Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharmendra यांना मिळणार मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ पुरस्कार, हेमामालिनी स्वीकार करणार; सनी – बॉबीला आहे माहिती

धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी, अभिनेत्री हेमा मालिनी, हा सन्मान स्वीकारणार आहेत. त्यांच्या मुलांना याबाबत माहिती आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 25, 2026 | 02:21 PM
धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • धर्मेंद्र यांना मिळणार मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार 
  • हेमा मालिनी स्वीकारणार
  • सनी आणि बॉबी यांना आहे पूर्ण कल्पना 
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आता हयात नसले तरी, मनोरंजन क्षेत्रातील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या दशकांहून अधिक काळाच्या योगदानाबद्दल, त्यांना २५ मे रोजी मरणोत्तर पद्मविभूषण (देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान) प्रदान केला जात आहे. धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी, हेमा मालिनी, हा सन्मान मरणोत्तर स्वीकारतील. काही महिन्यांपूर्वीच या दिग्गज कलाकाराचे निधन झाले. यानंतर आता त्यांच्या कामाप्रती सन्मान म्हणून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

Dharmendra Biography: पंजाबमध्ये जन्म, मेहनतीने कमावले अब्जावधी संपत्ती; करोडो लोकांच्या मनात निर्माण केले स्थान

हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्या वतीने स्वीकारणार सन्मान

हेमा मालिनी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या, “हा माझ्यासाठी एक भावनिक क्षण आहे. हा पुरस्कार स्वीकारताना माझी लहान मुलगी अहना माझ्यासोबत असेल. ईशालाही यायचे होते, पण ती काही कारणामुळे येऊ शकणार नाही. या सन्मानाने संपूर्ण कुटुंब खूप आनंदी आहे. सनी देओल आणि बॉबी देओल यांना याची कल्पना आहे. हा आम्हा सर्वांसाठी एक मोठा क्षण आहे.” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. धर्मेंद्र यांच्या चाहत्यांसाठीही हा खूपच आनंदाचा क्षण आहे. धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सर्वजण हळूहळू सावरत आहेत.

धर्मेंद्र यांचे वैयक्तिक आयुष्य

धर्मेंद्र यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांनी दोनदा लग्न केले. त्यांचे पहिले लग्न प्रकाश कौर यांच्याशी झाले होते. प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांना सनी देओल, बॉबी देओल, विजेता आणि अजेता अशी चार मुलंमुली आहेत. त्यानंतर धर्मेंद्र यांनी प्रकाश कौर यांना घटस्फोट न देता अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी दुसरे लग्न केले. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची प्रेमकथा बरीच फिल्मी आहे.

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना अहाना आणि ईशा देओल या दोन मुली आहेत. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळात धर्मेंद्र आपल्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांच्यासोबत फार्महाऊसवर राहत होते. धर्मेंद्र यांना तिथे राहायला खूप आवडत असे आणि ते तिथे शेतीसुद्धा करत असत. पण २४ नोव्हेंबर रोजी या अभिनेत्याचे निधन झाले.

Dharmendra Birth Anniversary: दशकांपासून अ‍ॅक्शन आणि रोमँटिक चित्रपट दिले हिट; ‘ही- मॅन’ ची जाणून घ्या कारकीर्द

Web Title: Actor dharmendra to get padma vibhushan after demise hema malini to receive said sunny and bobby aware about this

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • dharmendra
  • Entertainemnt News
  • Hema Malini

संबंधित बातम्या

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट
1

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना
2

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”
3

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.