Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aaditya Thackeray : एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा धक्का? ऑपरेशन टायगर 3 ची चर्चा सुरू होताच आदित्य ठाकरे संतापले

Aaditya Thackeray : शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची घोषणा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील उद्योग, पाणीटंचाई आणि प्रदूषणाच्या मुद्द्यांवरून शिंदे सरकारला सुनावलं. तर संजय राऊत यांनीही शिंदे गटाला डिवचलं आहे.

  • By विवेक
Updated On: Nov 15, 2026 | 03:13 PM
Aaditya Thackeray

Aaditya Thackeray

Follow Us
Follow Us:
  • ऑपरेशन टायगरवरून पुन्हा खळबळ
  • आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल
  • महाराष्ट्राचे हाल आधी बघा, आदित्य ठाकरेंचा टोला
 

मुंबई : सध्या राजकीय वर्तुळात कमालीची अस्वस्थता निर्माण झाल्याचं दिसत आहे. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा गाजत असताना दोन्ही शिवसेनेच्या विलीनीकरणाबाबतही चर्चा रंगू लागल्या होत्या. आता मात्र पुन्हा एक नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. विलीनीकरणाच्या चर्चा या फोडाफोडीच्या चर्चांपर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्याचे संकेत दिले आहेत.

हे ऑपरेशन नेमकं कधी होणार आणि कोणत्या नेत्यांना लक्ष्य केलं जाणार, याबाबत त्यांनी कोणताही खुलासा केलेला नाही. त्यांच्या या विधानानंतर ठाकरे गटात नेमकं काय घडणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी या मुद्द्यावरून शिंदे गटाला चांगलंच सुनावलं आहे. (Aaditya Thackeray)

ऑपरेशन टायगरआधी महाराष्ट्राचे हाल बघा!

उदय सामंत यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी केवळ पक्षांतराच्या राजकारणावरच नाही, तर राज्यातील अनेक प्रश्नांवर सरकारला घेरलं. पैसा आणि सत्तेसाठी काही नेत्यांनी पक्ष सोडल्याचा आरोप त्यांनी केला. राजकारणाचा स्तर इतका खाली गेला आहे की, सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी फक्त सत्तेचे खेळ सुरू आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

Supriya Sule on NCP Merger: ‘अजितदादांचे निधन झाले त्या दिवशी..’ राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितलं

राज्यातील पाणीटंचाई, शेतकऱ्यांची अवस्था, वाढतं प्रदूषण आणि उद्योगधंद्यांचं स्थलांतर या मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला लक्ष्य केलं. नाशिकमधील रस्त्यांची अवस्था आणि मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न उपस्थित करत आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘ऑपरेशन टायगर जरूर करा, पण त्याआधी महाराष्ट्राचे काय हाल झालेत, ते पाहा.’

खासगीकरणाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाजपशासित महानगरपालिकांवर निशाणा साधला. सरकारी रुग्णालयांपासून ते सार्वजनिक सुविधांपर्यंत सगळंच खासगी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

संजय राऊतांनीही शिंदे गटाला डिवचलं!

दुसरीकडे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही ऑपरेशन टायगरवरून शिंदे गटाची फिरकी घेतली. दोन्ही पक्ष अमित शाहांचे असून शिंदे गटाला स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवून काम करावं लागत असल्याची टीका त्यांनी केली. ‘ऑपरेशन टायगर सांगितलं म्हणजे त्यांनी आम्हाला टायगर असल्याचं मान्य केलं,’ असा टोला राऊतांनी लगावला. तसेच अमित शाहांच्या दोन पक्षांनी आधी स्वतःचा पक्ष सांभाळावा, असंही ते म्हणाले.

एकूणच, ऑपरेशन टायगरच्या घोषणेमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. आता शिंदे गट खरंच ठाकरे गटाला धक्का देणार की ही केवळ राजकीय खेळी ठरणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Eknath Shinde On Rahul Gandhi : राहुल गांधींना ‘मोदी फोबिया’ने पछाडले! एकनाथ शिंदेंची खरमरीत टीका

💡

Frequently Asked Questions

  • Que: ऑपरेशन टायगर 3 ची घोषणा कोणी केली?

    Ans: शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर राबवण्याचे संकेत दिले आहेत.

  • Que: ऑपरेशन टायगरवर आदित्य ठाकरे काय म्हणाले?

    Ans: ऑपरेशन टायगर करण्याआधी राज्यातील पाणीटंचाई, बेरोजगारी, उद्योगधंद्यांचे स्थलांतर आणि प्रदूषण यांसारख्या प्रश्नांकडे लक्ष द्या, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.

  • Que: संजय राऊत यांनी ऑपरेशन टायगरवर काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: ऑपरेशन टायगर म्हटलं म्हणजे शिंदे गटाने आम्हाला टायगर असल्याचं मान्य केलं, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. तसेच शिंदे गटाच्या राजकीय भूमिकेवरही त्यांनी टीका केली.

Web Title: Aaditya thackeray criticizes shinde group operation tiger vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • Eknath Shinde
  • shivsena
  • Shivsena UBT
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Sanjay Raut : मोदी-भाजपने नेहरूंचे कितीही मूर्तीभंजन केले तरी देशात नेहरूच राहतील! राऊतांनी मोदी-भाजपला सुनावलं
1

Sanjay Raut : मोदी-भाजपने नेहरूंचे कितीही मूर्तीभंजन केले तरी देशात नेहरूच राहतील! राऊतांनी मोदी-भाजपला सुनावलं

Eknath Shinde On Rahul Gandhi : राहुल गांधींना ‘मोदी फोबिया’ने पछाडले! एकनाथ शिंदेंची खरमरीत टीका
2

Eknath Shinde On Rahul Gandhi : राहुल गांधींना ‘मोदी फोबिया’ने पछाडले! एकनाथ शिंदेंची खरमरीत टीका

Aditya Thackeray : स्वच्छ हवा-पाण्यासाठी केंद्र सरकार अपयशी; आदित्य ठाकरेंनी हवामान धोरणांवर उपस्थित केले प्रश्न
3

Aditya Thackeray : स्वच्छ हवा-पाण्यासाठी केंद्र सरकार अपयशी; आदित्य ठाकरेंनी हवामान धोरणांवर उपस्थित केले प्रश्न

Bharat Gogawale : अजितदादांच्या विमान अपघातावर रामदास कदमांचा संशय, भरत गोगवलेंच्या विधानाने राजकारणात रंगल्या चर्चा
4

Bharat Gogawale : अजितदादांच्या विमान अपघातावर रामदास कदमांचा संशय, भरत गोगवलेंच्या विधानाने राजकारणात रंगल्या चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.