baba Siddique son Zeeshan Siddique entry in ncp ajit pawar group
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांकडून उमेदवारांची नावं जाहीर केली जात आहेत. काही इच्छुकांना तिकीट मिळाले आहे तर अनेकांना नाकारल्यामुळे ते नाराज आहेत. नाराज उमेदवारांनी आता पक्षांतर करण्यास सुरुवात केली आहे. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार झिशान सिद्दिकी यांनी आता पक्षांतर केले आहे. ते विद्यमान कॉंग्रेस आमदार असताना सुद्धा त्यांची उमेदवारी नाकारल्यामुळे झिशान सिद्दिकीं यांनी हाती घड्याळ घेत अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे.
झिशान सिद्दिकी हे कॉंग्रेस पक्षामध्ये होते. सध्या ते वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. मात्र महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाच्या पदरामध्ये पडला. उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघामध्ये उमेदवार देखील जाहीर केला आहे. ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते आदित्य ठाकरे यांचे नातेवाईक आहेत. त्यानंतर आता झिशान सिद्दिकी यांनी थेट अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. झिशान सिद्दिकी हे आदित्य ठाकरे यांच्या मावस भाऊ वरुण सरदेसाईंना वांद्रे पूर्वमधून जोरदार लढाई देणार आहेत.
हे देखील वाचा : गुरुपुष्यामृत योग साधला ! ‘या’ नेत्यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
झिशान सिद्दिकी यांचे वडील बाबा सिद्दिकी यांची काही दिवसांपूर्वी गोळीबार करुन हत्या करण्यात आली. हे प्रकरण ताजे असताना झिशान सिद्दिकी यांनी राजकीय प्रवास बदलला आहे. काही महिन्यांपूर्वी बाबा सिद्दिकी यांनी देखील अजित पवार गटामध्ये प्रवेश केला होता. आता झिशान सिद्दिकी यांनी देखील अजित पवार गटामध्ये प्रवेश केला होता. झिशान सिद्दिकी हे अजित पवार गटामध्ये जाणार असल्याची चर्चा होती. वडिलांप्रमाणे ते देखील पक्षांतर करतील अशी शक्यता होती. कॉंग्रेसमध्ये असून देखील त्यांनी वर्षा गायकवाड यांना विकासकामांवरुन सुनावले होते. या सगळ्या राजकीय परिस्थितीवरुन झिशान सिद्दिकी हे अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्याच. त्याचप्रमाणे आता तिकीट न मिळाल्यामुळे झिशान सिद्दिकी यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते बाबा सिद्दिकी यांचे सुपुत्र आमदार झिशान सिद्दिकी यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. आपल्या वडिलांचा लोकसेवेचा, समाजसेवेचा वारसा झिशान हे नेटानं पुढे नेतील, असा विश्वास आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि पुढील यशस्वी… pic.twitter.com/cspmBAc1iO
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 25, 2024
विद्यमान आमदार असताना देखील झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी न दिल्याने त्यांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली होती. झिशान सिद्दिकी यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, वांद्रे पूर्वमध्ये जुन्या मित्रांनी उमेदवार जाहीर केल्याचे ऐकले. सोबत राहणे त्यांच्या स्वभावातच नव्हते. “जो तुमचा आदर आणि सन्मान करतो त्याच्याशी नाते ठेवा. म्हणजे गर्दी वाढवण्यात काही अर्थ नाही.” आता निर्णय जनता घेईल!!!! अशी टीका त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून करत नाराजी व्यक्त केली होती.
सुना है पुराने दोस्तों ने वांद्रे पुर्व में अपना उम्मीदवार घोषित कर दिया है । साथ निभाना तो कभी इनकी फितरत में था ही नहीं।
“रिश्ता उसी से रखो जो इज़्ज़त और सम्मान दे,
मतलब की भीड़ बढ़ाने का कोई फ़ायदा नहीं।”अब फैसला जनता लेगी!!!!
— Zeeshan Siddique (@zeeshanBabaS) October 23, 2024