विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यामुळे राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून उमेदवारांची नावं जाहीर केली आहे. आज (दि.24) गुरुपुष्यामृताचा योग साधून राजकीय नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. जोरदार शक्तीप्रदर्शन करुन नेत्यांनी मतदारसंघामध्ये ताकद दाखवून दिली आहे. (फोटो - सोशल मीडिया)
Major leaders of all parties filed applications before maharashtra assembly elections
पुण्यातील कोथरुड परिसरामध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.
सुनिल शेळके यांना महायुतीकडून मावळ विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवार गटाच्या नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी सलग दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वरळी मतदारसंघातून त्यांनी अर्ज दाखल केला आहे.
मुळशी विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून काँग्रेस पक्षाचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
इंदापूर तालुक्यातून महाविकास आघाडीकडून हर्षवर्धन पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या.
अजित पवार गटाकडून परळी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी धनंजय मुंडे यांना मिळाली आहे. पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी अर्ज दाखल केला.
मनसे पक्ष यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पूर्ण शक्तीने मैदानामध्ये उतरले आहे. कल्याण ग्रामीण मधून प्रमोद (राजू) पाटील यांनी राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल केला.
मनसे पक्षाचे ठाणे शहराचे उमेदवार अविनाश जाधव यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राज ठाकरे उपस्थित होते.
शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये शक्तीप्रदर्शन करत जितेंद्र आव्हाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.