Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Local Murder Case : अभिनेत्रीने व्यक्त केला संताप! मुंबईच्या सुरक्षेवर केले प्रश्न; ‘वाचवायचं सोडून लोक रील बनवत…’

नालासोपारा लोकलमधील मयंक लोहार हत्याकांडानंतर संतापाची लाट उसळली असून आरोपी रोशन सुवर्णाला कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. या प्रकरणावर अभिनेत्री Aanchal Khurana हिनेही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत मुंबईच्या सुरक्षिततेवर आणि प्रवाशांच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 25, 2026 | 06:07 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • काही म्हणत आहेत की काहीही करा पण तो जिवंत दिसता कामा नये.
  • 30 वर्षीय रोशन सुवर्णाला दरवाजा बंद करण्यास सांगितले.
  • अभिनेत्री आंचल खुरानाने या संबंधित पोस्ट करत तिचे म्हणणे शेअर केले आहे.
नालासोपारा फास्ट लोकलमध्ये घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण मुंबई हादरली आहे. कुणाला एखादी गोष्टी करण्यापासून अडवायलाही आता लोकांना घाम फुटत आहे. लहानसहान मुद्द्यावरून लोकं जीव घ्यायलाही मागेपुढे पाहत नाही आहेत. लोकलच्या आत पावसाचे थेंब उडत असल्याने 22 वर्षाच्या मयंक लोहारने दरवाज्यावर उभा असणाऱ्या 30 वर्षीय रोशन सुवर्णाला दरवाजा बंद करण्यास सांगितले. या लहान मुद्द्यावरून रोशन या विकृत मानसिकतेच्या नराधमाने मयंकच्या पोटात धारधार चाकूने हल्ला केला. या घटनेत हत्या होऊन मयंकचा जागीच जीव गेला. संपूर्ण जगभरातून या घटनेची विटंबना केली जात आहे. विविध क्षेत्रातून या घटनेसंबंधित आरोपीविरोधात शिक्षेसाठी विविध मागण्या केल्या जात आहेत. कुणी त्याला फासी देण्यासाठी मागणी करत आहे तर कुणी म्हणत आहे की त्याचा एन्काउंटर करण्यात यावा. तर काही म्हणत आहेत की काहीही करा पण तो जिवंत दिसता कामा नये.

Mira Jagannath : जिंकलस गं पोरी! ‘स्वप्न महाग नसतात, जिद्द अपुरी असते’ अभिनेत्रीचं नवं घर अन् नव्या घराची वास्तुशांती!

अशामध्ये मयंकच्या वडिलांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणी केली आहे की मयंकचा हत्यारा रोशन सुवर्णा याला फासी झालीच पाहिजे तरच मयंकला न्याय मिळेल. विविध क्षेत्रातून अशा मागण्या येत आहेत. दरम्यान, सुप्रसिद्ध अभिनेत्री आंचल खुरानाने या संबंधित पोस्ट करत तिचे म्हणणे शेअर केले आहे. आंचल म्हणते की, “मुंबई म्हणजे सगळ्यात सुरक्षित शहर! या शहराचं नाव ऐकून माझ्या आईवडिलांनी मला कसलाही विचार न करता मुंबईला पाठवून दिले. का? कारण त्यांना आणि मला वाटत होतं की मुंबई हे सुरक्षित शहर आहे.” मयंक लोहार प्रकरणाविषयी सांगताना ती म्हणते की, “मयंक नावाच्या मुलाला लोकल ट्रेनमध्ये एका नराधमाने चाकूने हल्ला करत ठार केला. यावेळी लोकलच्या त्या डब्यामध्ये अनेक प्रवासी हजर होते. परंतु, त्यातील एकानेही मयंकला वाचवण्याची हिमंत किंवा प्रयत्न केले नाही. सगळ्यांनी एकत्र येऊन त्या नराधमाला थांबवू शकले असते पण कुणीही पुढे आले नाही, याउलट ती लोकं रीला बनवत बसले. शूट करत बसले.”

Prahaar Movie : २६/११ चा दहशतवादी अजमल कसाबच्या भूमिकेत मराठीचा चॉकलेट हिरो, अंगावर काटा आणणारा ‘प्रहार’चा पहिला लूक प्रदर्शित


पुढे आंचल म्हणते की, “कुणाला मारण्याचा विचार जरी केला तरी फाटून हातात येते. आजकाल ही लोकं अशा कोणत्या फ्रस्ट्रेशनमध्ये घराबाहेर पडतात की बिनधास्त मोकाट खून करू लागतात.” या पोस्टखाली आंचलने भलेमोठे कॅप्शन देत नमूद केले आहे की, “तुम्ही दार बंद करा, पावसाचे पाणी आत येत आहे, एवढीच एका तरुणाची विनंती होती. त्यात वाद नव्हता, अपमान नव्हता, कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. पण त्या एका क्षुल्लक कारणामुळे त्याला स्वतःचा जीव गमवावा लागला. आजचा सर्वात मोठा प्रश्न हा नाही की हल्लेखोराच्या हातात चाकू का होता. प्रश्न हा आहे की आपल्यातील संयम इतका का संपत चालला आहे? एखाद्या साध्या मतभेदाचं रूप इतक्या टोकाच्या हिंसेत कसं बदलतं? आपण अशा काळात जगतो आहोत जिथे अहंकाराला माणुसकीपेक्षा जास्त महत्त्व दिलं जात आहे. क्षणिक राग, दुखावलेला स्वाभिमान किंवा छोटासा वाद यासाठी लोक दुसऱ्याचा जीव घेण्याइतके आक्रमक होत आहेत. या घटनेत एका आईचा आधार हिरावला गेला, एका वडिलांचे स्वप्न उद्ध्वस्त झाले आणि एका कुटुंबाचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. एका चुकीच्या निर्णयाची किंमत अनेकांना मोजावी लागली. खरी ताकद राग दाखवण्यात नसते, तर रागावर नियंत्रण ठेवण्यात असते. मतभेद स्वीकारणे, शांत राहणे आणि परिस्थिती समजून घेणे हेच खरे सामर्थ्य आहे. कारण रागाचा एक क्षण केवळ एक आयुष्य संपवत नाही, तर अनेक लोकांची स्वप्ने, आशा आणि भविष्य कायमचे बदलून टाकतो.”

Web Title: Aanchal khurana on mumbai local train murder case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 06:07 PM

Topics:  

  • Brutal murder
  • Celebrity
  • Mumbai local train

संबंधित बातम्या

Mumbai Local Train Murder : मयंक हत्ये प्रकरणावर व्यक्त झाला सुप्रसिद्ध अभिनेता! पोस्ट करत बघ्यांना सुनावले खडेबोल
1

Mumbai Local Train Murder : मयंक हत्ये प्रकरणावर व्यक्त झाला सुप्रसिद्ध अभिनेता! पोस्ट करत बघ्यांना सुनावले खडेबोल

क्रिकेटर्स आणि बॉलिवूड स्टार्स आता करणार Mutual Fund च्या जाहिराती! पण ‘या’ गोष्टी केल्यास SEBI कडून होणार कारवाई!
2

क्रिकेटर्स आणि बॉलिवूड स्टार्स आता करणार Mutual Fund च्या जाहिराती! पण ‘या’ गोष्टी केल्यास SEBI कडून होणार कारवाई!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.