अभिनेत्री मीरा जग्गनाथ बहुतेक मराठी तरुणांची क्रश आहे. आपल्या उत्तम अभिनय कौशल्याने तसेच सौंदर्याच्या जोरावर अभिनेत्रीने मराठी तरुणांना घायाळ करून टाकले आहे. गेल्या काही महिन्यात अभिनेत्रीचे जिद्दी रूपही मराठी तरुणांनी अनुभवले आहे. मीराने तिचे सगळ्यात मोठे स्वप्न म्हणजे स्वतःचे घर घेणे अखेर पूर्ण केले आहे. अभिनेत्री मीरा जग्गनाथने मुंबईत स्वतःचे घर घेतले आहे.
मीरा जग्गनाथच्या मुंबई येथील नव्या घरातील वास्तू शांती. ( फोटो सौजन्य - सोशल मीडिया )

काही दिवसांपूर्वीच तिने घर घेतल्याची बातमी चाहत्यांनी शेअर केली होती. परंतु, अभिनेत्रीने नव्या घरात वस्तू शांतीही केली आहे. या वास्तू शांतीचे काही क्षण मीराने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

नव्या घरात मीरासह मीराचे संपूर्ण कुटुंब दिसत आहे. आपल्या लेकीच्या यशाचे कौतुक तिच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर झळकत आहे.

मीरने अभिनय क्षेत्रात 2018 साली केले होते. 'माझ्या नवऱ्याची बायको' या सुप्रसिद्ध मालिकेतून तिने संजना या भूमिकेतून मालिका क्षेत्रात तिचे पदार्पण केले.

पुढे, अभिनेत्री Bigg Boss Marathi 3 मध्ये झळकली तसेच रिऍलिटी राणीज् ऑफ जंगलमध्येही ती दिसून आली.

अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तवार तिने मुंबईत घर खरेदी केले आणि आज तिच्या नव्या घराची वास्तू शांती झाली असून पोस्ट करत तिने '00.00' ( सुरुवात ) असे कॅप्शन दिले आहे.






