Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Me Sansar Maza Rekhite: मुलीवर झालेल्या अन्यायाविरोधात अनुप्रियाचा लढा; समाजाला महत्त्वाचा संदेश

Me Sansar Maza Rekhite: मी संसार माझा रेखिते या मालिकेतून नेहमीच समाजाला चांगले संदेश देण्याचा प्रयत्न असतो आणि यावेळीही खूपच संवेदनशील कथा पहायला मिळत आहे. कसा आहे अनुप्रियाचा लढा

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 07, 2026 | 11:08 AM
मी संसार माझा रेखिते मधून समाजाला महत्त्वाचा संदेश

मी संसार माझा रेखिते मधून समाजाला महत्त्वाचा संदेश

Follow Us
Follow Us:
  • मी संसार माझा रेखिते मालिकेतून खास संदेश 
  • महिलांवरील अत्याचारांबाबत महत्त्वाचा संदेश 
  • अनुप्रिया आणि तिच्या मुलीच्या माध्यमातून खास कथानक 
Me Sansar Maza Rekhite:  महिलांवरील अत्याचार, शोषण आणि लैंगिक छळाच्या घटना आजही समाजात घडताना दिसतात. निर्भया प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा मुद्दा देशभरात चर्चेत आला. मात्र, आजही अशा अनेक घटना समोर येत आहेत. अशा परिस्थितीत पीडित महिलांना न्याय मिळवून देणं आणि त्यांना अन्यायाविरोधात लढण्याचं बळ देणं ही काळाची गरज आहे. याच महत्त्वाच्या विषयाला हात घालत सन मराठीवरील ‘मी संसार माझा रेखिते’ या मालिकेत एक संवेदनशील कथानक पाहायला मिळत आहे.

पिहूचं लैंगिक शोषण

मालिकेत बॅडमिंटन कोच गोयलकडून पिहूचं लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली आहे. आपल्या मुलीवर झालेल्या अन्यायाविरोधात अनुप्रिया शांत न बसता गोयलविरोधात लढण्याचा निर्णय घेते. पिहूला न्याय मिळावा यासाठी ती रस्त्यावर उतरून उपोषणदेखील करते. एका आईचा आपल्या मुलीसाठी सुरू असलेला हा संघर्ष प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. आता या प्रकरणात न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हा महाएपिसोड येत्या  शनिवारी ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १ व सायंकाळी ७ वाजता हा भाग प्रसारित होईल. 

स्त्रीशक्ती आणि कुटुंबीय नात्यांवर आधारित नवी मालिका,‘मी संसार माझा रेखिते’ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

काय म्हणाली दीप्ती केतकर 

मालिकेतील या प्रसंगाविषयी अभिनेत्री दीप्ती केतकर म्हणाली की, ‘आजही आपल्या आजूबाजूला मुलींवर अत्याचार आणि लैंगिक छळाच्या घटना घडत आहेत, हे पाहून खूप वाईट वाटतं. निर्भया प्रकरण असो किंवा आज समोर येणाऱ्या अशा घटना, प्रत्येक वेळी मनात एकच प्रश्न येतो की हे कधी थांबणार? ‘मी संसार माझा रेखिते’ मालिकेत असे प्रसंग साकारताना एक कलाकार म्हणून मलाच खूप त्रास होतो. अनेकदा ते दृश्य करताना मन अस्वस्थ होतं. 

मग ज्यांच्या खऱ्या आयुष्यात हे सगळं घडतं, त्या मुलींचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं काय होत असेल, याचा विचारही करवत नाही. एक आई म्हणून तर हा विचार आणखी अस्वस्थ करतो. प्रत्येक आईला आपली मुलगी सुरक्षित असावी असंच वाटतं. पण फक्त काळजी करून चालणार नाही, तर मुलींना चुकीच्या गोष्टीविरोधात बोलण्याचं धैर्य आणि घरातून त्यांना साथ मिळणंही तितकंच महत्त्वाचं आहे. अनुप्रियाच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की, कोणावरही अन्याय झाला तर गप्प बसू नका. आपल्या मुलीच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे.’

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट

समाजातील प्रश्नाकडे लक्ष 

एका आईचा आपल्या मुलीसाठीचा हा संघर्ष केवळ मालिकेपुरता मर्यादित नसून समाजातील एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणारा आहे. पीडितांना न्याय मिळणं आणि प्रत्येक मुलीला सुरक्षित वातावरण मिळणं किती आवश्यक आहे, हे ‘मी संसार माझा रेखिते’ या मालिकेच्या माध्यमातून अधोरेखित होत आहे.

Web Title: Anupriya fight against the injustice inflicted upon a girl an important message for society from me sansar maza rekhite sun marathi dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • Marathi Serial
  • marathi serial update
  • sun marathi

संबंधित बातम्या

Zee Marathi Serial: कमळीचा नवा लूक पाहिलात का? दोन वेण्यांची स्टाइल बदलली, आता महाजनांच्या घरी होणार सन्मानाने स्वागत
1

Zee Marathi Serial: कमळीचा नवा लूक पाहिलात का? दोन वेण्यांची स्टाइल बदलली, आता महाजनांच्या घरी होणार सन्मानाने स्वागत

Zee Marathi Artists: कुणाला आवडतो घरचा फराळ, तर कुणाला किल्ला बनवण्याची आवड, झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या खास आठवणी
2

Zee Marathi Artists: कुणाला आवडतो घरचा फराळ, तर कुणाला किल्ला बनवण्याची आवड, झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या खास आठवणी

Aai Tuljabhavani: आसुरी शक्तींच्या संहारासाठी तुळजाभवानीचा नवा अवतार! ‘आई राजा उदो उदो’च्या गजरात उर्वीचे मालिकेत पदार्पण
3

Aai Tuljabhavani: आसुरी शक्तींच्या संहारासाठी तुळजाभवानीचा नवा अवतार! ‘आई राजा उदो उदो’च्या गजरात उर्वीचे मालिकेत पदार्पण

Zee Marathi New Serial: उषा नाडकर्णी झी मराठीवर कमबॅक करणार; ‘येतेच आता मी नांदायला’ मालिकेत पूजा बिरारीची मुख्य भूमिका
4

Zee Marathi New Serial: उषा नाडकर्णी झी मराठीवर कमबॅक करणार; ‘येतेच आता मी नांदायला’ मालिकेत पूजा बिरारीची मुख्य भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.