Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दरे मुक्कामी असणाऱ्या काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली; डॉक्टरांचे पथक तपासणीसाठी रवाना

विधानसभेची मुदत संपली असली तरी अद्याप महायुतीकडून सरकार स्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. मात्र एकनाथ शिंदे हे मध्येच त्यांच्या मूळ गावी गेले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 30, 2024 | 06:29 PM
दरे मुक्कामी असणाऱ्या काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली; डॉक्टरांचे पथक तपासणीसाठी रवाना
Follow Us
Follow Us:

सातारा : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली असली तरी जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीकडे एकतर्फी बहुमत असले तरी सरकार अद्याप स्थापन करण्यात आलेले नाही. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला असून तरी त्यांची गृहखाते व नागरी विकास खात्याची मागणी आहे. ही मागणी भाजपला मान्य नसल्यामुळे सरकार स्थापनेचे घोंगडे भिजत राहिले आहे. त्यामध्ये आता एकनाथ शिंदे हे हवामान पालटासाठी त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. ऐन सरकारस्थापनेच्या काळात ते गावी गेल्यामुळे सरकार स्थापनेची प्रक्रियेला विलंब होत आहे. यामध्ये आता काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर येत आहे.

राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री सध्या महाबळेश्वर तालुक्यातील दरे या आपल्या निवासस्थानी मुक्कामी आहेत. हे त्यांचे मूळ गाव आहे. गृहमंत्री पदाची मागणी करूनही ती न मिळाल्याने शिंदे नाराज असल्याची चर्चा होती मात्र प्रत्यक्षात शिंदे यांना घशाचे इन्फेक्शन झाले असून सध्या ते तापाने आजारी आहे अशी माहिती समोर येत आहे.  या माहितीला सातारा जिल्ह्यातील डॉक्टरांच्या पथकाने दुजोरा दिला आहे.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

महायुतीला महाराष्ट्रामध्ये स्पष्ट बहुमत मिळाले असताना अद्यापही सत्ता स्थापनेची गाडी पुढे सरकलेली नाही .मुख्यमंत्री पदासाठी भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याच्या चर्चा आहेत, मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदे यांनी माघारीचा दावा केला असला तरी महायुतीची बैठक रद्द करून ते शुक्रवारी अचानक दरे हे आपल्या गावी परतले यामुळे महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी गृहमंत्री पदाची मागणी केली आहे त्यावर ते ठाम असून ते न मिळाल्याची त्यांची नाराजी असल्याच्या चर्चा आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रत्यक्षात शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव कोणालाही न भेटणे टाळले आहे त्यांचे सहकारी माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे त्यांच्या भेटीसाठी दरे गावी आले होते मात्र प्रकृती अस्वस्थ असल्याच्या कारणावरून त्यांची भेट होऊ शकली नाही ते तातडीने मुंबईला रवाना झाले . काळजीवाहू मुख्यमंत्र्यांसाठी डॉक्टरांचे एक पथक दरे गावी रवाना झाले आहेत डॉक्टरांनी शिंदे यांची तपासणी केली तेव्हा त्यांच्या घशाला इन्फेक्शन आणि ताप असल्याचे सांगितले आहे गेल्या काही दिवसापासून त्यांना सर्दीचा त्रास सुरू होता दरे येथील गावी ते आरामासाठी आल्याचे डॉक्टरांनी सांगितले मात्र ते नाराज असल्याच्या शक्यतांनी जोर धरला होता मुख्यमंत्र्यांना सध्या दोन दिवस आरामाची गरज आहे त्यानंतरच पुढील काय तो निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे

Web Title: The health of caretaker chief minister eknath shinde who is staying in dare village has deteriorated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2024 | 06:29 PM

Topics:  

  • cm of maharashtra
  • Eknath Shinde
  • Mahayuti

संबंधित बातम्या

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
1

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
2

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
3

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Pune Graduate Constituency:जागावाटपावर महायुतीत अद्याप चर्चा नाही; राजेश पांडेंचा मोठा दावा
4

Pune Graduate Constituency:जागावाटपावर महायुतीत अद्याप चर्चा नाही; राजेश पांडेंचा मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.