Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट

Mee Sansar Mazha Rekhite: नवरात्रोत्सवानिमित्त सन मराठीवरील ‘मी संसार माझा रेखिते’ या मालिकेत प्रेक्षकांना एक दमदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेत पिहूच्या बॅडमिंटन कोचकडून गैरवर्तन होत असल्याचे लक्षात येताच अनुप्रिया आपल्या मुलीच्या संरक्षणासाठी खंबीरपणे उभी राहते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 10, 2026 | 05:40 PM
Mee Sansar Mazha Rekhite: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Mee Sansar Mazha Rekhite: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

 

  • पिहूच्या कोचकडून गैरवर्तन होत असल्याचे समजताच अनुप्रिया मुलीच्या संरक्षणासाठी अन्यायाविरुद्ध उभी राहणार.
  • आई आणि सासूकडून धैर्याने संकटांचा सामना करण्याची शिकवण मिळाल्याचे अभिनेत्रीने सांगितले.
  • मी संसार माझा रेखिते’चा विशेष भाग ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १ आणि रात्री ८ वाजता सन मराठीवर प्रसारित होणार.
नवरात्रोत्सवानिमित्त सन मराठीवरील ‘मी संसार माझा रेखिते’ या मालिकेत एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेत पिहूच्या बॅडमिंटन कोचकडून तिच्याशी गैरवर्तन होत असल्याचं दिसून येत आहे. ही गोष्ट अनुप्रियाच्या लक्षात येताच ती आपल्या लेकीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहण्याचा निर्णय घेते. Mee Sansar Mazha Rekhite:

एक आई दुर्गेचं रूप

आपल्या मुलीच्या संरक्षणासाठी एक आई दुर्गेचं रूप धारण करत अन्यायाविरुद्ध कशी लढते, हे मालिकेच्या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. अनुप्रिया कोचला धडा शिकवणार असली, तरी त्यानंतर तिच्यासमोर कोणती आव्हानं उभी राहणार, याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या  प्रोमोला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून हा महाएपिसोड ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता आणि रात्री ८ वाजता सन मराठीवर प्रसारित होणार आहे.

संपूर्ण टीमने प्रचंड मेहनत घेतली

अनुप्रियाची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीप्ती केतकर म्हणाली की, ” एक आई  आपल्या मुलीच्या पाठीशी कायमच खंबीरपणे उभी असते. पण वेळ आली तर ती दुर्गेचा अवतार घ्यायला पण मागे पुढे बघत नाही. असच काहीस मालिकेत पाहायला मिळणार आहे. या महाएपिसोडसाठी आमच्या संपूर्ण टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे. आता पर्यंत प्रेक्षकांनी अनुप्रियाची मायाळू बाजू पाहिली पण आता तिच्या मुलीच्या संरक्षणासाठी तिची दुसरी बाजू पाहायला मिळणार आहे. ”

Dashami Marathi Movie: हातात धगधगती ज्योत, डोळ्यांत रौद्र रूप! ‘दशमी’च्या ‘चंडिका हो’ गाण्यात गौरी इंगवलेचा दमदार अवतार

समाजातील वाईट प्रवृत्ती दूर व्हाव्यात

मालिकेव्यतिरिक्त अभिनेत्रीने स्वतःच्या आयुष्यातील नवदुर्गेबद्दल सांगताना म्हणाली की, “माझ्या आयुष्यात आई आणि सासू या दोघींचंही खूप महत्त्वाचं स्थान आहे. आयुष्यात कोणताही कठीण प्रसंग आला तरी हार मानायची नाही, तर त्याला धैर्याने सामोरं जायचं, ही शिकवण मला दोघींकडून मिळाली. माझ्या स्वप्नांना त्यांनी नेहमीच पाठिंबा दिला आणि ती पूर्ण करण्यासाठी मला बळ दिलं.

प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी जगायला शिकावं

नवरात्रीनिमित्त देवीकडे मनापासून एकच गोष्ट मागावीशी वाटते की, समाजातील वाईट प्रवृत्ती दूर व्हाव्यात, प्रत्येकाने एकमेकांना समजून घ्यावं आणि आनंदाने जगावं. समाजात प्रेम, आपुलकी आणि सकारात्मकता वाढावी. याचबरोबर प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी जगायला शिकलं पाहिजे. कुटुंबाची काळजी घेताना स्वतःच्या स्वप्नांकडे दुर्लक्ष करू नये. स्वतःची ओळख निर्माण करणं आणि आपल्या आनंदाला महत्त्व देणं तितकंच गरजेचं आहे.”

Katrina Kaif London look: लंडनमध्ये कतरिना कैफचा जलवा! ट्रोलर्सची बोलती बंद, चाहत्यांनी मात्र केली ‘ही’ खास मागणी

Web Title: Mee sansar mazha rekhite anupreeya durga avatar navratri mahaepisode rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 05:40 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Entertainemnt News
  • Marathi News
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Gaza News : धक्कादायक ;गाझामध्ये इस्रायली गोळीबारात आठ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
1

Gaza News : धक्कादायक ;गाझामध्ये इस्रायली गोळीबारात आठ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

Dashami Marathi Movie: हातात धगधगती ज्योत, डोळ्यांत रौद्र रूप! ‘दशमी’च्या ‘चंडिका हो’ गाण्यात गौरी इंगवलेचा दमदार अवतार
2

Dashami Marathi Movie: हातात धगधगती ज्योत, डोळ्यांत रौद्र रूप! ‘दशमी’च्या ‘चंडिका हो’ गाण्यात गौरी इंगवलेचा दमदार अवतार

Katrina Kaif London look: लंडनमध्ये कतरिना कैफचा जलवा! ट्रोलर्सची बोलती बंद, चाहत्यांनी मात्र केली ‘ही’ खास मागणी
3

Katrina Kaif London look: लंडनमध्ये कतरिना कैफचा जलवा! ट्रोलर्सची बोलती बंद, चाहत्यांनी मात्र केली ‘ही’ खास मागणी

Nagpur News :स्टार एअरकडून नागपूरच्या प्रवाशांना मोठा धक्का ;१२ विमानसेवांवर शहराचा भार
4

Nagpur News :स्टार एअरकडून नागपूरच्या प्रवाशांना मोठा धक्का ;१२ विमानसेवांवर शहराचा भार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.