Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhishek Bachchan ETPL: अभिषेक बच्चनने केला European T20 Premier League चा श्रीगणेशा; मैदानावरून शेअर केला खास फोटो

Abhishek Bachchan ETPL: European T20 Premier Leagueच्या उद्घाटनाच्या दिवशी अभिषेक बच्चनने मैदानावरून खास फोटो शेअर केला. ‘Here we go!’ म्हणत त्याने लीगच्या सुरुवातीचा उत्साह व्यक्त केला.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 26, 2026 | 03:15 PM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Abhishek Bachchan ETPL:  अभिनेता आणि क्रीडा उद्योजक अभिषेक बच्चन याच्या महत्त्वाकांक्षी क्रिकेट प्रोजेक्टला अखेर सुरुवात झाली आहे. European T20 Premier League (ETPL)च्या उद्घाटनाच्या दिवशी अभिषेकने थेट मैदानावरून खास फोटो शेअर करत चाहत्यांना या नव्या क्रिकेट लीगची झलक दाखवली. ट्रॉफीजवळ उभा राहून फोटो शेअर करत त्याने “Here we go! European T20 League.” असे लिहिले आहे.

ETPLच्या पहिल्या सामन्याला अभिषेकची उपस्थिती

युरोपमध्ये व्यावसायिक T20 क्रिकेटला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ETPLच्या पहिल्या हंगामाला सुरुवात झाली आहे. या उद्घाटन सामन्याचा साक्षीदार होण्यासाठी अभिषेक बच्चन स्वतः मैदानावर उपस्थित राहिला. त्याच्या पोस्टमधून लीगच्या पहिल्या दिवसाचा उत्साह पाहायला मिळत आहे.

या आठवड्यात वूरबर्ग येथे सामन्यांची मालिका रंगणार असून, त्यानंतर आयर्लंड, स्कॉटलंड आणि नेदरलँड्समध्येही सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे युरोपमधील क्रिकेट चाहत्यांसाठी ही नवी स्पर्धा खास ठरणार आहे.

 

अभिषेक बच्चनने केली ETPLची सहसंस्थापना

अभिषेक बच्चनने सौरभ बॅनर्जी, प्रियांका कौल आणि धीरज मल्होत्रा यांच्यासोबत European T20 Premier Leagueची सहसंस्थापना केली आहे. तो या लीगशी संस्थापक म्हणून जोडलेला असण्यासोबतच टीमचा सहमालकही आहे.

भारतामध्ये कबड्डी आणि फुटबॉलच्या क्षेत्रात काम केल्यानंतर अभिषेकने क्रिकेटमध्येही मोठी झेप घेतली आहे. ETPL हा त्याचा आतापर्यंतचा महत्त्वाकांक्षी क्रीडा उपक्रम मानला जात आहे.

Raksha Bandhan 2026: राखीच्या धाग्यापलीकडचं नातं! झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या भावंडांसोबतच्या खास आठवणी

युरोपमध्ये T20 क्रिकेटला नवी दिशा

युरोपमध्ये क्रिकेटची लोकप्रियता वाढत असताना व्यावसायिक T20 क्लब स्पर्धा उभी करण्याचा ETPLचा प्रयत्न आहे. यापूर्वी मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारची क्लब T20 स्पर्धा नसलेल्या बाजारपेठेत क्रिकेटचा नवा पाया तयार करण्याचे उद्दिष्ट या लीगमागे आहे.

अभिषेक बच्चनच्या या पोस्टनंतर चाहत्यांमध्येही उत्सुकता वाढली आहे. ट्रॉफी मैदानावर आली, पहिला सामना सुरू झाला आणि European T20 Leagueच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली, असा उत्साह त्याच्या पोस्टमधून व्यक्त होत आहे. आता या पहिल्या हंगामाला क्रिकेट चाहत्यांकडून कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Salman Khan 38 Years: ‘प्रेम’च्या रोमँटिक अंदाजापासून ‘टायगर’च्या ॲक्शनपर्यंत; सलमान खानचा ३८ वर्षांचा सुपरहिट प्रवास

Web Title: Abhishek bachchan etpl european t20 league opening match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • abhishek bachchan
  • Entertainemnt News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.