेत्या अंधारे म्हणाल्या, “सुनिल टिंगरे यांच्या नोटिशींना घाबरत नाही, पण निष्पापाना न्याय मिळाला पाहिजे. मी, सुप्रिया सुळे, आमचे पक्ष कोणीही या नोटीशींना घाबरत नाही. कायदेशीर कारवाई करायची असेल तर करा, असे आव्हानही त्यांनी दिले. वडगाव शेरीमधील एक नागरिक म्हणून याप्रकरणावर मी बोलत आहे, असेही त्यांनी यावेळी सागितले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
“अपघातप्रकरणात विविध वृत्तपत्रात पोलखोल करणाऱ्या बातम्यांची कात्रणेही अंधारे यांनी दाखवत ती वाचून दाखवली. पोर्श किंवा अन्य प्रकरणात तटकरे यांच्या बाहुल्या तसेच रोजगार हमी सेवक काही बोलत असतील, तर त्यांना उत्तर देण्यास मी बांधील नाही, असेही यावेळी अंधारे यांनी सुनावले. आमदार म्हणून टिंगरे अपयशी ठरले आहेत, असे सांगत त्यांनी टिंगरे यांच्या अपूर्ण आश्वासनांची यादी वाचून दाखवली.
पोर्षे कार अपघात प्रकरणाला काल सहा महिने झाले सहा महिन्यानंतर देखील दोन जीव गेले त्यांना अजून न्याय मिळाला नाही. पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी आमदारांची चौकशी करण्यासाठी गृहमंत्रालयाकडे परवानगी मागितली होती. पण, गृहमंत्र्यांनी पाठीशी घातले म्हणून ते वाचले आहेत का,” असाही प्रश्न उपस्थित केला.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
“एका आरोपीसाठी तुम्ही पिझ्झा बर्गर घेऊन गेला होता, गोरगरिबांचे काम करणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. एका आरोपीसाठी पिझ्झा बर्गर घेऊन जाणे हे लोकप्रतिनिधीचे काम आहेत का याचा विचार करावा. रक्ताचे नमुने बदललेल्या आरोपीला मिळालेल्या रकमेची चौकशी पोलीस करणार होते, मात्र ती चौकशी का थांबली ? या तपासाची परवानगी पोलीस आयुक्तांनी मागितली होती. मात्र ही चौकशी का थांबली ? गृह खात्यासोबत सत्तेत असणाऱ्या पार्टनरशिपमुळे हे वेगळं सांगायची गरज नाही. पोर्षे कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलासोबत आणखीन एक मुलगा होता, तो कुठल्या राजकीय नेत्याचा मुलगा होता याचा उलगडा अजून झाला नाही. पोर्स कार अपघात प्रकरणात तुमचा सहभाग होता हे तुम्ही अमान्य करू शकाल का हे प्रकरण चालू असताना तुम्ही कुठे गायब होता ? पोलीस व माध्यमांसमोर तुम्ही का आला नाही. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कोणी दबाव केला असा प्रश्न देखील यावेळी विचारत अंधारे यांनी विचारला. तसेच, तुम्हाला उमेदवारी देताना हाच मुद्दा अडचणीचा होता ही महायुतीतील चर्चा आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे,” असा घणाघात सुषमा अंधारे यांनी केला.