Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“चाळीत कैरी चोरण्याची मज्जा वेगळीच होती” योगिता चव्हाणने दिला उन्हाळाच्या आठवणींना उजाळा

योगिता चव्हाण हे आज घराघरात माहीत असलेलं नाव आहे. तू अनोळखी तरी सोबती या मालिकेतून ती सध्या प्रेक्षकांचं मन जिंकून घेत आहे. तिने उन्हाळ्यातील सुट्टीच्या आठवणींना उजाळा दिलाय

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 14, 2026 | 10:03 AM
योगिताने शेअर केले लहानपणीचे अनुभव

योगिताने शेअर केले लहानपणीचे अनुभव

Follow Us
Follow Us:
  • तू अनोळखी तरी सोबती फेम योगिता चव्हाणच्या आठवणी 
  • उन्हाळ्यातील सुट्टीची मजा केली शेअर 
  • चाळीतील अनुभव सांगितला 
‘सन मराठी’वरील तू अनोळखी तरी सोबती या मालिकेत नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. सध्या मालिकेत अर्पिता स्वतःच घर वाचवण्यात यशस्वी ठरली आहे. यामुळे समीरने तिचे आभार मानत कौतुक केलं आहे. मालिकेत हळू हळू समीर व अर्पिताची मैत्री फुलताना दिसत आहे. नीलांबरी अर्पिता व समीर यांच्यात दुरावा येण्यासाठी नवा डाव रचताना दिसत आहे.

मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये अर्पिताची कठोर परीक्षा घेण्यासाठी एका आजीची एन्ट्री झालेली पाहायला मिळते. अर्पिता या सगळ्या आव्हानांना कशी तोंड देणार? यात अर्पिताला समीरची साथ मिळेल का? नीलांबरीचा डाव यशस्वी होईल का? हे पाहणं रंजक ठरणार आहे.  

‘सन मराठी’वर लवकरच सुरु होणार दोन अनोळखी व्यक्तींचा एकत्र प्रवास; ‘तू अनोळखी तरी सोबती’ नवी मालिका रिलीज

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधील आठवणी 

सध्या महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. उन्हाळा सुरु झाला की कलाकारांचं मन देखील लहानपणीच्या आठवणींमध्ये रमतं. ‘तू अनोळखी तरी सोबती’ या मालिकेतील अर्पिता म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण उन्हाळाच्या  आठवणींबद्दल बोलताना म्हणाली की, “लहानपणी उन्हाची इतकी झळ नसायची जितकी आता असते. सुट्टीत मामाकडे जाणं, मित्र मैत्रिणींसोबत खेळणं अशी बरीच धमाल आम्ही करायचो. पण माझ्या सगळ्यात जवळची एक आठवण म्हणजे मी किसननगरला राहत असताना रात्री लाईट जायची त्यामुळे खूप गरम व्हायचं. तेव्हा आम्ही मित्र-मैत्रिणी टेरेसवर झोपायला जायचो. सगळे आपापली चादर, गाद्या सोबत घेऊन यायचे. त्यावेळी कुणाकडे फोन नव्हते म्हणून खूप साऱ्या गप्पा मारत टेरेसवर झोपायचो.”

Sun Marathi Serial: मासिक पाळीवर ‘तू अनोळखी तरी सोबती’ची संवेदनशील मांडणी; समीरचा अर्पिताला आधार, प्रेक्षकांकडून कौतुक

कैऱ्या चोरणं म्हणजे मज्जा 

योगिता पुढे म्हणाली की, “उन्हाळ्यातील आणखी एक आठवण म्हणजे आमच्या चाळीत बरीच कुटुंब आंब्याचं लोणचं बनवायचे तर त्यासाठी टेरेसवर कैऱ्या वाळत घातलेल्या असायच्या आणि आम्ही त्या कैऱ्या चोरून खायचो. जेव्हापासून कैऱ्या कमी होत चालल्या आहेत हे सगळ्यांना समजायला लागल तेव्हापासून टेरेसला कुलूप लावायला सुरुवात केली. आज जर मला पुन्हा एकदा उन्हाळी सुट्टी मिळाली तर मी लगेच मामाच्या गावी जाईन. 

लहानपणीच्या सगळे खेळ अगदी तशीच मज्जा करेन. उन्हाळा म्हंटल की, आंबे खाणं आलंच. लहानपणी  दिवसाला ७-८ आंबे खायचे पण आता अभिनेत्री म्हणून स्किनची  देखील काळजी घ्यावी लागते. चेहऱ्यावर उष्णता येऊ नये म्हणून खूप कमी प्रमाणात आंबे खाते. सध्या प्रचंड उन्हाची झळ जाणवते यासाठी भरपूर पाणी पिणं, पौष्टिक गोष्टी खाणं, चेहऱ्याला भरपूर सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे. मालिकेच्या सेटवर सगळे कलाकार स्वतःचा फॅन घेऊन येतात आमची पडद्यामागची टीम सगळ्या कलाकारांची खूप काळजी घेते. त्यामुळे उन्हाचा तडाखा असला तरी आम्ही हसत खेळत शूटिंग करतो.” ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून योगिता आणि अंबर गणपुले यांची जोडीही चाहत्यांना आवडत आहे. याशिवाय या मालिकेत हेमांगी कवीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 

Web Title: Actress yogita chavan shared her childhood experience about summer vacation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 10:03 AM

Topics:  

  • marathi serial update
  • sun marathi

संबंधित बातम्या

Sun Marathi Serial: अनुप्रियाच्या आयुष्यात येणार नवं पात्र; निरंजन कुलकर्णीची मालिकेत एन्ट्री, भूमिकेमागे दडलंय रहस्य
1

Sun Marathi Serial: अनुप्रियाच्या आयुष्यात येणार नवं पात्र; निरंजन कुलकर्णीची मालिकेत एन्ट्री, भूमिकेमागे दडलंय रहस्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.