Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

छोटं क्लिनिक चालवणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्याकडे करोडोंची प्रॉपर्टी..; सुषमा अंधारेंचा गौप्यस्फोट

विधानसभा निवडणुकीसाठी सुषमा अंधारे या प्रचाराच्या रिंगणात उतरल्या आहेत. अंबरनाथ येथील सभेमध्ये त्यांनी शिंदे गटाच्या उमेदवारावर जोरदार टीका केली असून प्रश्न उपस्थित केले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 10, 2024 | 02:11 PM
Sushma Andharen's criticism of Balaji Kinikar for property

Sushma Andharen's criticism of Balaji Kinikar for property

Follow Us
Close
Follow Us:

अंबरनाथ : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय नेते जोरदार तयारीला लागले आहेत. त्यामुळे राज्याचे राजकारण रंगले आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यामध्ये मतदान पार पडणार आहे. तर येत्या 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी प्रमुख लढत होणार आहे. त्यामुळे दोन्ही युतींच्या नेत्यांमध्ये वादंग निर्माण झाला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. सुषमा अंधारे यांची अंबरनाथमध्ये प्रचारसभा पार पडली. यावेळी त्यांनी तुफान राजकीय टोलेबाजी केली.

अंबरनाथमध्ये महाविकास आघाडीकडून राजेश वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी सुषमा अंधारे प्रचाराच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांनी सभेमधून महायुती व खास करुन शिंदे गटावर जोरदार प्रहार केला. शिंदे गटाचे विद्यमान आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्यावर टीका केली. आमदार बालाजी किणीकर यांच्याकडील करोडो रुपयांच्या प्रॉपर्टीवरुन सुषमा अंधारे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्याकडे कोट्यवधी रुपये आले कुठून? ते नेमके कुठे कष्ट करायला गेले होते? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

हे देखील वाचा : “बाळासाहेब ठाकरेंचं कौतुक करण्याचं धाडस आहे का?” पंतप्रधान मोदींचं काँग्रेसला आव्हान

अंबरनाथच्या सभेमध्ये ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, “बालाजी किणीकर तुम्ही असा कोणता अल्लाउद्दीनचा दिवा घासला आणि कुठे इतकी मेहनत केली की ज्यामुळे तुमच्याकडे इतके पैसे आले? या चाळीसच्या चाळीस गद्दारांकडे पैसे आले, पण सर्वसामान्यांचा खिसा कापला गेला,” अशा शब्दांत जहरी टीका सुषमा अंधारे यांनी केली. त्यांच्या या टीकनंतर शिंदे गटाचे नेते व उमेदवार बालाजी किणीकर यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.

हे देखील वाचा : ‘जयंत पाटलांनी गलिच्छ राजकारण केलं’; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा घणाघात

माध्यमांनी या संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर बालाजी किणीकर म्हणाले की, “सुषमा अंधारे यांनी केलेले आरोप खोटे आहेत. मी डेंटिस्ट आहे, माझे दोन दवाखाने होते. माझी पत्नीही डेंटिस्ट असून मी शिवसैनिक म्हणून काम करत होतो. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला उमेदवारी दिली. गेली 15 वर्ष या शहराचं मी प्रतिनिधित्व करतोय. मी माझ्या ऍफिडेव्हिटमध्ये माझे व्यवसाय काय आहेत, याची माहितीही दिली आहे. मी खोटे ऍफिडेव्हिट देणारा माणूस नाहीताईंनी ते बघावं आणि मग माझ्यावर टीका करावी. ताई मोठ्या नेत्या आहेत,” असे प्रत्युत्तर डॉ. बालाजी किणीकर यांनी दिले आहे.

Web Title: Sushma andharens criticism of balaji kinikars property worth crores of rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2024 | 02:11 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Maharashtra elections
  • Vidhansabha Elections 2024

संबंधित बातम्या

Maharashtra Elections : 264 ग्रा. पं. वर येणार महिला राज, जिल्ह्यातील 8 ठिकाणी आरक्षण सोडत शांततेत
1

Maharashtra Elections : 264 ग्रा. पं. वर येणार महिला राज, जिल्ह्यातील 8 ठिकाणी आरक्षण सोडत शांततेत

Nagpur News: महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला; प्रभाग रचनेचा मसुदा तयार करण्याचे आयुक्तांना आदेश
2

Nagpur News: महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला; प्रभाग रचनेचा मसुदा तयार करण्याचे आयुक्तांना आदेश

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?
3

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.