Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Local Train News: दंडाची रक्कम ऐकताच  महिलेचा संताप; टीसीला शिवीगाळ करत ओरबडले अन् थेट हाताला दाताने डसले!

Mumbai Local Train News: विनातिकीट प्रवासाचा दंड भरला खरा, पण जाताना महिला टीसीच्या हाताचा घेतला चावा! अंधेरी रेल्वे स्थानकातील आरपीएफ चौकीत घडलेल्या या थरारक प्रकाराने मुंबई लोकलमध्ये खळबळ उडाली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे त्या आक्रमक महिलेचा शोध सुरू आहे!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 05, 2026 | 11:12 AM
Mumbai Local Train News: दंडाची रक्कम ऐकताच  महिलेचा संताप; टीसीला शिवीगाळ करत ओरबडले अन् थेट हाताला दाताने डसले!

Mumbai Local Train News: दंडाची रक्कम ऐकताच  महिलेचा संताप; टीसीला शिवीगाळ करत ओरबडले अन् थेट हाताला दाताने डसले!

Follow Us
Follow Us:

Mumbai Local Train News: मुंबईतून एक अत्यंत विचित्र आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. विनातिकीट प्रवास पकडल्या गेलेल्या एका महिलेने कारवाईचा राग मनात धरून थेट महिला तिकीट तपासनीसावर (TC) जीवघेणा हल्ला केल्याची घटना अंधेरी रेल्वे स्थानकात घडली आहे. या हल्ल्यात महिलेने टीसीला मारहाण करत थेट त्यांच्या हाताला चावा घेतल्याने रेल्वे वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हरप्रीत कौर असे हल्ल्यात जखमी झालेल्या महिला टीसीचे नाव असून त्या पश्चिम रेल्वेमध्ये डेप्युटी चीफ तिकीट इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहेत.

हेही वाचा: Cosmetic Shop Drug Racket: बाहेरून साधी ज्वेलरी, आत ड्रग्सचा बाजार! पुण्यात २२ वर्षीय तरुणीच्या कृत्याने खळबळ

नेमका घटनाक्रम कसा घडला?

हरप्रीत कौर या बुधवारी सकाळी वांद्रे स्थानकातून विरार लोकलच्या महिला द्वितीय श्रेणी डब्यात तिकीट तपासणीसाठी चढल्या होत्या. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास लोकल अंधेरी स्थानकात आल्यानंतर, विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फलाट क्रमांक सहावर उतरवण्यात आले. यावेळी एका महिलेकडे तिकीट नसल्याने हरप्रीत यांनी तिला ५१० रुपयांचा दंड भरण्यास सांगितले. सुरुवातीला महिलेने कॅश नाही असे सांगत क्यूआर कोड मागितला. मात्र, कोड दिल्यानंतरही तिने पैसे न पाठवता पळून जाण्याचा प्रयत्न केला. अखेर हरप्रीत यांनी तिला पकडून फलाट क्रमांक ६-७ वरील रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) चौकीत आणले. तिथे तिने अखेर ऑनलाइन दंड भरला.

हेही वाचा: Nashik Crime News: निव्वळ अपघात की पूर्वनियोजित घातपात? ग्राहकाने प्रेसर गन उचलली अन्… नाशिकमधील त्या घटनेने पोलीस चक्रावले!

महिला टीसीच्या हातावर घेतला चावा

दंड भरल्यानंतरही त्या महिलेच्या मनात प्रचंड राग होता. तिने चौकीतच हरप्रीत कौर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांच्या खांद्यावर मारहाण करत शर्ट पकडला आणि हाताला नखांनी बेछूट ओरबडले. आरपीएफच्या महिला कर्मचाऱ्यांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला तरीही ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. यानंतर तिने कळस गाठत थेट हरप्रीत यांच्या हातावर जोरात चावा घेतला आणि तिथून पळ काढला. उपस्थित कर्मचाऱ्यांनी हरप्रीत यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेज आणि ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून पळून गेलेल्या महिलेचा कसून शोध घेतला जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुंबईतील अंधेरी स्थानकात महिला टीसीवर कोणी आणि का हल्ला केला?

    Ans: विनातिकीट प्रवास करणाऱ्या आणि ५१० रुपये दंड भरावा लागल्याच्या रोषातून एका अज्ञात महिलेने महिला टीसी हरप्रीत कौर यांच्यावर हल्ला केला.

  • Que: हल्लेखोर महिलेने टीसीसोबत नेमके काय केले?

    Ans: महिलेने टीसीला शिवीगाळ केली, त्यांच्या हाताला नखांनी ओरबडले आणि थेट त्यांच्या हातावर चावा घेऊन तिथून पळ काढला.

  • Que: या प्रकरणी प्रशासनाकडून काय कारवाई सुरू आहे?

    Ans: जखमी टीसींवर उपचार करण्यात आले असून, रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि ऑनलाइन पेमेंटच्या आधारे आरोपी महिलेचा शोध सुरू केला आहे.

Web Title: Mumbai local train tc harpreet kaur attacked andheri station sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 11:12 AM

Topics:  

  • crime news
  • Mumbai local train
  • Mumbai Railway
  • woman

संबंधित बातम्या

Tuljapur Murder Case: रात्रीच्या अंधारात घरात घुसून तरुणाला बळजबरीने नेलं पळवून; तुळजापूरमधील त्या सामूहिक हल्ल्यामागील गूढ रहस्य!
1

Tuljapur Murder Case: रात्रीच्या अंधारात घरात घुसून तरुणाला बळजबरीने नेलं पळवून; तुळजापूरमधील त्या सामूहिक हल्ल्यामागील गूढ रहस्य!

धक्कादायक ! शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रकरणात मध्यस्थी केल्याने शिक्षकाला भररस्त्यात अडवून मारहाण; जीवे मारण्याचीही धमकी
2

धक्कादायक ! शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रकरणात मध्यस्थी केल्याने शिक्षकाला भररस्त्यात अडवून मारहाण; जीवे मारण्याचीही धमकी

पुणे हादरलं! बर्फाचा गोळा घेण्याच्या बहाण्याने घरात शिरून मुलींचा विनयभंग; नराधम शिक्षकाला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

पुणे हादरलं! बर्फाचा गोळा घेण्याच्या बहाण्याने घरात शिरून मुलींचा विनयभंग; नराधम शिक्षकाला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

रूपाली चाकणकर बदनामी प्रकरणात मोठी अपडेट! तीन आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
4

रूपाली चाकणकर बदनामी प्रकरणात मोठी अपडेट! तीन आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.